कबीर सिंग – पडद्यावरचा अन् आपल्या आतला

आर यू सिरिअस?

2,600

कबीर सिंग हा हिंदी सिनेमा आला अन सुपर डुपर हिट झाला. सिनेमाच्या  बाजुने अन सिनेमाच्या विरुद्ध असा  भरपुर धुराळा उठला. आम्ही पण आपल्या वेबसाईटवर निरनिराळ्या  सिनेमांबाबत नेहमी बोलत असतो. या सिनेमाच्या निमित्ताने एक व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहोत. तुमच्या काही कमेंट असतील तर त्यांचे स्वागतच आहे.

सोबतच आपला युट्युब चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा अन शेअर करा.

चित्र साभार : गुगल आंतरजाल

6 Comments
 1. Mohini says

  हो….मी सहमत आहे.
  सिनेमात बऱ्याच गोष्टीत तरुणांच्या चुकीच्या समजांंना खतपाणी घातलंं आहे.माझ्या मैत्रिणी म्हणतात, प्रेमात असा attitude असलाच पाहिजे.
  आता मला समजत नाही तो Ms surgeon झाला अन मुलगी direct pregnant as ka? दुसरी गोष्ट शेवटच्या गाण्यामधील एका सिनमध्ये, त्याच्या भावाला सांगतो हिच्या पोटातील बाळ माझंं आहे. अन मग तिला accept करायला problem नाही, असे expression भाऊ पण देतो. आता काय समजावंं???

  1. let's talk sexuality says

   तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
   तुमच्या मैत्रिणींना असा अब्युजिव मुलगा जन्मभर चालणार का हे नक्की विचारा.
   जर मुल नको असेल व वेगवेगळया लिंगसांसर्गिक आजारांपासुन वाचण्यासाठी निरोधचा वापर करावा हे आपण सांगत असतो. पण कबीर सारखा डॉक्टर विसरतो याला आपण काय करणार. पण आपण मात्र सावधानगिरी बाळगायला हवी हे नक्की.
   राहिला प्रश्न त्याच्या भावाचा, तर आपल्याकडे लग्न व्यवस्थाच मुळी वारसासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे पोटात वाढणारे बाळ कुणाचे याभोवती आपली पुरुषप्रधान व्यवस्था काळजीपूर्वक लक्ष देऊन असतेच. अन तुम्हाला माहित असेलच की बाई वर हिच तर बंधनं असतात.
   शेवटी काय तर आपल्या भारतीय समाजमनात जे आहे तेच चित्रपट दाखवतो आहे बाकी काय!

 2. swapnali says

  हो.मी सहमत आहे.
  तुम्ही जे काम करताय ते छान करताय.

  1. let's talk sexuality says

   धन्यवाद !!

 3. Prashant says

  हो मी सहमत आहे आणि तुमी हे काम खूप छान करताय

 4. Shakti Jamdade says

  हा सिनेमा मी पाहिलेला नाही. परंतु आपल्या review मधून तो कसा आहे ह्याची स्पष्ट कल्पना येतेय. महिलांवरील पुरुषांची व एकंदरीतच पितृसत्तेची नियंत्रणे अधिक बळकट करणारा सिनेमा आहे. महिला ह्या भावनेने निर्णय घेतात व पुरुष डोक्याने निर्णय घेतात असा गैरसमज प्रचलित असून पुरुषच महिलांबाबत चांगले निर्णय घेऊ शकतात किंवा घ्यावा हेच बिंबविण्याचा प्रयत्न आहे. जेवढी महिला पुरुषांवर अवलंबुन राहील तेवढी पितृसत्ता, पुरुषी वर्चस्व अबाधित राहण्यास मदत होईल. केवळ स्त्री पुरुषांतील लैंगिक अवयवांमधील फरक हा त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांमधील भेदभावास कसा कारणीभूत ठरू शकतो हा प्रश्न ह्या सिनेमाचे व एकंदरीतच पुरुषप्रधानतेचे समर्थन करणाऱ्यांना सतत विचारायला हवा.

Comments are closed.