प्रेम करण्यासाठी डोळे नाही स्पर्शच महत्त्वाचा असतो!

1 1,585
मला दिसत नाही पण मला आवडणारी व्यक्ती आलेली मला लांबनंही कळतं. माझ्या कॉलेजमधली मुलं त्यांच्या फोनवर कसल्या कसल्या क्लिप्स पाहत असतात. आम्ही काही त्या पाहू शकत नाही. पण आवाजांवरून मग आम्हीच काय काय कल्पना करत बसतो.  तुम्ही जसं एकमेकांकडे पाहून हसता, तसंच आम्ही एकमेकींना जवळ घेतो, स्पर्श हेच आमचे डोळे आहेत. तरी सगळे जण आम्हाला ओरडतात.

अनेक दृष्टीहीन मित्र-मैत्रिणींनी सांगितलेल्या या आठवणी.

खरंच, दिसत नाही किंवा कमी दिसतं म्हणून मनात निर्माण होणाऱ्या भावना कशा काय बदलतील आणि का बदलाव्यात? दृष्टी नाही म्हणजे कुणाबद्दल आकर्षण वाटणार नाही, कुणाच्या प्रेमात पडणार नाही किंवा मनात लैंगिक इच्छाच निर्माण होणार नाहीत असं थोडीच आहे? पण आपल्या समाजात अजूनही कोणतंही अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही कसल्या लैंगिक भावनाच नाहीत अशा प्रकारे वागवलं जातं.

आता कामसूत्र ब्रेलमध्ये…

पण अंधांनाही लैंगिक भावना आहेत, त्यांनाही प्रेम, आकर्षण, प्रणय आणि सेक्स करावंसं वाटतं हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी थेट कामसूत्र ब्रेलमध्ये करण्याचं धाडस नीना लिंड्रा या 33 वर्षाच्या स्वीडिश युवतीने केलं आहे. अंध व्यक्ती प्रेम कसं करतात याचा शोध घेता घेता तिच्या लक्षात आलं की स्टॉकहोमच्या ब्रेल लायब्ररीमध्ये लैंगिकतेविषयी एकही पुस्तक नव्हतं. त्यामुळे खूप मेहनत घेऊन तिने हे पुस्तक तयार केलं आहे. कामसूत्रामध्ये दिलेली विविध आसनं, प्रणयाच्या पद्धती ब्रेलमध्ये चित्रित केल्या आहेत. कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे ही. तिच्या या पुस्तकामुळे किती तरी अंध मित्र मैत्रिणी खूश होतील.

प्रेमाचं आणि प्रणयाचं, मैथुनाचं आणि एकमेकांना सुख देण्याचं शास्त्र प्रत्येकानेच शिकायला पाहिजे. मग दिसत असो किंवा नसो. आणि खरं म्हणजे डोळ्यांपेक्षा स्पर्श जास्त बोलून जातो.

माहिती व चित्र साभार –  http://www.west-info.eu/a-kama-sutra-for-the-blind/

1 Comment
  1. Shekhar says

    yes…touch is required to initiate sex…and that though should give romantic feelings to both

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.