आपण सगळे वेगवेगळे आहोत!

1,849

आपण सगळे वेगवेगळे आहोत. आपला उगम एकच असला तरीही उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपल्यामध्ये आज खूप वैविध्य आहे. वैविध्याचा विचार अनेक पद्धतींनी करता येतो. काही जण म्हणतात, अमुक एका प्रकारची संस्कृती, लोकं श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ. गोरे श्रेष्ठ, काळे कनिष्ठ. पहिल्या जगातले श्रेष्ठ, तिसऱ्या जगातले दुय्यम. पुरुष श्रेष्ठ तर बाया कनिष्ठ. प्रत्येक संस्कृतीमध्ये चांगलं-योग्य आणि वाईट/अयोग्य काय याच्या काही ना काही संकल्पना असतात. वेगवेगळ्या कालखंडात या संकल्पना बदलतात.

लैंगिकतेबाबत आपण कशाला चांगलं म्हणतो आणि कशाला वाईट? कोणत्या प्रकारचे लैंगिक संबंध योग्य आणि कोणते वाईट? चांगलं आणि वाईट असं काही आहे का फक्त वेगळं आहे एकमेकांपासून?

प्रत्येकाची आवड वेगळी, गुण वेगळे, इच्छा वेगळ्या असू शकतात. पण तरीही सगळे जण समान आहेत.

वेगळेपण मान्य करायला शिकूया. वैविध्य जपू या.

 

Comments are closed.