गोष्ट शरीराची…मनाची…
शरीर आपले सुंदर आहे
समजून घेऊया
गोष्टी शरीराच्या मनाच्या
गोष्टी ऐकूया ।।धृ।।
तनामनाने उमलून येणे
सहजी सुंदर सोपे व्हावे
भीती सोडू, बंधन तोडू
मैत्री जोडूया ।।1।।
आपण सगळे समान सारे
मुलगा मुलगी भेद नको रे
समानतेची गाणी आता
मिळून गाऊया ।।2।।
– मेधा काळे आणि प्राजक्ता धुमाळ