करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…

मदतीसाठी लेखाच्या शेवटी काही हेल्पलाईन दिलेल्या आहेत.

0 2,001

जसजसा देशोदेशी लॉकडाऊन लागू होऊ लागला तसतशा काही दिवसांतच वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आणि आज करोना साथीसारखा हाही जागतिक चिंतेचा प्रश्न बनला आहे.

नारी समता मंचाच्या माध्यमातून अनेक वर्षे स्त्रियांवरील हिंसाचाराच्या मुद्दय़ावर काम करणाऱ्या प्रीती करमरकर लोकसता मध्ये लिहितात की,  जगभरातील बहुतेक देशांतील पितृसत्ताक मानसिकतेचा चेहरा पुन्हा उघड झाला.. इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, सिंगापूर, जपान, मलेशिया आणि अर्थातच भारत येथे टाळेबंदीनंतर तक्रारी वाढू लागल्या. चीनमध्येही या काळात स्त्रियांच्या तक्रारींत आणि लॉकडाऊन उठल्यावर घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये वाढ हे चित्र आपण पाहिलंच. टर्कीमध्ये तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून १४ स्त्रियांची त्यांच्या घरात, त्यांच्या जोडीदारांनी हत्या केल्याचं समोर आलं. ‘मेरी स्टोप्स इंटरनॅशनल’ या संस्थेनुसार जागतिक टाळेबंदीमुळे नियोजित नसलेल्या ३० लाख गर्भधारणा आणि २७ लाख असुरक्षित गर्भपात होण्याची शक्यता आहे;  ज्यात ११ हजार मृत्यू होऊ शकतात.. लेखाची लिंक 

पतीचं दारूचं व्यसन, टाळेबंदीमध्ये आर्थिक घडी विस्कटलेली असल्यानं आलेले ताण, घरून काम करणाऱ्या उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये कामाच्या ताणाबरोबरच घरातल्या दैनंदिन कामांचं व्यवस्थापन, घर व मुलांची जबाबदारी सांभाळताना येणारा मानसिक, भावनिक ताण, त्यातून शारीरिक, मानसिक हिंसाचार वाढलेला आहे असे दिसतं.

महिला हिंसाचार या विषयावर बरीच वर्ष काम करणारी आमची वकील मैत्रीण अ‍ॅड. अर्चना मोरे लोकसत्ता मध्ये लिहिते की, ‘वर्क फ्रॉम होम’च्या कचाटय़ात सापडलेल्या स्त्रियांची वेगळीच कथा! घरात अडकलेल्या लहान मुलांची चिडचिड वाढू नये म्हणून त्यांचं खाणं, मनोरंजन आणि एकंदर वेळा सांभाळायच्या, नवरा ‘वर्क फ्रॉम होम’च्या ताणाखाली आहे म्हणून त्याला ‘समजून’ घ्यायचं, वृद्धांची, कुटुंबातल्या आजारी सदस्यांची विशेष काळजी घ्यायची, घराबाहेर सारखं पडता येणार नाही म्हणून उपलब्ध वस्तूंचा नियोजनबद्ध वापर करायचा, ऑफिसच्या कामाच्या ईमेल्स, फोन कॉल्स, रिपोर्ट्स सबमिशन, हे वेळच्या वेळी मार्गी लावायचं, या जंजाळात तिच्या मानसिक ताणाचा निचरा कुठे होणार? कसा होणार?

एक मैत्रीण म्हणाली, की फक्त ईमेल वा इंटरनेटवरून काम करता येणार असेल तर भाग वेगळा, परंतु दिवसभरात केव्हाही येणारे व्हिडीओ कॉल्स, झूम कॉल्स, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सतत ऑफिसमध्ये बसल्यासारखं तयार असावं आणि दिसावंही लागतं. मग घराचं पार ऑफिस करून टाकलंय म्हणून घरातल्यांची चिडचिड, तिरपी नजर ही वेगळीच. तुमच्या ‘सबॉर्डिनेट्स’चं मनोबल वाढवण्यासाठी सतत कार्यक्षम आणि सर्जनशील  राहण्याचा ताण, तर तुम्ही व तुमची टीम काम करत असल्याची ‘हायर ऑथॉरिटी’ला खात्री पटवून देण्यासाठी सतत ‘अपडेट्स’ द्यावे लागतात आणि तेही वर दिलेली घरातली सर्व व्यवधानं सांभाळून. यात ताणाची भर घालणाऱ्या इतर अनेक बाबी पिंगा घालत येतात. नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध किंवा त्याला तिच्या विवाहबाह्य़ संबंधांबाबत असलेला संशय, टाळेबंदीच्या काळात आर्थिक असुरक्षिततेची भीती,  टाळेबंदीदरम्यान काहींच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहींना निम्म्या पगारावर काम करत नोकरी टिकवावी लागणार आहे, काहींचे व्यवसाय ठप्प झालेत, तर काही ‘यशस्वी’ पुरुष त्यांचे ताणतणाव घरातील हक्काच्या माणसांवर व्यक्त करीत आहेत. हे साचलेपण, तोचतोचपणा, मन मोकळं करण्याच्या संधी नाहीत, अशी ही यादी किती तरी मोठी होईल. अनेक घरात चार भिंतींमध्ये कधीही फुटू शकतील असे मानसिक ताणाचे टाइमबॉम्ब तयार होत आहेत. टाळेबंदीनंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढण्याची चिन्हं आहेतच. या सर्व ताणावर समाज म्हणून आणि कुटुंबात, व्यक्तिगत पातळीवर लवकरात लवकर उपाय शोधायला हवेत….लेखाची लिंक

महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईन १०९८ कडे ११ दिवसांच्या काळात तब्बल ९२००० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन नंतरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे २० ते ३० मार्च या कालावधीत हे तक्रारींचे कॉल आले. ३० टक्के मुलांनी शोषण आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे ….. लेखाची लिंक

अत्याचार हा सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. त्यामुळे आपण जागरुक राहिले पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, अत्याचार होणा-या घरातील महिलेला योग्य व्यक्ती किंवा संस्थेशी संपर्क साधण्यासाठी मदत केली पाहिजे. तुमच्या घरात अत्याचार होत असल्यास विश्वासू व्यक्तीशी बोला किंवा काही हेल्पलाईन आहेत त्यांच्याशी ही संपर्क साधू शकता.

हेल्पलाईन्सची माहिती

घरगुती हिंसाचार राष्ट्रीय हेल्पलाईन –  १८१

महिलांसाठी हेल्पलाईन – १०९१, १२९१

पोलीस – १००

मुंबई महापालिका आणि बिर्ला – १८०० १२०८ २००५०

आदिवासी विभाग, प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला – ८२११ १८०० १०२ ४०४०

महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र शासनद्वारा हेल्पलाइन

नागपूर व अमरावती विभाग – दूरध्वनी क्रमांक – ७७६७९०९२२२,

औरंगाबाद व नांदेड विभाग – ८६९२०३४५८७,

पुणे व नाशिक विभाग –  ९९७०१६१९८८, ९२८४७४८१०९,

कोकण आणि मुंबई विभाग – ९८७०२१७७९५, ९८३३२६३६०६,

सामाजिक संस्थाद्वारे चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाइन

नारी समता मंच, पुणे –  सकाळी ११ ते दुपारी ४, दूरध्वनी क्रमांक  ९७६६१०३४५८

सखी हेल्पलाइन, पुणे –  सकाळी ९.३० ते रात्री १०.३०, दूरध्वनी क्रमांक ९४२१०१६००६

सेहत, मुंबई – ९०२९०७३१५४

जागोरी संस्था, दिल्ली  – ९१ ११  २६६९२७००,  ९१ ८८००९९६६४०

“मला बोलायचे आहे”  ऑनलाइन मंच

हिंसा सहन करत असलेल्या फक्त महिलांनीच खालील क्रमांकावर संपर्क साधावा. तज्ञ व अनुभवी समन्वयक – ‘समिधा’ शी बोलण्यासाठी पुढील फोन नंबर डायल करा – ७७६७९०९२२२, ८६९२०३४५८७, ९९७०१६१९८८, ९८७०२१७७९५, ९८३३२६३६०६, ९२८४७४८१०९

सकाळी १० ते संध्याकाळी ७

मानसिक स्वास्थ्यासाठी हेल्पलाईन : मनोबल समुपदेशक

सकाळी १० ते दुपारी ३ – ९३५६७२६९२३, ९०२२५३५१६७, ७३८७९९५५५२

सायंकाळी ५ ते ८ – ७७०९२९३३०३

दुपारी २ ते सायंकाळी ५ – ९६०४१८५९९४

प्रयास आरोग्य गटाचा उपक्रम 

कोविड १९ आजारा बद्दल काही शंका असतील, आजूबाजूला मिळणारी माहिती समजून घेताना अडचण येत असेल व या सगळ्या परिस्थितीचा ताण येत असेल तर तुम्ही इथे कॉल करू शकता.

८८८२७ ३५७३६ (वेळ – स. १० ते संध्या. ६)

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.