Browsing Category

मेरी मर्जी

आपल्याला काय हवं आहे आणि काय आवडतं ते आपल्याला दर वेळी ठरवता येतं का? आपल्याला आपल्या मनाप्रमाणे निवड करता येते का? एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर आपण ते खुलेपणाने व्यक्त करू शकतो का? आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कपडे घालता येतात का आणि हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी जाता येतं का? हा निवडीचा आणि स्वतःसाठी गोष्टी ठरवण्याचा अधिकार खूप महत्त्वाचा अधिकार आहे.
आपली लैंगिक नाती, संबंध आणि लैंगिक आरोग्य याबाबत निर्णय घेण्याचा आणि हे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. कोणत्याही दबावाशिवाय, मोकळेपणाने, परिणामांची माहिती असताना आपण आपल्या नात्यांसंबंधी निर्णय घेऊ शकलो पाहिजे. या सदरामध्ये आम्ही निवडीच्या अधिकाराविषयी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीविषयी बोलणार आहोत.

या देशात आजही मुली स्वतंत्र नाहीत म्हणून?

कोल्हापूरच्या १७ वर्षांच्या ऐश्वर्या लाडचा खून तिच्या भावानेच केला. ती फॅशनेबल राहायची म्हणून? ती व्हॉट्सॅप, फेसबुकवर मुलांशी चॅट करायची म्हणून? ती कॉलेजच्या कॅऩ्टीनमध्ये मुलांशी बोलायची म्हणून? ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार…

जोडीदाराची निवड आणि अपेक्षा

आपला जोडीदार कसा असावा, दिसायला आणि वागायला कसा असावा यासंबंधी आपल्या काही कल्पना असतात. काही वेळा कल्पना स्पष्ट असतात तर काही वेळा जराशा धूसर. आपल्या मनात असणारा किंवा असणारी व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून मिळेल असंच नाही. अनेक वेळा…

संमती म्हणजे काय?

आपण काय करतोय ते पूर्ण माहित असताना, आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते माहित असताना दिलेली म्हणजे माहितीपूर्ण संमती (इन्फॉर्म्ड कन्सेन्ट). दबावाखाली, धमकी देऊन, इमोशनल ब्लॅकमेल करून (उदा. तू माझ्याबरोबर संबंध ठेवले नाहीस तर…