अंतरंगा रे धरू…

1,768

फक्त प्रणय, शारीरिक जवळीक, मैथुन म्हणजे नातं असतं का? शरीराच्या पलिकडे जाऊन, वेगळा डाव मांडू पाहणाऱ्या एका सहचरीची अतिशय प्रगल्भ अशी ही कविता. अंतरीचं नातं जोडू पाहणारी ही कविता ‘सेक्स’चा  इतका सुंदर विचार मांडते की आपणही अंतर्मुख होतो.

ठेव रे विश्वास थोडा श्वास दे घेऊ मला
तापलेली रे तनू ही वस्त्र दे उतरू मला

पौर्णिमा उधळूं निघाले सर्व रे सोळा कळा
मी न आता राहिले रे पूर्वीची ती चंचळा

पोक्त मी झाले आता रे डाव मांडू वेगळा
हार किंवा जीत होणे हे नको रे आजला

खेळ ऐसा खूप झाला रंगला अन् संपला
एक ऐसा डाव मांडू रंग झेलू आतला

रंग जर का खेळताना सर्वही आले सरू
सात रंगांतून उरल्या अंतरंगा रे धरू

– आरती प्रभू

 

 

Comments are closed.