मूकनायक : समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन
रविवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१८
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजवर नेहमीच दूर असलेल्या समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथी, द्विलिंगी नागरिकांनाही त्यांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने यंदा पहिल्यांदाच समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, एलजीबीटीआय समुदायाचे हे पहिलेवहिले एकदिवसीय संमेलन पुण्यात होणार असून, त्यातून या समुदायाचा साहित्यिक अवकाश रसिकांना अनुभवता येणार आहे. समपथिक ट्रस्ट, पुणे यांच्यामार्फत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्वांसाठी संमेलनास मुक्त प्रवेश आहे, संमेलनात काही पुस्तकांचे प्रकाशन होणार असून, नाट्यवाचन, कवितावाचन, व्याख्याने आणि चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
आपल्या वेबसाईटच्या वाचकांना जर अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. तेव्हा या अन यातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्या.
रविवार दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, पुणे येथे
सकाळी १० ते संध्याकाळी ५
या वेळेत हे संमेलन होणार आहे.