फर्टिलिटी अवेअरनेस – ओळख आपल्या पाळीचक्राची

11,718

मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे तुम्हाला खरं वाटेल का?

हे पूर्ण खरं आहे. आपल्या मासिक पाळीच्या चक्रात काय होतंय, गर्भधारणा कधी होणार असं सगळं आपल्याला समजू शकतं.  फर्टिलिटी अवेअरनेस म्हणजेच जनन जागरुकता हे स्वतःचं शरीर, संवेदना आणि शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं एक कौशल्य आहे. स्वतःच्या शरीरातले सूक्ष्म बदल आणि खुणा, जाणिवा, भावना आणि संवेदना समजून घेणं, स्वतःची लैंगिकता आणि जननक्षमता याबाबत जागरुक असणं म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस किंवा लैंगिकता व जनन जागरुकता.

मासिक पाळी चक्रामध्ये होणारे विविध बदल आणि जाणिवांमधून कोणत्या काळात गर्भ धारणा होऊ शकते म्हणजेच दिवस जाऊ शकतात आणि कोणत्या काळात नाही हे समजून घेता येतं. तसंच शरीरात, पाळी चक्रात, संप्रेरकांच्या चक्रात काही वेगळं घडत आहे का तेही या जागरुकतेमुळे समजत असतं. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन झालं का नाही, पुढची पाळी कधी येणार आणि दिवस गेले आहेत का हेही लवकर समजू शकतं.

या ज्ञानातून आपण आपल्या शरीराबद्दलचे आणि आपल्या लैंगिकतेसंबंधीचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. शरीराबद्दलची अनेक मिथकंही यातून दूर करता येतील. आपली लैंगिकता समजून घेऊन इतरांबरोबरची आपली नाती आपण मोकळेपणाने जोडू शकतो. गर्भनिरोधनामध्ये आणि गर्भधारणेमध्ये पुरुषांचाही महत्वाचा वाटा आहे आणि याबद्दलची त्यांची जबाबदारी पुरुष घेऊ शकतील.

आपल्या शरीराची, पाळीचक्राची आणि जननचक्राची ओळख कशी करायची ते पुढच्या लेखात.

17 Comments
 1. sidhdartha dadaji ghutke says

  ‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

 2. Raj says

  Sir plz tell me……majya gf sobt mi sex Kel but sor bhaher kadl aatmde nhi ….ani sex kelyantr 10 divasni Pali regular date la Ali….pn pudchi Pali one week jhal Ali nhi …tr pregnancy asel Ka. Plz past

  1. let's talk sexuality says

   एखाद्या वेळी असे झाले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. (मात्र प्रत्येक वेळी नेहमीपेक्षा १५ दिवस लवकर पाळी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य) पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा.

   टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. आणखी एक, जर पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

 3. विठ्ठल says

  अंडोत्सर्जन कधी होते कसे कळेल. आणि संभोग रोज केला काही अडचण येईल का?

 4. Suraj Ashok Mangalwedhekar says

  mazya lagnala 4 varsh zale pn pregnancy rahat nahi so mla tumhi sanga me kay karu………. Pregnant rahbyasathi Plz plz

  1. let's talk sexuality says

   नक्की काय कारण आहे हे शोधावं लागेल. डॉक्टरांना भेटा.

 5. Akii says

  Sir plz tell me….. maji gf bar me sex kela but som baher kel aat nahi ……. sex kela natar 10 day ni divsani pali regular dat hoti pan tila ali nahi….. mg ti pregnant ahe ka ? plz sir sanga

  1. let's talk sexuality says

   घाबरु नका….
   पाळी चुकण्याची, लवकर येण्याची किंवा लांबण्याची अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

   पाळीची तारीख उलटून गेली असेल तर सर्वात आधी एक करा, दिवस गेले आहेत का याची खात्री करा. प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठीची किट बाजारात मिळतात. त्यावरील सूचनांप्रमाणे लघवीची तपासणी केली तर दिवस गेले आहेत का हे समजू शकेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर थोडे दिवस पाळीची वाट बघा (मसिक पाळीचे चक्र नियमित असेल). पॉसिटीव्ह असेल तर तर स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटा आणि तपासणी करा.
   ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे.
   https://letstalksexuality.com/contraception/

 6. रुपाली says

  मी 12/9/2020ला संबंध आल्यानंतर 72 तासाची गर्भनिरोधक गोळी खाल्ली परंतु मला 12/10/2020 महिन्यात पाळी आली नाही म्हणून मी प्रेग्नेंसी टेस्ट17/10/2020 ला केली ती निगेटिव्ह आली आहे अजून पाळी आलेली नाही काय असावे

  1. let's talk sexuality says

   काळजी करु नका.पाळीची थोडी वाट पहा.अधिक माहितीसाठी पुढिल लेख वाचा
   https://letstalksexuality.com/ecp/

 7. PRANIKETA Zende says

  Sir mazi ek Sister aahe 2 month zalay pn tyana 2 month pali ch aali nahi .tr sir plz kashyamule as zalay so plz upay sanga.pregnecy test negative aali aahe .

  1. let's talk sexuality says

   – गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
   काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
   पाळीबाबत माहितीसाठी https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. एखाद्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

 8. Sagar says

  Pregnancy kit report negative ahe pn pali ali nahi 2 month zalet…

 9. Jaya says

  Maza period cycle 22-24 divasancha ahe ani mi 8 vya divashee mazya husband sobat contact thevalee tr maze pregnancy che chances jast ahet ka ki kami aahet. Mala gharbh nako pahije ani 72 hours madhale jya pills ghetat tya pills ghetalyavar mala periods every 14 divas ani yeto mhanun mala pills ghyayachya nahit tr kay karave je mi pregnant nako vyayala.

  1. let's talk sexuality says

   प्रत्येकाच्या पाळीचे चक्र वेगळं असतं. जर २२-२४ दिवसांचे चक्र असेल तर ८ व्या दिवशी आलेले संबंध गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात. अशा वेळी जर इमर्जन्सी पिल्स घायची नसेल तर प्रेग्नन्सी टेस्ट केलेली कधीही चांगली. संबंधानंतर ८-१० दिवसांनी प्रेगन्सी टेस्ट करावी. जर ती टेस्ट positive आली तर डॉक्टरांना भेटावे.
   जर यापुढे गर्भधारणा टाळायची असल्यास गर्भनिरोधक म्हणुन निरोध वापरावा. निरोध शिवाय अजून इतरही गर्भनिरोधके वापरता येतात. त्यांच्याविषयी जाणून घायचे असेल तर खालील लिंकला भेट द्या. https://letstalksexuality.com/contraception/

Comments are closed.