‘सहियो’: ‘खतना’ या अन्यायकारक प्रथेविरुद्ध काम करणारी संस्था

1,172

“मुली कोणासोबत पळून जाऊ नयेत, त्यांनी लग्नाआधी सेक्स करू नये, नवऱ्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत सेक्स करू नये. मुलीला शिस्त लागावी तसेच तिला कंट्रोलमध्ये ठेवावे यासाठी मुलींची ‘खतना’ केली जाते .” एक भोरी समुदायातील महिला.

‘खतना’ (Female Genital Cutting) मध्ये मुलींच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी पाच ते आठ वर्षे वयोगटातील मुलींच्या क्लिटोरिस (योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग)  कापले जाते.  काही महिला मुलींचे हात पाय पकडतात आणि ब्लेडने हा अवयव कापला जातो.

मुख्यतः भोरी समुदायामध्ये आढळणाऱ्या या क्रूर, हिंसक आणि अन्यायकारक प्रथेविरुद्ध ‘सहियो’ नामक संस्था काम करते. ही प्रथा बंद व्हावी यासाठी परिषदा, सत्र घेऊन लोकांसोबत संवाद साधून जनजागृतीसाठी प्रयत्न या संस्थेमार्फत केला जातो.

‘खतना’ या प्रथेविषयी तसेच ‘साहियो’ च्या कामाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 www.sahiyo.com

Comments are closed.