आत्महत्येचा विचार येतोय? कनेक्टिंग हेल्पलाईन +९१-९९२२००११२२
नैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे मानसिक आणि भावनिक आधार दिला जातो. आत्महत्या प्रतिबंध, आत्महत्येची घटना घडलेल्या कुटुंबांना भावनिक आधार आणि भावनिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘कनेक्टिंग’ ही स्वयंसेवी संस्था काम करत आहे.
कनेक्टिंग हेल्पलाईन- ९९२२००११२२, टोल फ्री क्रमांक १८००२०९४३५३
वेळ- दुपारी दोन ते रात्री आठ
आत्महत्येचा विचार मनात आलेल्या आणि भावनिक ताण-तणावातून जाणाऱ्या व्यक्ती संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून बोलून आपले दु:ख हलके करू शकतात.
sex chya veles body tapate..yache karan Kay aahe.
मनात लैंगिक भावना तयार झाल्यावर आणि सेक्स/लैंगिक संबंधांदरम्यान हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छवास आणि रक्तप्रवाह वाढतो. व्यक्ती उत्तेजित झाल्यावर हृद्य मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर टाकते त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त रक्तप्रवाह शरीरभर वाढतो आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. शिवाय सेक्स करताना एनर्जीची आवश्यकता असते. एनर्जी तयार झाली की आपोआपच शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे सेक्सवेळी शरीर गरम होते. पण त्यात काळजी करण्याचे काहीच कारण नाही, हे अगदी नैसर्गिक आहे.
जर अजुन काही प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.
मी एका मुलीवर खुप प्रेम करतो आणि ते मी तिला विचारले होते पण तिने मला काहीच उत्तर दिले नाही तर मी काय समजायचे??