IS THAT EVEN A QUESTION?

1,263

लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांवर आवाज उठवण्यासाठी जगभरात सध्या #MeToo कॅम्पेन सुरु आहे. हॉलिवूड अभिनेत्री अलिसा मिलानोने सुरु केलेल्या #MeToo अभियानाअंतर्गत जगभरातील महिला त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सांगत आहेत.

हॉलिवूड अभिनेत्रीचं आवाहन
अलिसा मिलानोने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा करताना जगभरातील महिलांना आवाहन केलं होतं की, त्यांनीही अशाप्रकारच्या घटनांबाबतमोकळेपणाने सांगावं. जेणेकरुन ही छोटी किंवा दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, हे सगळ्यांना कळेल.

यानंतर महिलांसोबत घडणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कधी ना कधी अशाप्रकारच्या प्रसंगांना सामोरं गेलेल्या महिला #MeToo ह्या हॅशटॅगद्वारे त्यांची कहाणी ट्विटरवर शेअर करत आहेत. #MeToo ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये आहे. आतापर्यंत सुमारे 30 हजार महिला या हॅशटॅगशी जोडल्या गेल्या आहेत. काही पुरुषांनीही यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. हजारो लोकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा हॅशटॅग वापरुन आपली कमेंट लिहिली आहे.

#MeToo सुरु करण्यामागचं कारण काय?

हॉलिवूडचे निर्माते हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. जगभरातून टीका झाल्यानंतर त्यांची ऑस्कर बोर्डावरुन हकालपट्टी झाली. हार्वीच्या अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हार्वीचं हॉलिवूडमध्ये मोठं स्थान असल्याने अनेक अभिनेत्री त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी घाबरत होत्या. परंतु आता अनेकींनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या आहेत.
यानंतर लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅगद्वारे अभियान सुरु करण्यात आलं आहे,ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड होऊ घातलेल्या व्यक्तीवर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला. ही घटना त्या दोघांच्या शालेय जीवनातील म्हणजेच जवळपास पस्तीस एक वर्षांपूर्वीची आहे. अशी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश होऊ शकते का यावर मोठे वादळ अमेरिकेत निर्माण झाले. नुकतंच ही व्यक्ती अमेरिकी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत अध्यक्ष ट्रम्प आणि साथीदारांच्या सपोर्टच्या जोरावर न्यायाधीश म्हणून निवडली गेली.

#MeToo आता भारतातही 

हॉलिवूडप्रमाणे भारतात असलेल्या बॉलिवूड मध्येही सध्या #MeToo अभियान जोर धरत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर आणि कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती याच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता सोशल मीडियावर अनेक महिला यासंबंधी बोलत आहेत. आज चित्रपट निर्मात्या व लेखिका विनिता नंदा यांनीही जेष्ठ कलाकार आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. हे तर हिमनगाचे टोक आहे, अजून काय काय समोर येणार हे दिसेलच.

तुम्हाला काय वाटते आहे?

आरोप केवळ खूप वर्षे जुने आहेत म्हणून किंवा आता कुठले पुरावे नाहीत म्हणून आरोप खोटे ठरू शकतात का? अशा माणसांना काहीच शिक्षा होऊ शकत नाही का? तुम्हाला काय वाटते?

अशा प्रकारचे आरोप खरे असतील की फक्त पब्लिसिटी स्टंस्टस? सामाजिक माध्यमांच्या रूपाने खरंच महिलांना व्यक्त व्हायला एक साधन मिळाले आहे, अन महिला आता व्यक्त होत आहेत?

अशा वेळी तुमची काय भूमिका असेल?  आम्हाला नक्की कळवा.

तुमचं मत खाली कमेंट मध्ये अवश्य नोंदवा.

आपल्या वेबसाईटवरील या संदर्भातील काही पोस्ट :

“आता बास झालं!” – रोझ मॅक्गोवन    

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा……

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण) कायदा, २०१३

https://letstalksexuality.com/10395-2/

 

वर्तमानपत्रामधल्या काही लिंक :

https://www.bbc.com/marathi/india-45769408

https://www.bbc.com/marathi/india-45772876

https://abpmajha.abplive.in/technology/the-movement-of-metoo-social-media-flooded-with-personal-stories-of-assault-469249

 

 

Comments are closed.