कुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही ‘ ती ’ च्याच खांद्यावर

स्नेहा मोरे

844

स्त्री आणि पुरुष समानतेचा जागर करणा-या समाजात शहरी आणि ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर टाकून पुरुष मात्र नामानिराळे राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात राज्यात केवळ २० हजार १५९ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. तर त्याच दोन वर्षात सात लाख ९८ हजार २४७ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. या दोन वर्षांत या शस्त्रक्रियेदरम्यान राज्यभरात २० स्त्रियांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यल्प असण्यामागे गैरसमजुती, मानसिकतेचा अभाव असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे .

वास्तविक, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत स्त्री व पुरुष दोघांचा समावेश असावा, असे सरकारचे धोरण आहे. स्त्रियांपेक्षा सोपी शस्त्रक्रिया असूनही पुरुष शस्त्रक्रिया करण्यास पुढाकार घेत नाहीत. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांनाच या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.

पुरुष नसबंदीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. पुरुषांना असे वाटते की, यामुळे आपले पौरुषत्व जाईल. आयुष्यात कधीच मूलबाळ होणार नाही. पुरुष घरात कर्ता असतो, शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल. मात्र वैद्यकीय क्षेत्र सांगते की यामध्ये काहीही तथ्य नाही.

 – डॉ.अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ञ  विभागप्रमुख, जेजे रुग्णालय

पुरुष नसबंदीची आकडेवारी

शहर २०१८-१९ २०१७ -१८
मुंबई १८५ ९१४
पुणे २२३ २४०
नाशिक १,०९२ ९९०
नागपूर २१९ २४९
ठाणे ५८ ४८

बातमीचा स्त्रोत : लोकमत न्यूज नेटवर्क पुणे,  १६ मे २०१९

Comments are closed.