नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी

119,916

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, शारीरिक ओढ म्हणून किंवा कधी कधी जबरदस्तीनेही लैंगिक संबंध केले जातात. लैंगिक संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता असते. ही गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना गर्भनिरोधकं असं म्हणतात.

गर्भनिरोधक म्हणजे काय ?

गर्भनिरोधक म्हणजे असं साधन किंवा पद्धत ज्यामध्ये गर्भधारणा किंवा गर्भाची वाढ टाळता येईल. यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीजाचं मिलन रोखणे, फलित बीज गर्भाशयाच्या भिंतीवर रूजू न देणे किंवा ठराविक काळाच्या आत रुजलेला गर्भ काढून टाकणे असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यातलं सुरक्षित काय आणि शरीरासाठी घातक काय ते जाणून घेऊन मग त्या साधनांचा वापर करणं कधीही चांगलं.

नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.

सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक पद्धती

पुरुषांनी वापरायचा निरोध किंवा कंडोम हे सर्वात सुरक्षित गर्भनिरोधक आहे. निरोध लॅटेक्सपासून बनवलेला असतो आणि तो अतिशय चिवट व लवचिक असतो. लैंगिक संबंधांमध्ये जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर होतं तेव्हा निरोध उलगडून लिंगावर चढवायचा असतो. संभोगानंतर वीर्य निरोधमध्ये गोळा होतं. वीर्य त्यातून बाहेर येणार नाही याची काळजी घेऊन निरोध लिंगावरून काढायचा व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची. निरोध हे सर्वात सुरक्षित गर्भनिरोधक आहे. गर्भनिरोधन करण्यासोबतच निरोध लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासूनही बचाव करतो.

स्त्रीच्या पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन झाल्यानंतर म्हणजेच स्त्री बीज बीजकोषातून बाहेर येऊन बीजनलिकेत आल्यानंतर जर पुरुष बीजाचा त्याच्याशी संयोग झाला तर गर्भधारणा होऊ शकते. स्त्री बीज बीजकोषातून बाहेर येण्याची प्रक्रिया विशिष्ट संप्रेरकांवर अवलंबून असते. संप्रेरक गोळ्या किंवा तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या स्त्री बीज बीजकोषातून बाहेर पडू देत नाहीत आणि त्यामुळे अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या 28 दिवस पाळीच्या पाचव्या दिवसापासून रोज एक गोळी अशा रीतीने घ्यायच्या असतात. यातील 21 गोळ्या संप्रेरक असणाऱ्या आणि 7 गोळ्या लोहाच्या असतात. गोळ्या संपल्या की 1-2 दिवसात पाळी येते. या गोळ्या प्रभावी असल्या तरी त्या रोज न विसरता घेणं गरजेचं आहे. तसंच दर 3 महिन्यानी मध्ये 1 महिना गोळ्या न घेता पाळी चक्र नीट काम करतंय का तेही पाहणं गरजेचं आहे. सलग वर्षानुवर्षं गोळ्या घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचा वापर करा.

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही.

संभोगाच्या आधी स्त्रीच्या योनिमार्गात सरकवून ठेवता येतील अशा शुक्राणूनाशक किंवा पुरुषबीज नाशक गोळ्या मिळतात. या गोळ्या योनिमार्गामध्ये ठेवल्यावर वितळतात आणि त्याचा परिणाम म्हणजे पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीजं मरतात. ही पद्धत पूर्णपणे निर्धोक नाही. त्यामुळे त्यासोबत निरोध वापरणं कधीही चांगलं. टुडे नावाने या गोळ्या बाजारात मिळतात

नावाप्रमाणे या गर्भनिरोधक साधनाला एक तांब्याची तार गुंडाळलेली असते. या प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांना गर्भाशयात ठेवण्याची साधने किंवा इन्ट्रा युटेरिन डिव्हाइस (IUD) म्हणतात. तांबी ही प्लास्टिकची असते आणि त्याला तांब्याची तार गुंडाळलेली असते. गर्भाशयामध्ये बसवल्यानंतर तांब्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे गर्भाशयाच्या भिंतीवर गर्भ रुजू शकत नाही. तांबी 3 वर्षं आणि 10 वर्षं वापरता येते. काही जणींना तांबी बसवल्यानंतर खूप जास्त रक्तस्राव होतो व वेदना होतात. असा त्रास होत असेल तर तोंबी काढून टाकणं उत्तम. शक्यतो दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासाठी तांबी हे साधन वापरलं जातं. सरकारी दवाखान्यामध्ये तांबी मोफत मिळते.

भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती पुढीलप्रमाणे – १. डायलेशन आणि क्युरेटींग – गर्भाशयाचे अस्तर साफ करणे स्थानिक किंवा संपूर्ण भूल देऊन गर्भाशयाचं तोंड मोठं केलं जातं. त्यानंतर एका चमच्यासारख्या उपकरणाने गर्भाशयाचे अस्तर काढून टाकतात. यामुळे गर्भ रुजला असेल तर तो निघून जातो. २. शोषण पद्धत – गर्भाशयाचे अस्तर नळीने शोषून घेणे विजेवर चालणाऱ्या किंवा हाताने चालवायच्या एका नळीतून हवेच्या दाबाचा उपयोग करून गर्भाशयाचे अस्तर शोषून घेतले जाते. ही पद्धत सर्वात सुरक्षित आहे. ३. गर्भपाताच्या गोळ्या – दोन प्रकारच्या गोळ्या घेतल्यानंतर गर्भ गळून पडतो. औषधांचा वापर करून गर्भपात केला जातो. तोंडाने घ्यायच्या एका गोळीमुळे गर्भाची वाढ थांबते आणि दुसऱ्या गोळीमुळे गर्भाशयाचे आकुंचन व प्रसरण होऊन गर्भाशयाचे अस्तर गळून पडते. वरील सर्वच प्रकारच्या गर्भपातासाठी वैद्यकीय तपासणी आणि देखरेख आवश्यक असते. वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या गर्भपात केंद्रामध्ये सर्व सुविधा मिळणं आवश्यक आहे.

यापुढे मूल नको असेल तर वापरण्याची कायमस्वरूपी गर्भनिरोधक पद्धत म्हणजे नसबंदी. स्त्रियांमधील नसबंदी दोन प्रकारे केली जाते. टाक्याची आणि बिन टाक्याची. १. टाक्याची नसबंदी – स्त्रीच्या ओटीपोटावर छोटा छेद देऊन दोन्ही बीजनलिका मध्ये कापतात, बांधतात किंवा त्या बंद करण्यासाठी त्यांना मध्ये रिंग अडकवतात. बीजनलिका मध्ये बंद झाल्यामुळे बीजकोषातून बीज बाहेर आले तरी ते बीजनलीकेपर्यंत पोचू शकत नाही आणि पुरुष बीजाशी त्याचा संपर्क येत नाही. २. बिनटाक्याची नसबंदी – या प्रकारची नसबंदी लप्रोस्कोपने करतात. यासाठी फार काल दवाखान्यात राहावे लागत नाही. कुठल्याही प्रकारे नसबंदी केली तरी जिथे शस्त्रक्रिया केली जाते तिथे पुरेशी स्वच्छता असायला पाहिजे. तसेच २० वर्षाखालील आणि १२ पेक्षा कमी हिमोग्लोबीन असेल तर नसबंदीची शस्त्रक्रिया करत नाहीत. त्यामुळे ही तपासणीदेखील करून घेणं गरजेचं आहे. स्त्रीची नसबंदी पुरुषाच्या नसबंदीपेक्षा अवघड असते.

ही पुरुषांसाठीची सोपी कायमस्वरूपी गर्भनिरोधक पद्धत आहे. वृषणावर छोटा छेद देतात आणि बीजनलिका मध्ये कापून त्यांची तोंडं बंद करतात. यामुळे बीजं वीर्यामध्ये मिसळत नाहीत. नसबंदी झाल्यानंतर पुढचे किमान तीन महीने किंवा २० लैंगिक संबंधांपर्यंत निरोध वापरावा. कारण काही बीजं आधीच वीर्याकोशात गेली असतील तर त्यापासूनही गर्भधारणा होऊ शकते. पुरुषांची नसबंदी ही सर्वात सोपी आणि सुरक्षित गर्भनिरोधक पद्धत आहे. या शस्त्रक्रियेचा लिंगाच्या स्नायू किंवा नसांशी संबंध येत नसल्याने लैंगिक संबंधांमध्ये कसलाही अडथळा येत नाही.

205 Comments
 1. sp70162@gmail.com says

  girl shi sex n krta semen jr vagina chya aaspas padle tr pregnency rahu shkte ka….????

  n jr ho tr 1mnth nantr ata natural and medicinal upay ky

  1. I सोच says

   वीर्य योनीच्या आसपास पडलं म्हणजे सेक्सच आहे ना… फक्त संभोग म्हणजे सेक्स नाही.
   जर असे संबंध मुलीच्या पाळीच्या साधारण दोन आठवडे आले असतील तर गर्भधारणेची शक्यता आहे. वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुषबीजं असतात. त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं. जर अंडोत्सर्जनाच्या काळात म्हणजेच पाळी येण्याच्या आधी साधारणपणे 12-16 दिवस संबंध आले असतील तर ही शक्यता सर्वात जास्त आहे. पाळीदरम्याल गर्भधारणेची शक्यता कमी असली तरी अजिबातच नसते असं नाही. गर्भधारणा कशी होते हे समजून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/conception/
   सर्वात आधी एक करा, टेन्शन न घेता, न घाबरता दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर खात्री वाटत नसेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. घाबरू नका. असं होऊ शकतं. गर्भ राहिला असेल तरी लवकर तपासणी केलीत तर औषधांचा किंवा काही साध्या उपायांचा वापर करून गर्भपात करता येतो. गर्भापत करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. नैसर्गिक उपाय किंवा कसल्याही घरगुती उपायांमध्ये वेळ घालवू नका. गर्भपात करण्यामध्ये काही चुकीचं, वाईट, पाप नाही. (अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/abortion/)
   पाळी आली तर काळजीचं कारण नाही. मात्र पुढे काळजी घ्या. इतक्या सगळ्या टेन्शनपेक्षा कंडोम वापरणं नक्कीच सोपं आहे. https://letstalksexuality.com/contraception/

 2. arvind says

  माझें संबंध 11 व्या दिवसी आले तर गर्भधारणा होऊ शकते का

  1. I सोच says

   ११ व्या दिवशी संबंध आले तर गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नन्सी आहे की नाही याची खात्री करा. मेडिकलच्या दुकानात प्रेग्नन्सी कीट मिळते त्यावरील दिलेल्या सूचनांनुसार प्रेग्नसी आहे की नाही हे पाहता येईल. प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य.

   अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/conception/

   1. संदीप says

    सेक्स केल्यानंतर वीर्य बाहेर पडत त्याच कारण काय आहे?

    1. let's talk sexuality says

     मुलगा वयात आला की त्याच्या विर्यकोषात वीर्य तयार व्हायला लागतं. त्याचबरोबर त्याच्या वृषणात असंख्य (कोट्यावधी) पुरुषबीजांची निर्मिती होऊ लागते. कारण आहे प्रजोत्पादन! लैंगिक संबंध हा प्रजोत्पादनाचाच भाग आहे. म्हणुन वीर्यपतन होतं.
     अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/male-body/ ही लिंक पहा.

   2. Yogesh says

    mi sex kel ani unwanted 72 dili hoti mg priyads kadhi yetin

    1. let's talk sexuality says

     बर्यापैकी महिलांची पाळी वेळेवर येते. काहींच्या बाबतीत पुढची पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते. काहींना पुढची पाळी येण्याच्या आधी अनपेक्षितपणे योनीतून रक्तस्त्राव होऊ शकतो. जर पुढच्या पाळीला एक आठवड्यापेक्षा जास्त उशीर झाला तर गर्भधारणेची चाचणी करुन घ्यावी.
     पुढील लिंक नक्की पहा.
     https://letstalksexuality.com/ecp/

     1. Shailesh says

      Without condom sex kela pan virya baher padle hote aat nahi. Pan baykola period yenyachya tarikh ultun 2 divas zalet pan period zala nahi. Pregnant rahu shkte ka. Ata pregnancy nako ahe ti talnyasathi upay sanga. Pali nantar 12 divshi sex kelay.

     2. let's talk sexuality says

      प्लीज डोन्ट पॅनिक. सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा. जरी झाली असेल तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करू शकता. कृपया कोणताही घरगुती उपाय करू नका.

      संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर/योनीजवळ पडले/पॅन्टवर पडले. तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हे पातळ असते. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

      आता राहिला प्रश्न गर्भधारणेचा तर तुमचे लैंगिक संबंध तुमच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले आहेत का? (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)

      तुमची मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

 3. Ganesh says

  please help mi

  1. I सोच says

   तुम्हाला कोणत्या प्रकारची हेल्प हवी आहे ते जर समजले तरच आम्ही तुम्हाला मदत करू शकू…

   1. geeta patil says

    मासिक पाळीच्या आधी 2 दिवस सेक्स केल्याने गभ्रधारणा होते काय

    1. I सोच says

     मासिक पाळीच्या आधी दोन दिवस सेक्स केल्याने गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा नक्की कधी आणि कशी होते आणि गर्भनिरोधके यांविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
     https://letstalksexuality.com/conception/
     https://letstalksexuality.com/contraception/
     याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे वेबसाईटवर चर्चिले आहे ती नक्की वाचा. प्रश्नोत्तरांची लिंक देत आहे.
     https://letstalksexuality.com/question/

   2. pari says

    Pali houn 4 diva zale ani part rakt strav hoto tr he kashamule

   3. Ashutosh says

    माझ्या बायकोला अपेनडिक ला सूज आली आहे त्यात तिला दिवस गेले आहेत ७ आठवडे झाले आहेत आम्हाला बाळ नको आहे आम्ही pregnancy रोखू शकतो का.

    1. aute shivkanya lahurao says

     mla 1 year bal nako aahe tyasathi upya sanga

     1. let's talk sexuality says

      तुमच्या प्रश्नाचे उत्तर वरील लेखात आहेच की, याव्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती हवी आहे मग. एक वर्ष जर मुल नको असल्यास वरील पैकी तुम्ही व तुमच्या जोडीदाराने एखादा पर्याय निवडावा. शुभेच्छा!

   4. sonu says

    Sex nakki keva karaycha palicha aagodar ki natar.

    1. I सोच says

     पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

     गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
     https://letstalksexuality.com/conception/

     1. Ganesh jadhav says

      माझ्या बायकोला.. 3 महिने झाले.. मासिक पाळी आली नाही…. किट ने चेक केले तर… प्रेग्नंट आहे असे दिसले.. पण आम्हाला आता… Pregnancy नको आहे.

      काय करावे लागेल आता.

     2. let's talk sexuality says

      तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करून घ्या. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

      गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

 4. BHOSLE VIVEK says

  विर्य बाहेर पडल्यावर काही काळापुरते अशक्त असे वाटते तेव्हा काय करावे व विर्य त्वरीत निर्माण करण्यासाठी काय खायला पाहीजे ?

 5. Manish mad says

  जर मुलगी virgine आहे आणि तिच्या पोटाच्या पिशवित गाठ आहे तरी त्या मुली सोबत sex करने योग्य आहे का..?

  1. Manish mad says

   गाठ (tubercle)

   1. I सोच says

    कॄपया तुमचा प्रश्न विस्तराने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणे सोपे जाईल.

    1. Bjp says

     Unwanted 72 घेतल्यानंतर सेक्स करू शकतो का?

     1. SK says

      Unwanted 72 घेतल्यानंतर सेक्स करू शकतो का?

     2. let's talk sexuality says

      गोळी घेतल्यावर सेक्स करु शकताच की, पण आधी गोळी घ्यायची गरज का आहे? कारण असुरक्षित संबंध आले तरच पुढच्या ७२ तासांच्या आत गोळी घेतली जाते, आधी नाही. जितक्या लवकर या गोळ्या घेतल्या जातील तितकं चांगलं. असुरक्षित संबंधांनंतरच्या पहिल्या १२ तासात या गोळ्यांचा फायदा सर्वाधिक असतो. आणखी एक महत्वाचे या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही.

      अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा https://letstalksexuality.com/ecp/

  2. I सोच says

   सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नामध्ये नमूद केलेल्या ‘वर्जिनिटी’ या शब्दाविषयी बोलूयात. वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छेसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. वर्जिनिटी ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. वर्जिनिटी विषय़ी अधिक माहितीसाठी खलील लिंक वरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/virginity/

   आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. तुम्हाला मुलीच्या गर्भशयाच्या पिशवीत गाठ आहे हे कसे समजले ? डॉक्टरांनी सुचविलेल्या वैद्यकीय तपासणीमधून जर ते समोर आले आहे का ? तुमच्या प्रश्नमधून यामधील इतर काही सविस्तर माहिती लक्षात येत नाही. याबाबतीत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त फायदेशीर ठरेल असे वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे जरी डॉक्टरांनी सेक्स करण्यास हरकत नाही असे जरी सांगितले तरी त्या मुलीची इच्छा, संमती आहे का? हे पाहणे आवश्यक आहे.

 6. Pankaj shinde says

  गर्भ नको असल्यास उपाय साःगा

  1. I सोच says

   तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कृपया खाली लिंकवरील लेख वाचा.

   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/contraception/

   शिवाय वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत ती नक्की वाचा.

   https://letstalksexuality.com/question/

 7. sam says

  girl Shi sex krtanna semen jr vagina chya pant vr pdla tr pregnancy Hou shakte ka???
  period 3 months honyat yetil aaleli nahiye ajun… please upay sanga

  1. I सोच says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पाडले/पॅन्टवर पडले. तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

   पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

   गर्भधारणा झाली असेल आणि गर्भपात करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्याने करा. त्याबाबतीत तुम्हाला काही मदत हवी असेल तर ‘मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763’ वर फोन करा.

   1. sam says

    negative aahe sir test

  2. Anil says

   Sir pali nantar 8 divsani sex kela tar pregnant rahaichi kiti shaketa aahe… Pleas Sir

   1. let's talk sexuality says

    जर निरोध शिवाय लैंगिक संबंध आले असतील तर गर्भधारणेची बरीच शक्यता आहे.
    अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.

 8. S,k says

  Pali yeun et main 15divs javle tar Aarjun pali aalinahi tar pregnsi tar nasel jar pregnshi jar aasel tar pregnshi nako aasel tar Kay upay karave

  1. I सोच says

   १. गर्भधारणा हे एक पाळी चुकण्याचं कारण आहे. योग्य ते गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबध आले असतील. प्रेग्नन्सी आहे का याची खात्री करा. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. गर्भापाताविषयीच्या माहितीसाठी ‘मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763’ येथे फोन करा.
   २. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
   ३. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

 9. sujit says

  2 mahinyatel garbhpat kelyne kahe vait parenam hotta ka .
  Garbhapat kelyane kahe side effect hoto ka.

  1. I सोच says

   १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. वारंवार केलेल्या गर्भपातामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/abortion/

 10. smita says

  Mala 22 varsjacha mulga ahe . Maze 9 mahenya adhe abortion zale ahe va punha devas gele ahet . Pan mala mul nako ahe me kay karu . Puna abortion kele tar akhe vait parenam hoel ka.

  1. I सोच says

   मुल नको असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही गर्भपात करू शकता. गर्भपाताविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/abortion/

   गर्भपात हे नियमित वापरावयाचे गर्भनिरोधक नाही. वारंवार गर्भपात केल्याने स्त्रीच्या शरीरावर त्याचे दूरगामी परिणाम होत असतात.
   म्हणूनच गर्भधारणा होऊ नये म्हणून कंडोम किंवा इतर गर्भनिरोधक साधने वापरावीत. गर्भनिरोधक साधनांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/contraception/

   पुढच्या वेळी योग्य ते गर्भनिरोधक वापरा. काळजी घ्या.

 11. smita says

  Sorry Mala 22 varsjacha nahe mahenyacha (month) mulga ahe

 12. निलेश says

  मासिक पाळी ४ दिवसांचीअसते मग यानंतर किती दिवस संभोग केला नाही तर गर्भधारणा होत नाही…. कंडोम अथवा इतर कशाचा वापर करायचा नसल्यास तर किती दिवस संभोग केला नाही पाहीजे…

  1. I सोच says

   याविषयीचे अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत.

   https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-signs/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

   https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/

   अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे – https://letstalksexuality.com/question/

 13. Nilesh says

  4-5 दिवस झाले आहेत मासिक पाळी आली नाही ।
  डाॅक्टरांनी सांगितले आहे की प्रेग्नंट आहे। आम्हाला मुल अत्ताच नको आहे तर काय करावे लागेल ।
  प्लिज लवकर रिप्लाय द्या ।

  1. I सोच says

   प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
   भारतामध्ये 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात कायदेशीर आहे. पहिल्या 12 आठवड्यात म्हणजेच गर्भधारणा झाल्यापासून पहिले तीन महिने गर्भपात सुरक्षित असतो. त्यामुळे गर्भपात करायचा असल्यास तसा निर्णय लवकर घेणं आणि शक्यतो पहिल्या तीन महिन्यात गर्भपात करून घेणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. 12 आठवडे उलटून गेले असतील तर दोन डॉक्टरांच्या संमतीने गर्भपात करून घेता येतो.
   गर्भपात नोंदणीकृत दवाखान्यामध्येच करून घ्या. 20 आठवड्यांनंतर गर्भपात कायदेशीर नाही. त्यामुळे जास्त वेळ न दवडता गर्भपाताचा निर्णय शक्यतो लवकर घ्या. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/abortion/
   गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर खालील हेल्पलाईनवर फोन करा.
   मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763
   https://letstalksexuality.com/helpline-abortion/

 14. Ganesh says

  Viry yonichya javal padal aahe masik pali yenyachya 2 aathvde aadhi sambhndh alta sambhog karatana nirodhak fatal hot tyamul viry yoni javal thodas sandl hot pn aata aamhala bhiti vatatiy pregnancy chi plzz help

  1. I सोच says

   मासिक पाळी येण्याआधी दोन दिवस लैंगिक संबंध आले असतील तर गर्भधारणेची शक्यता कमी आहे. मात्र योनीमैथुन करत असताना वीर्य योनिबाहेर पडले तरी अजिबातच योनीत गेले नाही असं खात्रीनं सांगता येत नाही. मासिक पाळीचक्रातील गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर गर्भधारणा होण्यास एक शुक्राणू देखील पुरेसा असतो. त्यामुळे इथून पुढे लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भधारणा नको असेल तर कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकाचा वापर करणे आवश्यक आहे. गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/contraception/

 15. Nitesh says

  21 divs zalet sambog krun pregnent aahe abortion kranyasathi tablet suchva amhi jau shakat nahit hospitl mde plzz sir help kra amhala kahihi karun abortion krayche aahe pn dctr kde n jata

  1. I सोच says

   प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.
   कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

   अधिक माहितीसाठी तुम्ही 9075 764 763 या मर्जी हेल्पलाईनला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये फोन करू शकता. या हेल्पलाईन विषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा.

 16. Prashant says

  Sambhog karnyacha yogya to period sanga ki ty veles sambhog kel ki pregnancy hot nahi

  1. I सोच says

   हे संबंधित स्त्रीच्या मासिक पाळीचक्र आणि अन्डोत्सर्जनचा काळ यावर अवलंबून आहे.
   याविषयीचे अनेक लेख आणि प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत. ती वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

   https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-signs/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

   https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/

   अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे – https://letstalksexuality.com/question

 17. Nitesh says

  Bina condom ch sex kraych aahe pn garbh hi rahayla nko ky krav tablet vagaire suchva

  1. I सोच says

   खरंतर पुरुषांनी गर्भनिरोधनामध्ये जबाबदारी घेणे गरजेचे आहे. मासिक पाळीतील वेदना, बाळाला जन्म देण्याची जबाबदारी व त्यातील वेदना हे स्त्रीलाच सहन करावे लागते. पुरुषांची जबाबदारी म्हणून कंडोम वापरणे आवश्यक आहे. कंडोम हे सोपे आणि सोयीस्कर गर्भनिरोधक साधन आहे. कंडोम वापरल्याने लैंगिक आनंदावर काहीही परिणाम होत नाही. अनेकदा गर्भनिरोधक साधने आहेत ती स्त्रियांनाच वापरावी लागतात. गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, इंजेक्शन यांसारखी साधने शरीराच्या आत घ्यावी लागतात. त्याचा परिणाम स्त्रिच्या शरीरावर होत असतो. त्यामानाने कंडोम हे पुरुषासाठी वापरण्यास सोपे आहे.
   गर्भनिरोधकांविषयी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/contraception/

 18. Bhairavi Vijay Kapse says

  जर संभोग निरोधक वापरून केले असेल आणि वीर्य थोडेसे खाली योनि जवळ पडले असेल तर गर्भवती राहण्याची शक्यता असेल का आणि असली तरी 2 महीने न आलेल्या पाळी वरुन असे ठरवता येईल का की मी गर्भवती आहे पाळी न येणे या शिवाय पाळी असण्याचे कोण तेच लक्षण दिसत नाही आहेत मि प्रेगनेंसी टेस्ट देखिल करुन घेतली निगेटीव आलीपण पाळी अजून आलि नाही

  1. I सोच says

   गर्भधारणेस पूरक काळात संबंध आले तर अगदी थोडंसं वीर्य योनीमार्गात गेलं तरी देखील गर्भधारणा होऊ शकते त्यामुळे कंडोमचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
   १.मासिक पाळीची तारीख उलटून गेली आणि पाळी आली नाही तर प्रेग्नंसी कीटच्या सहाय्याने गर्भधारणा आहे का याची खात्री करा.
   २.प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
   अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/abortion/
   गर्भपाताबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर खालील हेल्पलाईनवर फोन करा.
   मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763
   https://letstalksexuality.com/helpline-abortion/
   ३.गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

 19. Rohit says

  Sex karaychya agodar otipoti khup dukhu yete mhnje bharun yete…Asa ka hote tya sathi kay karava lagel

  1. I सोच says

   तुम्हाला लैंगिक संबंधांविषयी भीती किंवा नकारात्मक भावना आहेत का? लैंगिक संबंधाबद्दलची प्रत्येक भीती, चिंता तुमच्या जोडीदाराला सांगा. तिचे विचार, असतील तर प्रश्न समजून घ्या. बोला. पहा, कदाचित अनेक चिंता ह्या अनाठायी होत्या असे लक्षात येईल. लैंगिक नातेसंबंध, मग ते लग्नाअगोदर असोत किंवा नंतर, परस्पर विश्वास, संमती, आदर या मुल्यांवर आधारित असतील तर अधिक सुखकारक आणि आनंदी होतात. पहिल्यांदाच अशा गंभीर नातेसंबंधात प्रवेश करताना अनेक किंतु-परंतु (anxieties) सगळ्यांच्याच मनात असताता. मुलींसाठी ती अधिक चिंतेची बाब असू शकते. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर बोला. लैंगिक संबंध म्हंजे नेमकं काय, त्यांचे महत्व माणसांच्या जीवनात का आणि कसे असते या मुद्द्यांवर माहिती मिळावा. आपल्या वेबसाईट वर या विषयांना धरून खूप सखोल चर्चा चालू असते. ते लेख वाचा, एकत्र. इतरांची पण सुज्ञ आणि समंजस अशा जवळच्या माणसांची मदत घ्या.

   हे करूनही जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तणाव (स्ट्रेस) जाणवत असेल तर आपल्या माहितीतील व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या. चिंता करू नका. ऑल दि बेस्ट..

   खाली काही लिंक्स देत आहे. त्यावरील लेख वाचा. तुम्हाला मदत होईल.

   https://letstalksexuality.com/what-is-sex/

   https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

 20. Vijay says

  प्रेगनंसी नंतर पाळी येते का किंवा अंगावर चे जाते का

 21. Kavita Golambade says

  2न पेक्षा जास्त वेळा गर्भपात केल्यास जीवाला किंवा पुढ्याच्या वेळी होणाऱ्या गर्भधरणाला काही त्रास होऊ शकतो का । pls help mi

 22. NARENDRA says

  Masik pali alelya divshi jr sambnd prasatpit zal tr garbhdharna hou skte ka

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी टेस्ट करायला हवी.

   अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/sex_during_periods/

 23. radhey says

  आम्ही पाळीच्या पाचव्या दिवशी संभोग केला पण मी निरोधाक वापरला होता. किट वर टेस्ट पण केली ती पण निगेटिव्ह आली. परंतु 4 फेब्रुवारी होती . मग अजून पाली आली नाही. आम्हाला भीती वाटत आहे की गर्भधारणा तर नसेल झाली. आणि तस असेल तर उपाय काय?

  1. Manu thale says

   Palichya 15 vya diwashi sabandh aala. Pregnancy tar nahi na rahnar sir ?

   1. let's talk sexuality says

    जर तुम्ही निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवले असल्यास गर्भधारणा होण्याची दाट शक्यता आहे.

    सगळ्यात आधी मासिक पाळीची वाट पाहा. जर पाळी वेळेवर आली तर मग गर्भधारणा नाही हे नक्की. पण जर पाळीची तारीख उलटून गेली असेल तर दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

    गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

 24. Vilas Naik says

  Majhya Wife chi masik pali chukali mhanun aamhi pregnensy test keli pan ti negative aali tyananter 1 week tila pali aali nahi aata aamhi aaj morning la 4 vajata punha test keli tyat negative report aala pan sakali 7 vajata tya kit var positive report disat hota tar aata tablet ghyave lagtil ki doctors opinion? Please help me doctor. We have 2 childrens & this happen in first time so I am just worried about herself. Kindly give the suggestion.

 25. Shankar says

  Masik palit urin test karu shakto ka?(pregnancy test)

  1. I सोच says

   मासिक पाळीच्या काळात प्रेग्नंसी टेस्ट करू शकतो.

 26. sachin says

  ek vel sex karun garbh dharna hou shakate

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.
   https://letstalksexuality.com/conception/

 27. दत्ता डवले says

  माझे लग्न होऊन मला चार महिने झाले आहे तिला आणि मला इतका लवकर मुल नको त्यासाठी काय करावे व गर्भ टाळण्यासाठी किव्हा पडण्यासाठी काय कारावे कुपया मला सांगा

 28. prem says

  Sir anal sex kelyantr pregnancy hovu shkte ka… Ani vegena sex krtana viry aat nhi gel tri pregnancy hovu shkte ka?

  1. I सोच says

   नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे. https://letstalksexuality.com/ask-questions/

   काही वेळेस लेखाखालील प्रतिक्रियांना उत्तर देण्याचे राहून गेले आहे हेही आमच्या ध्यानात आले आहे. आपल्या कमेंट्सला त्वरित उत्तर देण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. तेंव्हा आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया आवश्य द्या. आभारी आहोत.

 29. gajanan says

  Sir pali ali nasalyavar ti kiti divasachi pregnant ahe kasa kalel

  1. I सोच says

   नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. गर्भानिरोधकांविषयीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/contraception/

 30. gajanan says

  नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी काही उपाय असेल तर सागा ….

  1. I सोच says

   नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्या प्रश्नांना त्वरित उत्तरं देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच आपल्या वेबसाईटवर प्रश्नांसाठी आपण एक खास जागा उपलब्ध करून दिली आहे. https://letstalksexuality.com/ask-questions/

   काही वेळेस लेखाखालील प्रतिक्रियांना उत्तर देण्याचे राहून गेले आहे हेही आमच्या ध्यानात आले आहे. आपल्या कमेंट्सला त्वरित उत्तर देण्याचा आमचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. तेंव्हा आपले प्रश्न आणि प्रतिक्रिया आवश्य द्या. आभारी आहोत.

 31. युवराज says

  मी माझ्या पार्टनरसोबत 9 दिवसानंतर सेक्स. केलं आहे. तर ती गर्भवती होऊ शकते का ..

  1. I सोच says

   गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेग्नंसी टेस्ट करा.

   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/

   नको असणारी गर्भधारणा कशी टाळता येईल या माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/contraception/

 32. shruti says

  Mulacha penis vr pandhre dane ale aslya vr sex krta yete ka Pandhre dane ale aslyavr sex kelyane kahi problm hote kay?

  1. I सोच says

   लिंगावर दाणे आले म्हणजे नक्की काय झाले आहे याची निश्चिती पाहिल्याशिवाय येणार नाही. जर हे दाणे दुखत असतील किंवा तसे काही जाणवत असेल तर संभोगाची घाई न करता डॉक्टरांची मदत घ्या(त्या व्यक्तीच्या जोडिदाराने व त्या व्यक्तीने सोबत उपचार घेणे गरजेचे असते, अन्यथा एक व्यक्ती बरा होतो अन परत दुस-या जोडीदाराकडून संसर्ग होऊ शकतो).
   लिंगसांंसर्गिक आजार टाळण्यासाठी संभोग करताना निरोधचा वापर अवश्य करावा.
   लिंगसांंसर्गिक आजार व त्याबाबतीत आणखी माहिती घेण्यासाठी पुढील लिंक नक्की पहा. https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

   पुढिल वेळी येथे प्रश्न न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारावेत.

 33. Reva says

  pali nanter 3 divsane sex kelyas garbhdharna hou shkte ka…?
  aani jr lgech latrin use kelyas garbhdharna hou shkte ka

  1. I सोच says

   शक्यता आहे,
   प्रेग्नंसी किट वापरुन टेस्ट करा. टेन्शन घेण्याचं कारण नाही.
   गरज वाटल्यास एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. गर्भधारणा नको असेल तर जोडीदाराशी बोलून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे अधिक योग्य राहील.

   पुढिल वेळेस प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 34. Pankaj says

  Periods nantar 5_6diwasani sex kela tar Kay hoil

  1. I सोच says

   पाळीनंतर 5 ते 6 दिवसांनी दोघांच्या संमतीने संबंध केले तर आनंदच मिळेल. अन जर निरोध न वापरता संबंध ठेवले तर गर्भ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
   अधिक माहितीसाठी वरील लेख पुन्हा वाचा

 35. san says

  poration 2 mula nanter hi pregnant rahuane shakya aahe kaa?

  1. I सोच says

   आपल्याला नक्की काय म्हणायचं हे कळत नाही. आपला प्रश्न परत एकदा पुढील लिंक वर लिहून पाठवावा https://letstalksexuality.com/ask-questions/ आपल्याला नक्की उत्तर मिळेल.

 36. kajol wagh says

  Palichya 2 days aadhi sambhog jhala aahe. Pn mala pali aaleli nahi aani home pregnancy test pn negative aahe.asa ka jhala aahe plz mala sanga. Khup stress aahe

  1. I सोच says

   तुम्ही या परिस्थितीचा खूप ताण घेऊ नका. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे पाळी येण्याचा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो.
   आणखी 5 -6 दिवस थांबून परत प्रेग्नंसी टेस्ट करा. टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. गरज वाटल्यास एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. अन हो शक्यतो गर्भधारणा नको असेल तर जोडीदाराशी बोलून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे अधिक योग्य राहील.

   पुढिल वेळेस प्रश्न असतील तर या ठिकाणी न विचारता https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर विचारावेत.

 37. Sagar says

  समजा पाळी उद्या येणार आहे आणि आज संभोग केला तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते का

  1. lets talk sexuality says

   मित्रा,
   पाळीच्या आधी संभोग केला तर गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते, पण शक्यता नाकारता येत नाही. कारण गर्भधारणा नेमकी कधी होते हे त्या-त्या मासिक पाळी चक्रावर आणि अन्डोत्सर्जनाच्या काळावर अवलंबून असते. शक्यतो गर्भधारणा नको असेल तर जोडीदाराशी बोलून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे अधिक योग्य राहील.

   गर्भधारणा नक्की कशी व कधी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   पुढिल वेळी येथे प्रश्न न विचारता प्रश्न विचारण्यासाठी एक छान जागा आपल्या वेबसाईटवर तयार केली आहे https://letstalksexuality.com/ask-questions/ तेव्हा या लिंक वर जाऊन प्रश्न विचारा.

   याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

 38. DIksha says

  सर मी माझ्या बायको सोबत सेक्स करत असताना योनी मधू न रक्त आलेलं. ते 2 3 दिवस येत होतं.. त्याची कारणे काय असतील सांगा plzz घाबरण्याचे कही करण नहीं ना

  1. lets talk sexuality says

   तुम्ही एखाद्या स्त्रीरोगतज्ञांना भेटून याबाबत मार्गदर्शन घ्यावे. पूर्णपणे तपासणी करुनच घाबरण्याचे कारण आहे किंवा नाही हे लक्षात येईल.

 39. राहुल says

  पाळी च्या किती दिवस पहिले व किती दिवसानंतर सेक्स केल्याने गर्भधारणेची भीती नसते ?

  1. lets talk sexuality says

   पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
   खरं तर गर्भनिरोधन न वापरता केलेल्या शारीरिक संबंधामधून गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी निरोधचा वापर महत्वाचा आहे.

   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

 40. Ajay says

  Penis fakt yonit takle ani kadun ghetle tar preg hota ka

  1. lets talk sexuality says

   लिंग कुठल्या परिस्थितीत योनीत गेले होते, त्यावर गर्भधारणा होणार की नाही हे अवलंबून असते.विर्यपतन होण्याच्या अगोदर गेले असेल तर थोडी शक्यता कमी असते, पण विर्यपतनानंतर गेले तर शक्यता दाट होते.
   खरं तर गर्भधारणा नको असेल तर निरोधचा वापर करणे खूप महत्त्वाचे व गरजेचे ठरते.

 41. AP says

  माझ्या मिसेस ने pregnancy चेक केली असता
  1 आठवडा अगोदर पोसिटीव्ह result दाखवला, पण आम्हाला सध्या मूल नकोय, सुरक्षित गर्भपाताचा उपाय सांगु शकता का?

  1. lets talk sexuality says

   गर्भपात करण्याच्या विविध पद्धती आहेत. लवकरात लवकर आणि 12 आठवड्याच्या आत केलेला गर्भपात सुरक्षित असतो. मॅन्युअल व्हॅक्युम अॅस्पिरेशन ही गर्भपाताची सर्वात सुरक्षित पद्धत आहे. त्यामध्ये एका सिरिंजच्या मदतीने गर्भाशयाच्या भिंतीवरील आवरण ओढून घेतले जाते. क्युरेटिंग ही गर्भपाताची मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत आहे. काही प्रकारच्या गोळ्यांचा वापर करूनही गर्भपात केला जातो. या सर्व पद्धती तज्ञ व प्रशिक्षित व्यक्तीने करणं आणि त्यासाठी दवाखाना सुसज्ज असणं आवश्यक असतं.

   गर्भाशयामध्ये काड्या घालून, पोटावर दाब देऊन किंवा उड्या मारून गर्भपात होत नाही. उलट या उपायांमुळे गर्भाशयाला आणि इतर अवयवांना गंभीर इजा होऊ शकते.

   गर्भपाताचा अधिकार स्त्रियांच्या आरोग्याचा आणि लैंगिक व प्रजनन अधिकारांचा महत्त्वाचा भाग आहे.

   तेव्हा सुरक्षित गर्भपातासाठी डॉक्टरांना भेटणंच जास्त सुरक्षित आहे.

 42. Sharad says

  मासिक पाळी नंतर 5 दिवसांनी माझा आणि मैत्रीणी मधे संभोग झाला त्यानंतर अर्ध्या तासाने i pill घेतली होती. त्या नंतर तिने पपई अननस खाल्ले आहे तर ती प्रेग्नंट राहु शकते काय? आम्हाला प्रेग्नंसी नको असल्यास काय करावे?

  1. lets talk sexuality says

   संबंधांच्या वेळी कंडोम वापरला नसेल किंवा कंडोम फाटला, तर गरोदरपण राहण्याची शक्यता असते. अशा वेळी, म्हणजेच असुरक्षित संबंधांनंतर ह्या गोळ्या घ्यायच्या असतात. असुरक्षित संबंधांनंतर पुढच्या ७२ तासांच्या आत गोळ्या घेतल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. जितक्या लवकर या गोळ्या घेतल्या जातील तितकं चांगलं. असुरक्षित संबंधांनंतरच्या पहिल्या १२ तासात या गोळ्यांचा फायदा सर्वाधिक असतो. तुम्ही अर्ध्या तासात गोळी घेतली त्यामुळे प्रेग्नंशी नाही राहणार.
   पण एक नेहमी लक्षात ठेवावं की, संतती नियमनासाठी पूर्णपणे किंवा फक्त या गोळ्यांवर अवलंबणे चूकच ठरेल. या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही. एकाच मासिक पाळीच्या चक्रात (menstrual cycle) अनेकदा या गोळ्या घेणं त्या महिलेच्या आरोग्याला अपायकारक ठरू शकतं.

   दुसरी गोष्ट अशी की, पपई, अननस अशा फळांचा अन गर्भपाताचा काहिच संंबंध नाही आहे. पपई खाऊन गर्भपात होतो हे मिथक आहे.

   पुढील वेळी आवर्जुन निरोधचा वापर करा.
   नको असणारी गर्भधारणा टाळण्याकरिता पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/contraception/

 43. Garje says

  Sir sambhog kartana condom vaparle nahi ani virya baher padle tar garba rahato ka?

  1. lets talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर सोडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
   गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://letstalksexuality.com/conception/
   गर्भ निरोधाकांविषयी माहितीसाठी वरील लेख परत वाचा.

 44. Pramod says

  Pahilyanda sex karaychay ..condom use nhi karaychay..mg konti tablet yogya y….

  1. let's talk sexuality says

   वरील लेख वाचला असशील तर तुला सगळे पर्याय समजले असतीलच.
   निरोध का वापरायचा यामागचे कारण काय असते हे आधी समजुन घे. गर्भधारणा रोखण्यासोबतच निरोध लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासूनही बचाव करतो.
   गर्भधारणा रोखण्यासाठी म्हणून गोळी उपलब्ध आहे, पण लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांसाठी निरोध हाच योग्य व उत्तम पर्याय आहे. तेव्हा गोळी कशासाठी हवी आहे? गोळी कुणासाठी हवी आहे? अन मग काय वापरायचे ते ठरव.
   काहीही वापरायच्या आधी गोळीचे व निरोधचे फायदे व साईड इफेक्टबाबत वरील लेखात वाचून घेशील.
   आणखी काही लिंक देत आहोत नक्की वाच
   https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-condom/
   https://letstalksexuality.com/ecp/
   https://letstalksexuality.com/hazardous-contraceptives/

 45. Sandeep says

  माझ्या बायकोला दिवस गेले आहेत, पन आम्हालाा ते नको आहे. कारण आमचे एक मुलगी एक मुलगा असा परीवार आहे. त्या मुळे तीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या बुधवार १ गोळी गुरुवार २ गोळ्या शुक्रवार २ गोळ्या ह्या प्रमाने दिल्या होत्या शुक्रवारी सध्याकळी एकदम थोड ब्लडींग झाल पन त्यानंर काहीच ब्लडींग नाही झाल तेंव्हा काय उपाय योजना करावी .पीरेड मीस होऊन १६ दिवस झाले आहेत

  1. let's talk sexuality says

   तुमच्या प्रश्नावरुन एक नक्की की तुम्हाला तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही आहे.
   तुम्ही ज्या गोळ्या दिल्या आहेत ते पाहून अशी आशा आहे की तुम्ही जे काही करत आहात ते डॉक्टरांच्या सल्ल्यांने करत असावात, डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय असं काहीही करु नका. अन्यथा भविष्यात फार चुकीच्या परिणामांना सामोरं जावे लागेल.

 46. poonam says

  Hello sir, mc chya adhi 17 days(11 feb) sambandh alay ani semen vaginachya aaspas padlay. Tyanantr 1 March la mc ali 2 days baryapaiki blood gela pn 3rd day pasun khup kami ala. Mc chya 4th day la urine test pn keli adhi negative disla pn 2 hrs ne khup faint dolyana disnar nahi ashi edge disli. Hi pregnancy asu shakte ka. Pls help.

  1. let's talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर किंवा आसपास पडले. तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

   प्रेग्नन्सी टेस्ट तुम्ही केलेली आहेच, मनात शंका आहेच तेव्हा पुन्हा एकदा प्रेग्नन्सी टेस्ट करुन पहा. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तेच तुम्हाला पुढे काय करायचं याचा योग्य सल्ला देतील.

   1. Amol says

    Sir/madam maja wife chi mc cha aadhi 11 divas aamcha sambhand aala hota, pn ajun mc aali nahi. Mi use kele hote, ky hou naye mhanun, pn ajun tila mc aali nahi. Kontya reason mule asel sir/Madam

    1. let's talk sexuality says

     एखाद्या वेळी असे झाले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
     काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
     अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
     टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

     दुसरी बाब ही की, तुम्ही निरोधचा वापर केला होता, तेव्हा गर्भधारणेची शक्यता ही कमी आहे, त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण वाटत नाही.

 47. Amit says

  माझे पत्नी दोन महिने झाले प्रेग्नेंट राहून आम्हाला मूल पाडायचे आहे … तुम्ही काय सल्ला देऊ शकता का?

  1. let's talk sexuality says

   आम्ही एवढाच सल्ला देऊ की, गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

 48. गणेश पारकर says

  मूल न होण्यासाठी उपाय

  1. let's talk sexuality says

   https://letstalksexuality.com/contraception/
   या लिंकवर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

 49. Kiran says

  माझे पत्नी दोन महिने झाले प्रेग्नेंट राहून आम्हाला मूल पाडायचे आहे … तुम्ही काय सल्ला देऊ शकता का

  1. let's talk sexuality says

   तुम्हाला मुल नको असेल तर डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. कारण गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे आवश्यक आहे.
   कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो.

 50. Ap says

  I have done sex without condom at first time i have not insert my penis in vagina, becaus i was tried anal and my sperm was fell on anal. Will shee pregnenet

  1. let's talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीच्या जवळपास जरी पडले. तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
   पाळी येईपर्यंत वाट पहा. किंवा जर पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

 51. Vishwas says

  Pali miss houn 3 week zale pregnancy test positive ahe . mul nako asalyas ky karave lagel

  1. let's talk sexuality says

   स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि पुन्हा तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही.
   18 वर्षांवरील स्त्री स्वतःच्या संमतीने गर्भपात करून घेऊ शकते. पालक अथवा नवऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नसते. अल्पवयीन मुली किंवा मतिमंद असणाऱ्या मुलींना गर्भपातासाठी पालकांच्या परवानगीची आवश्यकता असते.
   गर्भपाताबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/abortion/

 52. Pooja says

  Mazi ek friend ahe ti ani tichya partner madhe safety use karun intercourse zala hota, tyannatr 3 vela tila period yeun geli but ata period chi date nighun 15 divas zale tri tila period ali nahi tyamule ti tension madhe ahe ki ti pregnant asel ka? Plz reply

  1. let's talk sexuality says

   सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करावी लागेल. लैंगिक संबंध त्यांच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात गर्भनिरोधक न वापरता आले आहेत का? (स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम काळ ओळखण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ हा लेख वाचा.)

   जर मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

   गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

 53. Pravin says

  Pali chalu astanna 3 rya divashi mi mazya gf sobat sex kela ani tila unwanted 72 dile tar ti pregnent rahil ka.
  Ani til pali yenya sathi hanikaral asel ka,…help kara..

  1. let's talk sexuality says

   dada
   aapan docter nahi he aadhi lakshat ghya. jahirat pahun kuthlyahi golya dena chuk aahe. jari goli deyachi asel tari aadhi tyababat jara janun ghena far mahatvacha aahe. pali chya divsat sex kertana aadhi nirodh vaparana garjeche hota. infection che chances jast asatat ashya kalat. khara tar nehmi nirodh vaparana uttam.
   asha situation madhe pregnancy rahana kathi aahe. pan ya goli cha nakki parinam tumchya maitrinichya pali chakravar honyachi shakyata aahe.
   ya goli babat adhik mahiti sathi pudhil link paha. an next time kalji ghya.
   https://letstalksexuality.com/ecp/

   1. Pravin says

    Pali chalu astanna 3 rya divashi mi mazya gf sobat sex kela ani tila unwanted 72 dile tar ti pregnent rahil ka. Goli kadhi ghyaychi please sanga, ani goli ghetli tar ti pregnent rahil ka.
    Ani til pali yenya sathi hanikaral asel ka,…help kara…. Goli kadhi dyaychi please sanga

    1. let's talk sexuality says

     मित्रा, तु आम्हाला प्रश्न विचारला हे बरंं केलंस.
     सगळ्यात आधी एक काम करशील शक्य होईल तेवढी आपली ही वेबसाईट वाचून काढ.
     सुरुवात या लिंकपासून कर, ज्यामुळे तुला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स बाबत जास्त माहिती मिळेल.
     https://letstalksexuality.com/ecp/

     खरं तर जर मुल नको हवे असल्यास निरोध वापर करणं मस्ट आहे बाबा. अन पाळीच्या काळात सेक्स करावा की नाही याबाबत तुला माहिती असणं गरजेचं आहे, त्यासाठी ही लिंक पहा https://letstalksexuality.com/sex_during_periods/

     वरील दोन्ही लिंंक वाचल्या असल्यावर तुझ्या हे लक्षात आले असेल की, खाल्लेल्ल्या गोळीमुळे तिचे हार्मोनल इनबॅलन्स होणं साहाजिक आहे. त्यामुळे गर्भधारणा होणं कठिण आहे पण पुढची मासिक पाळी लांबू शकते वा नाही पण…गोळीचे दुष्पपरीणाम व गोळी कधी घ्यायची याबाबत वरील लिंक मध्ये त्याबाबत तुम्ही वाचले आहेच.

 54. Pravin says

  Mi mazya girlfriend sobat pali nantar 17 vya divshi sex kela ani nantar 1 tasa nantar Unwanted 72 hi goli dili tar ti pregnent rahil ka…

  1. let's talk sexuality says

   72 तासांच्या आत गोळी घेतली असल्यामुळे प्रेग्नंट राहणं कठिण आहे. तरीही पुढच्या पाळीची वाट पाहा. पाळी आली तर प्रेग्नंसी नाही हे सिद्ध होईलच.
   आणखी काही बाबी लक्षात घ्या की, या गोळीमुळे पाळी अनियमित होणे हा बऱ्याच जणींमध्ये दिसणारा एक दुष्परिणाम आहे. विशेषतः गोळ्या घेतलेल्या महिन्यात मासिक पाळी पुढे मागे होण्याचे प्रमाण अधिक असते. जर पाळीची तारीख दोन आठवड्याहून अधिक काळ पुढे गेली तर प्रेग्नन्सीची तपासणी करून घ्यायला हवी. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.
   गोळ्यांबाबतच्या अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/ecp/ ही लिंक पहा.
   हे नेहमी लक्षात ठेवा की नको असलेली गर्भधारणा व लिंगसांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी निरोधचा वापर करणं महत्वाचं आहे. गर्भनिरोधनांच्या पद्धतीमध्ये ही सगळयात सोपी व फायदेशीर पद्धत आहे.

 55. Yashraj says

  Me sex kela tevha condom use nhi kela …..direct kela. ….i dont know ki virya aat gelay ki nhi. …but tri aaj 3 days chalu aahe pls help me…..me ky kru …..

  1. let's talk sexuality says

   तुमचा प्रश्न नीट कळला नाही. पुन्हा सविस्तर लिहा.

  2. Pramod says

   Mi 31 august la sex kela. Ani tyach divshi Unwanted 72 hi goli dili. Ani tichi pali 13 september la yenar hoti. Pan pali hi 9 september lach aali. Ani rakt pan jast jat ahe. Aaj 6 divas zale tari pan rakt yet aahe. Pregnent asel ka ti. Kay karav help kara.

   1. let's talk sexuality says

    मित्रा,
    हा या गोळीचा साईड इफेक्ट आहे, त्यासाठी प्रत्येक संबंधाच्या वेळी कंडोम वापरणं अत्यावश्यक आहे.
    अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/ecp/

    तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणे या परिस्थितीत गरजेचे आहे.

 56. Trupti chalke says

  Hello mi trupti mla ek mulga ahe 4years Cha ahe to att pan atta Mi pregnant rahile aahe 1month zale ahe mla nko ahe 2wela mi golya khallya ahet atta hi 3ri wel ahe KY kru samjt nhi dr.kde jaun goli khau ka …Already 2wela asa zalay ekda Maza mulga 2yearscha Astana pregnant rahile hotel ani tyanantr April madhe ani atta September chalu ahe 3wela pregnant rahile sarkha goli khaun KY side effects hou shktat na …tymuel bhiti watatey KY kru samjt nhi plz help me

  1. let's talk sexuality says

   तुमचा प्रश्न वाचला. पहिली गोष्ट अशी की गर्भपात करण्यासाठी तुम्हाला गोळ्या डॉक्टरांनी दिल्या की तुम्ही स्वत: त्या तुमच्या मनाने घेत आहात. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही करु नका. या आधी 2 वेळा झालेले आहे. तेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटा अन ते सांगतील त्यानूसारच उपचार करा.
   अशा प्रकारच्या गोळ्या सारखं खाणं टाळा, अन वर लेखात दिलेल्या एखाद्या पर्यायाचा विचार करा. निरोध हा तर उत्तम पर्याय आहे. तुमच्या जोडिदारासोबत याबाबत बोलुन नक्की नियोजन करा.

 57. Pramod says

  Mi mazya gf sobat sex kela. Sex kelya nantar lagech 3-4 tasa nantar mi Unwanted 72 hi goli dili, nantar 5 divsane tila lagatar 3 divas yonitun blood yet hote. Tichya palichi tarikh 9 hoti pan aata 22 tarikh aali tari pan pali aali nahi. Ti pregnent asel ka. Please help kara

  1. let's talk sexuality says

   प्लीज डोन्ट पॅनिक. सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा. (जरी गर्भधारणा झाली असेल तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करू शकता. कृपया कोणताही घरगुती उपाय करू नका). सर्वात आधी एक करा, प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल.
   अजुन एक शक्यता आहे. या गोळ्या घेतल्यानंतर विशेषतः गोळ्या घेतलेल्या महिन्यात मासिक पाळी पुढे मागे होण्याचे प्रमाण अधिक असते. जर पाळीची तारीख दोन आठवड्याहून अधिक काळ पुढे गेली तर प्रेग्नन्सीची तपासणी करून घ्यायला हवी.
   अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/ecp/

 58. kamlesh says

  स्तन चुपल्याने किंवा किस केल्याने गर्भधारणा होते का?

  1. let's talk sexuality says

   नाही.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

 59. B.D says

  viry yonit kmi gelyaane kivaa jaast gelyane baalachyaa rachnet kahi fark hoto ka
  Please reply

  1. let's talk sexuality says

   असं काहीही होत नाही. एकच बीज हवं असतंं फलन होण्यासाठी.
   तुम्ही आधी ही प्रक्रिया समजुन घ्यायला हवी आहे.
   चला पाहूया ….
   मुलं जन्माला येण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भधारणा व्हावी लागते. जेव्हा स्त्री आणि पुरुष लैंगिक संबंध ठेवतात तेव्हाच हे शक्य होतं. जेव्हा पुरुषाचे लिंग किंवा शिश्न स्त्रीच्या योनीमार्गातून आत शिरते त्यानंतर काही काळाने वीर्य शिश्नातून बाहेर पडते. यामध्ये खूप पुरुषबीजं असतात. ती अतिशय सूक्ष्म असतात. पुरुषबीजं पोहत-पोहत गर्भाशयाला जोडलेल्या स्त्री बीजवाहिनीपर्यंत प्रवास करतात. त्यातील एका पुरुष बीजाचा स्त्रीबीजाशी संयोग होतो. फलित बीज गर्भाशयाच्या भिंतीमध्ये रुजते आणि नऊ महिने गर्भ तिथे वाढतो. गर्भाशयातील नाळेद्वारे रक्त आणि इतर पोषक घटकांचा पुरवठा होतो. बाळाची वाढ पूर्ण झाल्यानंतर योनिमार्गावाटे बाळ बाहेर येते.

   या सोबतच आणखी गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
   https://letstalksexuality.com/conception/

 60. Rani says

  Eka lady sobt dogani sex kela aahe . Ek ticha navra ani dusra ticha frnd te pn bina condom ch . Tr ya mule konala tras hoil ka ki condom vaprun sex nahi ke mhnun.

  1. let's talk sexuality says

   कसल्या त्रासाबाबत तुम्ही बोलत आहात.
   आम्ही काही शक्यता सांगू शकतो-
   1) निरोध न वापरल्याने लिंंग सांसर्गिक आजारांचा (STI) संसर्ग होऊ शकतो.
   अधिक माहितीसाठी लिक पहा
   https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/
   https://letstalksexuality.com/hiv_aids/
   https://letstalksexuality.com/genital-herpes/
   https://letstalksexuality.com/gonorrhea/
   https://letstalksexuality.com/safe-sex/

   2) जर निरोध नाही वापरला तर नको असलेली गर्भधारणाही टाळता येत नाही, त्यामुळे ही त्रास होऊ शकतो.

 61. Pradip says

  Sex kelya nntr lagech 15-20 minute ne pali ali tar pregnant rahu shakt ka?

  1. let's talk sexuality says

   शक्यता फार नाहीच्याच बरोबर आहे. पण दरवेळी शारीरिक संबंध करताना निरोधचा वापर अवश्य करा.

   1. Pradip says

    Test krychi grj ahe ka pn

    1. let's talk sexuality says

     काही गरज नाही,नेहमीप्रमाणे पाळी यायची पहा. काहीही टेंशन घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा. जर नेहमीप्रमाणे पाळी नाही आली तर थोडी वाट पहा. तरीही नाही आली तर प्रेग्नंसी टेस्ट करा.
     तुमच्या बाबतीत टेस्ट करण्याची शक्यता नाही पडणार. तरीही पुढच्या वेळेस काळजी घ्या. निरोधचा वापर मस्ट !

 62. Ruchita sable says

  Sir, mi pregnancy sathi yogya kalat sex kela ahe parntu tyach kala made mi dr kadun khokla yet aslyamule injection and medicine khalle ahe tr pregnancy rahil ka ani rahilyas tyacha pregnancy khi parinam hoil ka ?

  1. let's talk sexuality says

   सर्दी, खोकल्याच्या औषधांचा तुम्ही म्हणता तसा काही परिणाम होत असलेला ऐकिवात नाही. जर नेहमीप्रमाणे येणारी पाळी आली नाही तर तुम्ही प्रेग्नसी टेस्ट करुन घ्या म्हणजे गर्भधारणा झाली की नाही हे कळेल. अन्यथा तुमच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला गर्भधारणा झाली वा होण्यासाठी आणखी मार्गदर्शन करु शकतील.
   गर्भधारणा होण्यासाठी काही गोष्टी महत्वाची असतात, तुमच्या पातळीवर तुम्ही ती निरिक्षणे केलीत व त्यानूसार प्रयत्न केल्यास नक्की फायदा होईल. म्हणुन पाळीचक्र आणि अन्डोत्सर्जन काळ आणि त्या काळात शरीरात होणारे बदल याविषयी सविस्तर माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.

   https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/

   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-signs/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/

   https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

   https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

   https://letstalksexuality.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%AB-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/

 63. Nilesh says

  Mi mc periods nantr 12 vya divshi sambhog kela tarihi mazhi patni garodr rahili aahe . Ase you shakte Ka?

  1. let's talk sexuality says

   हो असे नक्कीच होऊ शकते.
   तुम्ही सांगत आहेत तो दिवस म्हणजे अंडोत्सर्जन होण्याचा दिवसांमधला दिवस (अधिक माहितीसाठी ही लिंक वाचा https://letstalksexuality.com/conception/) आहे. जर मुल नको असल्यास वर सांगितल्याप्रमाणे एखादी पद्धत वापरावी. निरोध ही साधी व सोपी पद्धत आहे.

 64. Akash says

  पाळी येण्याच्या आधी २ दिवस सेक्स केले तर गर्भधारणा होते का रक्तगट सारखा आहे

  1. let's talk sexuality says

   यावेळी गर्भधारणेची शक्यता कमी असते.
   गर्भधारणा नेमकी कधी होते हे त्या-त्या मासिक पाळी चक्रावर आणि अन्डोत्सर्जनाच्या काळावर अवलंबून असते.
   गर्भधारणा नक्की कशी व कधी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
   प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

   1. Shital says

    maji period date 25th feb hoti.. 13 to 15th march darmyan sambandh jhale..maji ajun pali aali nahi tr me dr kde geli.. Tyani mla Regestrone he tblet diliy.. Dose complete jhaly tr mla period nkki yenar ka.. mam tr mnalya ki 10 days before yenar. 4 days cha dose complete kly ani ata 6 days suru ah ajun period nahi aaliy tr period yenar na tya tblet ne.. Krupya suggest kara..

    1. let's talk sexuality says

     पाळी यायला हवी. पण जर नाही आली तर डॉक्टरांना भेटा.

 65. Akash says

  पाळी येण्याच्या आधी २ दिवस सेक्स केले तर गर्भधारणा होते का रक्तगट सारखा आहे

  1. let's talk sexuality says

   यावेळी गर्भधारणेची शक्यता कमी असते. गर्भधारणा नेमकी कधी होते हे त्या-त्या मासिक पाळी चक्रावर आणि अन्डोत्सर्जनाच्या काळावर अवलंबून असते.
   गर्भधारणा नक्की कशी व कधी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

   समान रक्तगट असल्याने सहजीवनामध्ये कोणतीही अडचण येत नाही. समान रक्तगट असण्याचा आणि लैंगिक जीवन किंवा मुल होणं न होणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

 66. संजय says

  माझ्या बायकोला 2 महिने झाले पाळी अली नाही 10 दिवसांपूर्वी टेस्ट केलं तर निगेटिव्ह आले आणि पर्वा टेस्ट केलं तर पोसिटीव्ह आले मला मुलं नाही पाहिजे म्हणून मी गर्भपात च्या गोळ्या दिल्या पण गर्भपात झाला नाही मला हे विचारायचं आहे की जर आता बळाला जन्म द्याचा असेल तर त्याच्यावर या गोळ्यांचे काही दुष्परिणाम तर नाही होणार ना

  1. let's talk sexuality says

   गोळ्यांचे दुष्परिणाम होतील, आता गर्भपात क्युरेतींग करून घ्यावा लागेल.डॉक्टरांना भेटून घ्या.

 67. अर्जुन says

  मैंने sex बिना कंडोम के किया और उस लड़की को 60 घंटो बाद एक unwanted72 दिया और ओ first time sex कर रही थी और उसकी मासिक पाली के दिन चालू थे
  sex करते time blooding hui उसे तो मैंने spum बाहर निकाल दिये लेकिन उसे अभी तक पाळि नहीं आइ

  1. let's talk sexuality says

   मित्रा,
   तुम्ही म्हणत आहात त्याचे नक्की आकलन होत नाहीये.
   तू म्हटल्याप्रमाणे जर तिची लैंगिक संबंध करायची पहिली वेळ होती तर आलेलं रक्त पाळीचं होतं की हायमन तुटल्यामुळं आलेलं याबाबत आम्हाला संभ्रम आहे. तसेच जर पाळी आलेली होती तर मॉर्निंग आफ्टर पिल्स द्यायची गरज नव्हती. या गोळ्या शरीरात हार्मोन्स वर काम करतात त्यामुळे त्याचा परिणाम पाळीवर झाला असल्याची पण शक्यता आहे. शक्य झाल्यास डॉक्टरांना नक्की भेटा.
   शरीरसंबंधांच्या वेळी निरोधचा वापर अवश्य करा.
   मॉर्निंग आफ्टर पिल्स बाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/ecp/

   तु म्हटल्याप्रममाणे तुम्ही संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पडले होते योनीमध्ये नाही. तेव्हा हे लक्षात घ्या की वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

 68. riyas says

  Maine bina condom k sex kiya us ladkika first time sex tha o 22 years old hai sex karte wakt use blooding hui to maine spum bahar gira diye mujhe nai lagta ki undar gye honge or sex karne ka wakt uski monthly पाळी ka time tha phir bhi maine dar k 6ohr ghanto k bad use unwanted 72 de di lekin use ab tk पाळी नहीं आई 2 दिन होगये

  1. let's talk sexuality says

   मित्रा,
   नक्की आकलन होत नाही आहे.
   तू म्हटल्याप्रमाणे जर तिची लैंगिक संबंध करायची पहिली वेळ होती तर आलेलं रक्त पाळीचं होतं की हायमन तुटल्यामुळं आलेलं याबाबत आम्हाला संभ्रम आहे. तसेच जर पाळी आलेली होती तर मॉर्निंग आफ्टर पिल्स द्यायची गरज नव्हती. या गोळ्या शरीरात हार्मोन्स वर काम करतात त्यामुळे त्याचा परिणाम पाळीवर झाला असल्याची पण शक्यता आहे. शक्य झाल्यास डॉक्टरांना नक्की भेटा.
   शरीरसंबंधांच्या वेळी निरोधचा वापर अवश्य करा.
   मॉर्निंग आफ्टर पिल्स बाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/ecp/

   तुम्ही म्हटल्याप्रममाणे तुम्ही संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर पडले होते योनीमध्ये नाही. तेव्हा हे लक्षात घ्या की वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

 69. Sam says

  3 mhine piriyds ale nay tr pregnant asu shakte ka

  1. let's talk sexuality says

   प्रेग्नन्सी टेस्ट करा. गर्भधारणे शिवाय पाळी उशीरा येण्याची बरीच कारणं असतात.

 70. Niki says

  Hello sir maza mazhya Husband sobat pali chya 4th day sambandh jhala mi pregnant rahu shakte ka

  1. let's talk sexuality says

   जर निरोधचा वापर केला असल्यास गर्भधारणेची शक्यता फारच कमी आहे.
   तरीपण पाळीची वाट पहा, पाळी नाहीच आली तर प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहा. अजिबात घाबरू नका.

 71. Niki says

  Sir ajun ek vichraych hot, actually aamhi baby plan kartoy aani masik palichya 10 vya divaspasun 20 divasa paryant .1 divas platun sex kartoy tar kahi chances aahet ka pregnant rahnyachi.

 72. Akshay says

  मी फ्रेंड च्या योनीत बोट घातले ,पण सेक्स केला नाही ,किस केलं आहे पण तिला 2 -3महिने झाले मासिक पाळी होत नाही आहे,तिला कोणताही त्रास नाही.काय सेक्स न करता फक्त किस केल्याने ,योनीत बोट घातल्याने प्रेग्नेंट होऊ शकते का?

  1. let's talk sexuality says

   प्रेग्नेंट नाही होणार.
   पाळीचे चक्र, त्याची नियमितता, बिजविमोचनाचा कालखंड, पुरुषबीजे व त्यांचे प्रमाण, अन अजुन खूप काही बाबी गर्भधारणेसाठी कारणीभूत असतात. अन हे सगळं गर्भधारणेसाठी जुळून यावं लागतं.
   किस केल्याने वा हस्तमैथुन केल्याने गर्भधारणा होत नाही.

   गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

   तुमच्या बाबतीत झाल्या प्रकाराने मानसिक ताण आला असल्याने देखील पाळी लांबलेली असु शकते.

   गर्भधारणा व पाळी बाबत अधिक जाणुन घ्यायचे असल्यास पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/conception/
   https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/

 73. Vibsu says

  Life mdhe 1st time sex kelya nntr pregnant hou shkte ka

  1. let's talk sexuality says

   हो, निरोधशिवाय पहिल्यांंदा जरी लैंगिक संबंध केले असले तरी गर्भधारणा होऊ शकते.
   कारण ज्या काळात संबंध ठेवले असतील तो काळ गर्भधारणेस अनुकूल असल्यास गर्भधारणा होऊ शकते.
   गर्भधारणा कशी होते याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/conception/

 74. Pooja says

  Sir maze pahile bal 5 varshache ahe …
  Ata mala 2 mahinyachi pregnency hoti pan balache heart beats nahit mhanun dr.D&C karanyas sangitle ahe pan tya adhich mala naturly bleeding suru zale ahe…mg ata D&C karnyachi garaj ahe ka…naturly abortion madhe bleeding kiti divas hote garbhapat clean zala ki nahi kase samzave.

  1. let's talk sexuality says

   या प्रसंगात इतरांना काहीही विचारु नका त्याने संभ्रम वाढतील. तुम्हाला डॉक्टरांच्या मदतीची गरज आहे. त्यांना भेटा तेच तुम्हाला ट्रिटमेंट व मार्गदर्शन करतील.

 75. Rohan says

  सर मी फक्त ओरल सेक्स आणि लिंग वरच्या वर फिरवलं आत घातले नाही हे 8 दिवसाच्या आधी झालं आहे सर आणि माझी फ्रेंड बोलत आहे की मळमळ होत आहे आणि पोट सुटत आहे म्हणून सर काय प्रोब्लेम होणार नाही ना sir

  1. let's talk sexuality says

   प्रोब्लेम मध्ये गर्भधारणा होईल की काय? याची तुम्हाला भिती वाटते आहे असंं दिसतंय. मळमळ, पोट सुटणं हे दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे असेल. तेव्हा घाबरु नका, पाळी यायची वाट पहा.
   पाळी आली तर प्रश्नच नाही पण जर पाळीची तारीख उलटून गेली व पाळी आलीच नाही तर दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.

 76. sham says

  sir mi kela ani tya nantar 15 divsani mc ali pn dusrya veles mc ali nhi 4 divas var zale plz ky kru sanga

  1. let's talk sexuality says

   प्लीज डोन्ट पॅनिक. सर्वप्रथम नक्की गर्भधारणा झाली आहे का? याची खात्री करा.

   तुमची मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत की नाही हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल तर). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.

   गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी वरील लेख पुन्हा वाचा.

 77. Mahesh gholap says

  2 mahine zale mc zali nahi
  Prega news ne cheack karun pahile
  Report negative ala

  MC kashamule zali nasel
  Pregnency nko ahe

  1. let's talk sexuality says

   पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही.
   अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा.

 78. sumik shimpi says

  मेरे वाईफ के साथ जब भी सेक्स करता हु तब योनी मे से वीर्य बहार निकल जाता है और उसे उपर उलटा करके भी सेक्स करके देखा पर उसे बहुत दिनो से प्रेगनेट करना चाहता हूँ पर उसे गर्भधारना ही नही हो रही है और उसके सब रिपोर्ट बराबर आये है

  1. let's talk sexuality says

   योनी मे से वीर्य बहार निकल आना ये होना आम बात है, और हां गर्भधारना होने के लिए सिर्फ सेक्स करना जरुरी नही होता है…
   महावारी का चक्र, उसकी नियमितता, ओव्यूलेशन की अवधि, शुक्राणु की संख्या, और कई और भी कारण गर्भावस्था के लिए जिम्मेदार हैं। स्त्री रोग विशेषज्ञ को दिखाईये और उनसे सलाह लें।
   हिन्दी मे जानकारी के लिए https://lovematters.in/hi

 79. MAYUR kakade says

  Sir pandhra diwas jhale ahe kay karwe lagel

  1. let's talk sexuality says

   कशासाठी? काय करायचं आहे?

 80. Sanku says

  Mla. Mc 0ct 9 la aali hoti aani me oct 31 la sex kela tr pregnent hou shkte ka

  1. let's talk sexuality says

   शकयता फारच ना च्या बरोबर आहे.

   गर्भ राहू शकतो का नाही हे त्या स्त्रीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून असते. पाळीचक्र जर खूप लहान किंवा खूप मोठे असेल तर कधीकधी पाळी संपता संपता गर्भधारणा होऊ शकते. शक्यता कमी असते पण शक्यता नाकारता येत नाही.

   पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. प्रत्येकाच्या पाळीचक्रानुसार हा काळ वेगळा असू शकतो. बऱ्याच जनांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन हे १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशिराही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अंडोत्सर्जन होऊ शकतं.

   नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरणे गरजेचे आहे. तसेच जोडीदाराबरोबर याविषयी चर्चा करून दोघांच्या मताने कोणते गर्भनिरोधक वापरायचे हे ठरवले पाहिजे. शिवाय आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

 81. Dinesh says

  आम्ही मासिक पाळी नंतर 5 दिवसांनी विना प्रोटेक्शन च सेक्स केलं व मी पूर्ण वीर्य बाहेर काढलं तरीही मला थोडं confusion होत एकदा थेंब आत पडला आसेल पण नंतर तिला unwanted72 पन्नासाव्या तासात दिली तर गर्भधारने ची शक्यता आहे का?

  1. let's talk sexuality says

   संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर सोडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही.पण तुम्ही लगेच unwanted 72 घेतल्याने गर्भधारणा नाही होणार. पण unwanted 72 ही गोळी इमर्जंसी आल्यावरच घ्यायची आहे, नेहमी वापरायची नाहिये. जर गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. निरोध हा उत्तम पर्याय आहे.
   गर्भधारणा कशी होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://letstalksexuality.com/conception/
   गर्भनिरोधकांविषयी माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.

 82. गणेश says

  Sir गर्भ राहून 2महिने 8 दिवस झाले आहे अनिगोळ्या चालू केल्या आहे गोळ्यांचा 1 डोस झाला आहे। तर यामध्ये बायकोला काही त्रास होईल का

  1. let's talk sexuality says

   कसल्या गोळ्या?
   जर गर्भपात करायचा असल्यास डॉक्टरांना भेटा.
   अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा
   https://letstalksexuality.com/abortion/

 83. परमेश्वर बर्डे says

  गर्भ थाबांवन्यासाठी कोनती गोळी वापरतात???

  1. let's talk sexuality says

   इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव पिल्स किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असं मेडिकल मध्ये सांगितलं तरी ते देतील.
   अधिक महितीसाठी पुढिल लिंक पहा.
   https://letstalksexuality.com/ecp/

 84. Jaydeep says

  Sir mene gf ke sath 25 days pahale sex kiya tha.muze lagata hai ki 1drop vagina me pad gay hai.kal 25march ko use periods ane vale the lekin periods aaye nahi.sir muze solution chahiye.

  1. let's talk sexuality says

   १.पाळी नियमित येत असल्यास व तारीख उलटून गेली आणि पाळी आली नाही तर प्रेग्नंसी कीटच्या सहाय्याने गर्भधारणा आहे का याची खात्री करा. हे किट मेडिकल स्टोअर मध्ये मिळेल. त्यावरील सूचनांनुसार टेस्ट करा. जर टेस्ट निगेटिव्ह आली तर पाळीची वाट पहा. पॉझिटिव्ह आली तर डॉक्टरांना भेटा. आमचे मार्गदर्शन हवे असल्यास नक्की लिहा.

   २.गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो. हे ही ध्यानात घ्या.
   अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा.

   नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/

   जर सद्य परिस्थितीमध्ये तुम्हाला ताण आला असेल वा कुणाशी बोलायचं असल्यास, आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. येथे पुढिल नंबर वर बोलु शकता. ९५६१७४४८८३ इथे तुमचं म्हणणं ऐकुन घेतील. गरज असल्यास काही सेवा-सुविधांशी जोडून ही दिलं जाईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे. या नंबर वर व्हाट्सअप वर मेसेज करुन तुमची वेळ ठरवा अन मोकळेपणाने बोला. आम्ही आपल्या सोबत आहोत.

   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी न येण्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. शक्य झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपण जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

 85. Srika says

  Mi 8 vya divshi sex kela haye m mi pregnent rahu शकते का

  1. let's talk sexuality says

   गर्भधारणेची शक्यता कमी आहे (नाहीच होणार असं म्हणणं थोडे घाईचे होईल), तेव्हा सध्या काहीही ताण घेऊ नका (ताण घेतला तर त्याचा परिणाम पाळीचक्रावर होऊ शकतो). पाळी यायची वाट पाहा. जर पाळी आली नाही तर प्रेग्नंसी टेस्ट करुन गर्भधारणा आहे का? याची खात्री करु शकता. ताण घेतला तर त्याचा परिणाम पाळीचक्रावर होऊ शकतो.
   महितीसाठी: गर्भधारणा होणे न होणे हे प्रत्येक स्त्रीच्या पाळीचक्रावर अवलंबून असते. पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.प्रत्येक व्यक्तीचे मासिक पाळीचे चक्र वेगळे असते. सामान्यतः ३० दिवसांच्या पाळी चक्रात पाळी संपल्यानंतर साधारणत: (दरवेळी असेच होईल असे नाही) १२ ते १४ व्या दिवसांच्या काळात अन्डोत्सर्जन होते. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळीचक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी प्रयत्न करू शकता.
   गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

 86. Raju says

  मी माझं लिंग योनी ला स्पर्श केल , त्यातून वीर्य नाही निघालं होत ,पण योनी ओली झाली होती, तिला वाटल माझं विर्य् च लागल तिला ,त्याने काही problem नाही ना होत ?

  1. let's talk sexuality says

   लिंगामधून वीर्य आलंच नाही याची पूर्ण खात्री आहे? जर नसेल निघालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता नाही, पण हे ही लक्षात घ्या की सेक्स करत असताना वीर्याचे काही अंश जरी योनिजवळ पडले तरी अजिबातच योनीत गेले नाही असं खात्रीनं सांगता येत नाही. गर्भधारणेस पूरक काळात जर लैंगिक संबंध आले तर गर्भधारणा होण्यास एक शुक्राणू देखील पुरेसा असतो. जर विनानिरोध संबध आले असतील तर लिंग संसार्गिक आजार होण्याचाही धोका असू शकतो.
   त्यामुळे गर्भधारणा नको असल्यास व इतर लिंगसांसर्गिक आजारांचा धोका टाळण्यासाठी दरवेळी निरोध वापरलेला कधीपण उतम.

 87. रामदास says

  1 महिना 10 ते 12 डे झाले मासिक पाळी आली नाही chek केले तर पोसिटीव्ही आले आहे काय करावे लागेल सोल्युशन द्या करण आम्हाला 1मुलगा आणि 1 मुलगी आहे आता 3 रे नको आहे

  1. let's talk sexuality says

   जर टेस्ट positive आली असेल व गर्भ नको असेल तर गर्भपात करता येऊ शकतो. त्यासाठी स्त्रीरोगतज्ञांना भेटा. तुम्हाला मुल नको असेल तर ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नका. भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/contraception/
   गर्भधारणेबाबतच्या माहितीसाठी
   https://letstalksexuality.com/conception/
   गर्भपाताबाबतच्या अधिक माहितीसाठी
   https://letstalksexuality.com/abortion/

 88. रामदास says

  लास्ट मासिक पाळी 7 एप्रिल ला अली होती आता 7 मे होऊन 9 डे झाले अजून अली नाही मासिक पाळी

  1. let's talk sexuality says

   गर्भधारणेव्यतिरिक्त पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   याविषयी सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.
   https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

Comments are closed.