दिल खोल, चुप्पी तोड

1,187

‘मला शांताबाई म्हणून चिडवतात’, ‘मला सगळे काळे- कावळे असे म्हणून चिडवत असतात’ यांसारखे अनेक प्रसंग आपण नेहमीच पाहत, ऐकत असतो.  छेडछाड का होते, त्याचे परिणाम काय असू शकतात, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आणि मानसिकता कशा प्रकारची असते… याविषयी विचार करणं आणि बोलणं गरजेचं आहे.

मागच्या वर्षी ‘आय सोच’ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छेडछाड आणि त्याचे परिणाम याविषयी  त्यांना समजलेल्या, जाणवलेल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी ‘दिल खोल, चुप्पी तोड’ या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक खुला मंच उपलब्ध करून दिला होता.

धर्म, जात, लिंगभाव, शारीरिक व्यंग यावरून होणारी हेटाळणी थांबवणं आवश्यक आहे आणि यासाठी महत्वाचं आहे याविरुद्ध आवाज उठवणं…   तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘दिल खोल, चुप्पी तोड’ हा व्हीडीओ अवश्य पहा.

Comments are closed.