Browsing Category

लिंगभावाची व्यवस्था

स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान, स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख, स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात…
असे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं, कसं रहायचं हे आपण शिकतो आणि त्यासोबतच काय करायचं नाही, कसं वागायचं नाही हेही आपण शिकू लागतो. काही गोष्टी मुलग्यांसाठी योग्य किंवा चागल्या समजल्या जातात तर काही गोष्टी फक्त मुलींसाठी योग्य मानल्या जातात. या सर्व भावना, अपेक्षा आणि भूमिकांमुळे आपली विभागणी स्त्री, पुरुष आणि इतर अशी होते. स्त्रियांना आणि पुरुषांना काही विशेष अधिकार देण्याच आले आहेत तसंच त्यांच्यावर काही बंधनंही घालण्यात आली आहेत. या सर्व नियम आणि व्यवस्थेतून स्त्री आणि पुरुष घडवले जातात.
पण ही विभागणी समान नाही. यातल्या स्त्री पुरुषांच्या भूमिका सारख्या किंवा समान नाहीत. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात किंवा ट्रान्सजेण्डर आहात यावर तुम्हाला मिळणारे अधिकार अवलंबून असतात. तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही तुमचे निर्णय स्वतःचे स्वतः घेऊ शकता का, तुम्हाला विकासाच्या संधींचा पुरेपूर लाभ मिळतो का या गोष्टी तुम्ही कोण आहात यावर अवलंबून असतात. स्त्रियांचं क्षेत्र म्हणजे घर या धारणेमुळे स्त्रियांवर मर्यादा आल्या तसंच पुरुष म्हणजे कर्ता कमवता, धाडसी, भवनिक नसणारा अशा अपेक्षांमुळे पुरुषावरही काही प्रमाणात मर्यादा आल्या. अर्थात त्यातून येणारे अधिकार स्त्रीपेक्षा पुरुषाकडे जास्त आहेत.
आपल्यावर लिंगभावाच्या या व्यवस्थेचा कसा परिणाम होतो, आपल्यावर कोणत्या मर्यादा येतात आणि कोणते अधिकार आपल्याला मिळतात ते तपासून पाहू या. मुलगी किंवा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या जास्तीत जास्त कशा वापरू शकू यासाठी प्रयत्न करू या.

माझं शरीर माझा हक्क! #SexStrike

जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मी टू’ प्रकरणानंतर आता हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे. एलिसाने यासाठी जगभरातील महिलांना ‘सेक्स स्ट्राइक’ करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एलिना…

सुरुवात स्वतःपासूनच करायला पाहिजे !!!

केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे महिला हक्क कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र  हा निकाल सर्वसामान्य लोक मनापासून स्वीकारतील का?  …

बायकांचं धाडस वाढतंंय!

गेल्या दशक-दीड दशकात बायकांच्या जगण्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक -सार्वजनिक राहणीमान, आचारविचारांचा विस्तारलेला परीघ, करिअरमधे पार केलेले मोठे टप्पे अशी अनेक उदाहरणं त्यासाठी देता येतात. लोकशिक्षणामुळे समाजातून मिळणारं…

…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!

बाळाला पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसतं. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसते ती आई. या काळात बाळासाठी आईच नंबर वन असते; पण बाबानं ठरवलं तर तोही बाळाच्या या विश्वात प्रवेश करू शकतो. पण ठरवलं तर... पप्पा…

समर्पण

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो की गांधींची कस्तुरबा असो. यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण  देणारा पुरुष जर…

​बाईच्या व्यथा आणि श्रावणाच्या कथा 

कालपासुन श्रावण सुरु झाला. भारताच्या कॅलेंडरमधील सर्वाधिक सण, व्रतवैकल्ये या महिन्यापासून सुरु होतात. चातुर्मासातील सर्वाधिक पवित्र काळ. वेगवेगळ्या प्रकारचे सण, उत्सव, उपास-तापास कालपासुन सुरु झाले. पाऊस सुरु आहे, सगळीकडे थंडी आणि हिरवळीचं…

व्यभिचाराचे वास्तव – छाया दातार

सध्या केरळच्या न्यायालयात एक याचिका आहे. व्यभिचाराबद्दल स्त्री व पुरुष यांना समान शिक्षा का नाही, हा प्रश्न विचारला आहे. घटनेत जर दोघे समान तर इथे लिंगभाव का, असा मुख्य सवाल आहे... व्यभिचाराची सर्वसामान्य व्याख्या आणि या कलमाखाली आलेला…

सहजीवनातील लिंगभाव

लिंग हे शारीरिक असते आणि लिंगभाव हा सामाजिक असतो. आपले कपडे, आपली वागणूक, जबाबदाऱ्या, कर्तव्य एक स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून कसे असावे हे जेव्हा समाज ठरविताना दिसतो, तो लिंगभाव. पुरुषांनी एकदम खंबीर असायला पाहिजे असं म्हणतांना एक माणूस…

हल्लाबोल – किरण मोघे

सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींबाबतीत नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल देऊन त्यांच्या कारवायांना चाप बसवण्यासाठी काही मार्गदर्शक सूत्र जाहीर केली आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. एक तर ही याचिका २०१० पासून प्रलंबित होती,  आणि दरम्यानच्या…