खाण्याविषयीच्या समस्या

2 1,167

अनोरेक्झिया

खायला पुरेसं अन्न न मिळाल्याने होणारं कुपोषण एकीकडे तर आपण जाड तर होणार नाही ना, आपलं वजन वाढणार नाही ना या भीतीने केली जाणारी उपासमार दुसरीकडे. ही अशा प्रकारची उपासमार केल्याने जे काही शारीरिक मानसिक आजार निर्माण होतात त्या सगळ्याला मिळून अनोरेक्झिया नर्वोसा म्हणतात. वजन वाढायच्या भीतीने भूक लागत नाही, खाल्लेलं पचत नाही, विविध प्रकारे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

या आजाराचा शोध सर डॉ. विल्यम गल यांनी 1872 मध्ये लावला. पण गेल्या 3 दशकांपासून तो जास्त चर्चेत आला. फॅशन इंडस्ट्री आणि मॉडेलिंगच्या व्यवसायाने मुलींच्या शरीराची साचेबद्ध प्रतिमा तयार केली. बारीक, अगदी हाडं दिसणारी अशी ही प्रतिमा या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक अट बनलीच पण तिचं लवकरच एका फॅडमध्ये रुपांतर झालं. समस्या इतकी गंभीर बनली की विदेशातल्या आणि आपल्या देशातल्याही अनेक मुली आपलं शरीर त्या प्रतिमेत बसवताना स्वतःचीच उपासमार करून घेऊ लागल्या. अखेर फॅशन इंडस्ट्रीला या सर्वांची जबाबदारी स्वीकारून अशा अति बारीक असणाऱ्या मॉडेल्सना नकार द्यावा लागला आणि आम्ही अशा प्रकारच्या अतिरेकी डाएटच्या विरोधात आहोत हे पुढे येऊन सांगावं लागलं.

2 Comments
  1. mukesh says

    Have Any side effects of mastrbation plz suggest me .I am so worry about this kind of addition.and what should be precautions . and also my sperm has been thin

  2. I सोच says

    हस्तमैथुनाबद्दलचे अनेक प्रश्न वेबसाईट वर चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

    https://letstalksexuality.com/question/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.