मर्जी हेल्पलाईन

0 1,671

आपल्याकडे आजही अनेक महिलांना सुरक्षित गर्भपात कुठं करायचा, तो कसा होतो, गर्भधारणा होऊ नये म्हणून काय करायचं, याबद्दल माहिती नसते किंवा त्यांना मिळालेली माहिती योग्य असेलच याची खात्री नसते. माहितीअभावी अनेक महिला गरोदरपण नको असेल तर असुरक्षित गर्भपाताचा मार्ग अवलंबतात. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. काही वेळेला हे प्रयत्न जीवावरही बेतू शकतात.

म्हणूनच महिलांच्या मनात गर्भनिरोधक साधने आणि गर्भपातासंबंधी असणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरं देण्यासाठी ‘सम्यक’ या संस्थेमार्फत ‘मर्जी’ हॉटलाईन सुरू केली आहे.

मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763

या हॉटलाईनमार्फत पुढील विषयांवर माहिती दिली जाते, शंका निरसन केले जाते.

– गर्भनिरोधके, गर्भनिरोधकांचे प्रकार, ही निरोधकं कुठं मिळतात, ती कशी वापरायची?

– गर्भपाताबद्दल तांत्रिक महिती

– गर्भपाताच्या कायद्याबद्दलची माहिती

– गर्भपाताच्या सेवा पुरविणाऱ्या सरकारमान्य व खाजगी गर्भपात केंद्रांबद्दलची माहिती

– गरज पडल्यास सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताच्या सेवा पुरविणाऱ्या सरकारी किंवा खाजगी सेवांकडे गर्भपात करुन मिळण्यासाठी संदर्भसेवा

ज्यांना गरज आहे अशा महिला सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळामध्ये पुढील क्रमांकावर फोन करू शकतात. 9075 764 763

या क्रमांकावर फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव व इतर संपर्काबद्दलची माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. पुरुषही या हॉटलाईनवर फोन करू शकतात.त्यांना तांत्रिक माहिती दिली जाईल, परंतु प्रत्यक्ष मदतीची गरज असेल तर या संदर्भातील सर्व माहिती फक्त गरोदर महिलेलाच दिली जाते.

गर्भपातासंबंधीच्या आपल्या शंका समाधानासाठी एक हक्काची जागा या हेल्पलाइनने निर्माण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.