पुरुष तुंबतो
म्हणून वाहतो सुसाट
पुन्हा तुंबण्यासाठी
वाहवत जाण्यासाठी
बाई तुंबत नाही
वाहत नाही
पाझरत राहाते
ओली ओली होत
झिरपत राहे निरंतर
तिला तुंबणं माहीत नाही
म्हणून मोकळं होण्यातली
मर्दानगी कळत नाही
मोकळं झाल्यावर पुन्हा
तुंबण्यातली असोशी
तिच्या जगाला अनोळखी, हद्दपार...
त्याला पाझरणं माहीत नाही
म्हणून ओलाव्यात स्वत: ला
रुजवून घेत
आतल्या आत फुटणा-या कोंबासह
स्वत: ला बांधून घेत
मुळात मुळं रुजवत
जमीनभर पसरणारं बाईपण
त्याच्या समजूतीपल्याड, अचंबित…
पुरुषस्पंदनच्या २०११ दिवाळी अंक
प्रकाशक – Men Against Violence and Abuse (MAVA)
Nice
Thanks !!