‘कॉलेज कट्टा, कट्यावरच्या गप्पा’- गौरी सुनंदा

1,198

कॉलेज कट्टा. शबनम, डॉली आणि राहुल रोजच भेटतात या कट्ट्यावर. कधी कॉलेज संपल्यावर तर कधी लेक्चर बंक करून. हा कट्टा म्हणजे सेकंड होमच आहे यांच्यासाठी. करमतच नाही यांना कट्ट्यावर आल्याशिवाय. इथे येऊन हे तिघे जण जगातल्या सगळ्या विषयांवर गप्पा मारतात. सगळ्या म्हणजे अगदी सगळ्याच बरं का!

(शबनम, राहुल, डॉली कट्ट्यावर भेटले आहेत आज त्यांच्यासोबत राहुलचा मित्र अजयही त्यांच्यासोबत आहे. चौघेही थोडे गंभीर दिसतायत.)

अजय: तिला जर नाहीच म्हणायचं होतं तर मग तिनं माझ्या इतक्या जवळ कशाला यायचं?

राहुल: (अजयला समजावत) अरे जवळ आली म्हणजे काय. फक्त खूप वेळ तुझ्याशी बोलायची. इतकंच ना?

अजय: माझ्याशी तासंतास गप्पा मारायची. माझी काळजी घ्यायची. अगदी सगळं सगळं शेअर करायची माझ्याशी.

शबनम: अरे, मी आणि डॉली पण तासंतास या राहुल्याशी गप्पा मारतो. सगळे प्रॉब्लेम्स शेअर करतो. तोही आमच्यासोबत सगळे प्रॉब्लेम्स शेअर करतो. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही दोघी याच्यावर प्रेम करतो. मैत्रीच्या नात्यामध्ये सुद्धा असं शेअरिंग होऊ शकतं.

डॉली: हो, अगदी बरोबर शबनम. (अजयला उद्देशून) अजय तूच वेगळा अर्थ काढला असशील.

अजय: तुम्ही पण मलाच दोष देताय. आत्तापर्यंत सगळं माझ्या मनासारखं होत गेलं. पहिल्यांदा मला वाटलं तिनं फक्त एकदा वळून पहावं,  ते झालं. मग वाटलं तिनं एक स्माईल द्यावी, तेही झालं. त्यांनतर वाटलं तिनं बोलावं, ती Coबोलली. मग वाटलं, तिनं भेटावं, ती भेटलीसुद्धा.

राहुल: अरे, सगळं मान्य आहे. पण तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं तिनं कधी तुला सांगितलं का?

अजय: नाही. तसं डायरेक्टली कधी म्हणाली नाही.  पण तिच्या बोलण्यावरून मला तसं वाटायचं.

शबनम: सॉरी अजय. पण तिनं तुझ्यावरचं प्रेम कधीच व्यक्त केलेलं नसताना तू ‘तिचं तुझ्यावर प्रेम आहे’ हे गृहीत धरलंस यात तुझी चूक आहे असं तुला वाटत नाही का?

राहुल: हो अजय. शबनम बरोबर म्हणतेय.

अजय: ठीक आहे. तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. पण काय हरकत आहे ‘हो’ म्हणायला. मी स्मार्ट आहे, हुशार आहे. तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तिनं एकदातरी माझा विचार करायला हवा होता.

शबनम: तिची इच्छा नसताना ती कशाला तुला हो म्हणेल? शेवटी तिची मर्जी.

अजय: काही कारणं नाहीत. ‘माझ्या आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन मी लग्न करणार नाही’,  असं म्हणायची कधीकधी. मी प्रपोज केलं तेव्हा म्हणाली, ‘मी फक्त तुझी मैत्रीण आहे. आपण फ्रेंड्स बनून राहुयात.’ अशी डोक्यात गेली ना माझ्या.

तिच्यामुळे मला किती त्रास झाला. तिच्यामुळे मी सिगारेट ओढायला लागलो. दारू प्यायला लागलो. माझा देवदास झाला. आता नाटकं करते. कधीकधी फोन पण करते. हे सगळं कशाला ?

डॉली: अरे पण तिनं तुला सांगितलं का, दारू पी, देवदास हो.

शबनम: मुली बोलतात याचा अर्थ हा नाही की, त्या नेहमी प्रेमात असतात. मुला-मुलींमध्ये मैत्री असू शकत नाही का?

अजय: पण तिनं थोडं लांबच राहिला पाहिजे होतं. निदान त्यामुळं मी तिच्यामध्ये गुंतलो तरी नसतो.

राहुल: अज्या, तिच्या मनात तुझ्याविषयी काहीही भावना नसताना, फक्त तुला वाटतं म्हणून ‘हो’ म्हणणं मला तरी पटत नाही. त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. मला वाटतं तू तिच्या मताचा आदर केला पाहिजेस. त्यामुळे आता तिला आजिबात फोर्स करू नकोस.

डॉली: हो अजय. तुला बरं वाटावं म्हणून आम्ही उगाच तुला काहीही सांगणार नाही. तिच्या मनात तुझ्याविषयी सध्यातरी मैत्रीशिवाय इतर कोणतीही भावना नाही, हे जितक्या लवकर स्वीकारशील. तितकं तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी हे चांगलं आहे.

शबनम: आणि कुणी नाही म्हटलं म्हणून काही आयुष्य संपत नाही. जितक्या लवकर यातून बाहेर पडशील तितकं चांगलं.

(सगळ्यांना उद्देशून)

ए चला. मी पळते. मला उशीर होतोय.

डॉली: चल मी पण येते तुझ्यासोबत मला डेक्कनला ड्रॉप कर.

राहुल आणि अजय: ओके. बाय. सिया.

राहुल (अजयला) : चल अजय. मस्त कोल्ड कॉफी पिऊयात. चिल यार. लाईफ मे ये सब होता रहता है I

लवकर बाहेर निघ या सगळ्यातून. तुमच्या दोघांचाही यात काही दोष नाही. आम्ही आहोत तुझ्यासोबत.

अजय: थॅक्स राहुल्या.

राहुल: बस का यार. तुझे पता नहीं क्या? ‘दोस्त को कभी थॅक्स नही बोलते. दोस्तको कॉफी पिलाते है I

अजय: तू तर साल्या मला लुटायला बसलायस.

राहुल: मस्करी केली. परत रडत बसशील. चल, टी. टी. एम. एम. करू.

टीप: यांसारखे प्रसंग आपण अनेकदा अनुभवतो, पाहतो. तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा. मुला-मुलींमध्ये फक्त मैत्री असू शकते का? मुलगी बोलली म्हणजे ‘ती आपल्यावर प्रेमच करते’ असे गृहीत धरणे योग्य आहे का? ‘ती आपल्या प्रेमात आहे असा मुलांचा/मित्रांचा गैरसमज होऊ नये म्हणून ‘मुलींनी मुलांपासून जरा लांबच रहावे’ याविषयी तुम्हाला काय वाटते? आपल्याला एखाद्याविषयी प्रेमभावना असेल तर तशीच भावना समोरच्या व्यक्तीची देखील असलीच पाहिजे, हा अट्टाहास योग्य आहे का? तुमची मतं नक्की कळवा.

 

4 Comments
 1. Rohan Patil says

  एखादी मुलगी आपल्याबरोबर बोलतीये म्हणजे तिचं आपल्यावर प्रेम आहे हा निव्वळ बालीशपणा आहे .. तूमचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणून तिने पण तुमच्यावर प्रेम करायला पाहिजे हा अट्टहास का ?
  प्रेम असं कुणावर लादता येत नाही .. ते आतून निर्माण झालं पायजे ..
  तीच्या मनात तूमच्याविषयी मैत्री सोडून दुसरी कुठलीच भावना नसेल तर ठीक आहे ना ! कशाला फोर्स करता .. प्रेम करता ना तिच्यावर .. मग तिच्या मताचा पण आदर ठेवा ना ..

  1. I सोच says

   खरं आहे रोहन… काही मुलांना हे स्वीकारणे जड जाते… आपल्या समाजामध्ये स्त्रीला नकार देण्याचा अधिकार आहे हे मान्यच केले जात नाही. तुझे मत अगदी बरोबर आहे… आपण असाच सकारात्मक दृष्टीकोन पसरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुझ्या मताबद्दल धन्यवाद. नक्की लिहित जा…

 2. Pogul G.A. says

  Rohan Tuja Mat Chan Vatala….Kharach Aplya samjat Mulaga ni mulagi chan mitra rahu shakat nahit haa Khup mota gair samaj ahe….Aadi mala hi tasach vatayach….Apan Ya…Website varche Lekh Vachun majya vichar ra made badal jalet …chan Vatata…ani …Ani…Muli Khup samjudar astat …Asa Mala anubhav alay……Kai Ghosti…Mulan peksha Mulina….Sangayala …. Better Vatata….

  1. I सोच says

   Thanks for your response.

Comments are closed.