Browsing Category

I Soch

सध्या कॉलेजमध्ये आणि बाहेरही घडत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी हिंसक व शोषण करणाऱ्या नातेसंबंधात अडकत आहेत तसंच मुली, छेडछाड वं लैंगिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे तातडीने या वयोगटातील मुला-मुलींशी संवाद वाढवण्याची गरज आहे. त्यांच्या स्वतःच्या व इतरांविषयी असणाऱ्या लैंगिकतेविषयी समजुती व दृष्टीकोण समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे व कोणावरती दोषारोप नं करता लैंगिकतेबद्दल सकारात्मक आणि निकोप संदेश पसरवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून, पुणे आणि परिसरातील ३० महाविद्यालयांमधून १६ ते २४ वयोगटातील मुला-मुलींबरोबर “आय सोच” हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला National Foundation for India या संस्थेचे अर्थसहाय्य लाभले आहे. “आय सोच” प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे तरुण, कॉलेज वयीन मुलामुलींशी लैंगिकता या विषयासंबंधात एकत्र येऊन चर्चा करणे, त्यांचा दृष्टीकोण समजून घेणे, त्यांच्या शंका-कुशंकांना वाट मोकळी करून देणे व लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश पसरवून एक निकोप समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे. हे सर्व करताना एक मुख्य गोष्ट ध्यानात घेतली गेली आहे आणि ती म्हणजे लैंगिकते संबंधात चर्चेत येणारे सर्व मुद्दे जरी गंभीर असले तरी ते मूळ मुद्द्यापासून दूर नं जाता रंजक व गमतीशीर पद्धतीने मांडले जातात. मोबाईल व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणे हा या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे. प्रत्येक महाविद्यालयात तयार केलेल्या ४-५ मुला-मुलींच्या मुख्य गटांमार्फत मोबाईल व इंटरनेट च्या माध्यमातून सतत लैंगिकतेसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाते उदाहरणार्थ लिंगभाव, सकारात्मक लैंगिक दृष्टीकोण, निकोप परस्पर संबंध, हिंसा इत्यादी. मुला-मुलींसोबत केल्या जाणाऱ्या चर्चांसोबत, लैंगिकतेविशयी सकारात्मक संदेश पोचवण्याकरीता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध ध्वनीचित्र फितींची निर्मिती करणे हा देखील या प्रकल्पाचा मुख्य भाग आहे.

मोबाईलचा गैरवापर थांबवा

महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड आणि छळवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात तर छळवणूकीच्या नेहमीच्या प्रकारांबरोबरच “सायबर बुलिंग” म्हणजेच इंटरनेट किंवा फोन इत्यादींचा वापर करून केली जाणारी छळवणूक असे अनेक नवनवीन…

वेबसाईटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

अभिनंदन !!! चिअर्स !!! कॉंग्रॅच्युलेशन्स !!! आपल्या वेबसाईटला  एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल वेबसाईटच्या निर्मितीसाठी आणि वेबसाईट यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे विशेषतः तुम्हा वाचकांचे मनापासून आभार आणि अभिनंदन ! लैंगिकतेबद्दल…

महिलांसोबत होणारी छेडछाड

‘मुलगी म्हंटल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं?’ ‘छेडछाड म्हणजे नक्की काय?’ ‘मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त प्रमाणात छेडछाडीला सामोरं जावं लागतं हे खरं आहे का?’ ‘तुम्ही कधी छेडछाडीला सामोरं गेला आहात का?’ ‘तुमच्यासोबत छेडछाड झाल्यावर तुम्ही…

‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा…

सोच …. ऐसा भी होता है ……

सोच .... ऐसा भी होता है ...... ‘पुरुषांनी नोकरी करायची आणि स्त्रीने घर  सांभाळायचे’  हे आपण जितक्या सहजपणे स्वीकारतो तितक्याच सहजतेने ‘स्त्रीने नोकरी करायची आणि पुरुषाने घरकाम’ हे स्वीकारायला आपण तयार आहोत का?…

बदला किंवा आत्महत्या?

No one saves us but ourselves. No one can and no one may. We ourselves must walk the path. - Gautama Buddha. एका लहान गावातील मुलाची ही कथा. त्याचं नाव अक्षय. अकरावीत असणारा अक्षय साध्या, मध्यमवर्गीय घरातला. अभ्यासात तसा फार हुशार…

दिल खोल, चुप्पी तोड

समाजात लैंगिक शोषण, छेडछाड, बलात्काराच्या घटना एकीकडे वाढत असताना तरुणाईवर या सर्वांचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. लिंग गुणोत्तराची विषम आकडेवारी, वाढत्या हिंसाचाराच्या घटना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती असं…

मुंबई पुणे मुंबई २ – लग्नाचा असाही विचार

सतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई पुणे मुंबई-२” हा चित्रपट वरवर पाहता एका लग्नाची गोष्ट वाटते. लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ ! या काळात, चित्रपटातील गौतम आणि गौरी ही एकदम परस्परविरोधी जोडी, एकमेकांना समजून घेण्याचा, संवाद साधण्याचा,…

No Fear No Shame – ‘I सोच’चे नवे अभियान

“ती मुलं सतत माझ्याकडे टक लावून बघतात आणि माझ्यावर शेरेबाजी करत असतात, मला खूप लाजिरवाणं वाटतं आणि टेंशन येतं.” , “ती मुलं माझी छेड काढत होती म्हणून मला कॉलेज सोडायला लागलं.” “बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका माणसाने माझ्या छातीला हात…

विजय तेंडुलकर लिखित “मित्रा” बद्दल

मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त रवी जाधव दिग्दर्शित तेंडुलकरांच्या कथेवर आधारित “मित्रा” ही फिल्म बघितली. फिल्म तशी ठीकच आहे पण कथेबद्दल तेंडुलकरांच्या दृष्टीकोनाचं कौतुक करावसं वाटलं. *केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे “कलाकाराला दूरच्या हाका ऐकू…