प्रश्नोत्तरेकाही कारणाने लिंग लहान होते का

काही कारणाने लिंग लहान होवू शकते का

1 उत्तर

तुम्हाला माहीतच असेल की, लैंगिक उत्तेजना मिळाल्यानंतर लिंग ताठर होते आणि वीर्यस्खलन झाल्यावर ते पुन्हा आकुंचन पावते. त्याशिवाय इतर काही कारणांनी लिंग अचानक लहान होत नाही. इथे आवर्जून नमूद करण्याची गोष्ट म्हणजे लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. यात काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगाचा आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय  नाही. लिंगाच्या लांबीविषयी चर्चिले गेलेले वेबसाईटवरील इतर प्रश्नोत्तरे नक्की वाचा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला 9545555670 या मोबाईलवर (१० ते ६ या वेळात) आणि  tathapi@gmail.com या ई मेल जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 10 =