कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा……

1,219

अश्लील शेरे, नकोसा स्पर्श, शिट्टी मारणं, एकटक पाहणं अशा प्रकारच्या लैंगिक छळाला स्त्रियांना कधी ना कधी सामोरे जावे लागते. कॉलेजमध्ये, बस स्टॉपवर, रस्त्यावर आणि नोकरीच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या घटना सर्रास घडतात. आजकाल अनेक स्त्रिया संघर्ष करुन शिक्षण, नोकरी आणि करीअर असा प्रवास करत आहेत. कामाचं ठिकाण सुरक्षित आणि निकोप असावं त्याठिकाणी एकमेकांप्रती प्रतिष्ठा, आदर असावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र महिलांना बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. लैंगिक छळाची कोणतीही घटना जगण्याचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा किंवा कोणताही व्यवसाय करण्याच्या हक्कांचं उल्लंघन करते. म्हणूनच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा…

तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत, ‘कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबद्दलचा’ हा व्हिडीओ अवश्य पहा.

Comments are closed.