तिला…

2 1,516

तिला

आपण सबल आहोत हे कळत असल्यामुळे तिला
जेव्हा अबलेसारखे वागणं नकोसं होतं,
तेव्हा त्यालाही आपण कमकुवत आहोत हे जाणवत असताना,
बलदंड असण्याचा आव आणणं आवडत नाही.
गुंगी गुडिया म्हणून वागायला तिला जसं आवडत नाही,
तसं त्यालाही आपण सर्वज्ञ आहोत अशी जी इतरांची कल्पना असते
त्याचं ओझं वाटायला लागतं…
जेव्हा तिच्यावर भावना विवशतेचा आरोप केला जातो,
तेव्हा त्यालाही संवेदनशील, मृदू होऊन दोन अश्रू गाळण्याचीही मुभा नसते.
स्पर्धेत उतरणं जसं स्त्रीत्वाला शोभत नाही असं मानलं जातं,
तसं आपलं पुरुषत्व सिद्ध करायचा
स्पर्धा हा एकमेव मार्ग आहे हे त्याला बोचत रहातं.
आपल्याकडे फक्त लैंगिकतेच्या नजरेतून पाहिलं गेलेलं जसं तिला आवडत नाही,
तसं त्यालाही आपलं पुरुषत्व सतत सिद्ध करायला हवं ही चिंता भेडसावित असते.
जसं तिला मुलांबाळांच्यात गुरफटून स्वतःला विसरावं लागतं,
तसं त्याला आपण पिता म्हणून मुलं वाढवताना मिळणारा आनंद उपभोगता येत नाही.
स्त्रीला जशी समान संधी किंवा समान पगार मिळत नाही,
तशी पुरुषालाही कुटुंबातील सर्वांना पोसण्याची पूर्ण आर्थिक जबाबदारी टाळता येत नाही.
स्त्रीला मोटार चालताना यंत्रविषयक माहिती आहे हे अपेक्षित नसते,
तसं पुरुषाला पाकसिध्दितला आनंद काय असतो हे कुणी शिकवत नाही.
जेव्हा मुक्तीच्या दिशेने स्त्री एकेक पाऊल पुढे टाकते,
तेव्हा पुरुषालाही आपला स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाल्याचं जाणवतं.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जशी स्त्रियांवर काही बंधनं, दबाव आणि नियंत्रण असतात तशीच ती पुरुषांवरही असतात. ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ याविषयीच्या समाजाने लादलेल्या साचेबद्ध कल्पना आणि अपेक्षा दोघांनाही माणूस म्हणून जगत असताना अन्यायकारक ठरतात. स्त्रियांप्रमाणे पुरुषही पुरुषप्रधान व्यवस्थेचे बळी आहेत याविषयी बोलणारी ‘तिला’ ही कविता.

संदर्भ : 'For Every Woman' 
या नॅन्सी स्मिथ यांच्या सुप्रसिध्द कवितेचा अनुवाद
अनुवादक : आशा दामले
2 Comments
  1. Anonymous says

    मुलीची गांड मारतांना मुलीला पण मजा येतेय का

    1. I सोच says

      सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वापरलेल्या भाषेविषयी बोलूयात. असे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण लैंगिकतेविषयी बोलताना कोणाला कमी लेखले जाऊ नये म्हणून आपण पर्यायी शब्द शिकून घेतले पाहिजेत. आता तुमचा प्रश्न. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. सेक्स करणाऱ्या व्यक्तींचा आनंद आणि संमती मात्र महत्वाची. जर एखाद्याला गुदमैथुन करताना आनंद मिळत नसेल तर जबरदस्ती करू नये. तो गुन्हाच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.