पुरूष गर्भनिरोधक कॅप्सूल विकासात आणखी एक यश, सेफ्टी टेस्ट यशस्वी! 

वैज्ञानिकांना पुरूष गर्भनिरोधक गोळीच्या विकासात आणखी एक यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी अशा एका कॅप्सूलचं परिक्षण केलंय, जी स्पर्मची अ‍ॅक्टिविटी कमी करते.

0 789

वैज्ञानिकांना पुरूष गर्भनिरोधक गोळीच्या विकासात आणखी एक यश मिळालं आहे. वैज्ञानिकांनी अशा एका कॅप्सूलचं परिक्षण केलंय, जी स्पर्मची अ‍ॅक्टिविटी कमी करते आणि याचे साइड इफेक्टही जास्त होत नाहीत. यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने ४० पुरूषांवर एक महिना अभ्यास केला. यात अभ्यासकांनी त्यांना एक कॅप्सूल दिली आणि हे जाणून घेतलं की, जे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन आणि स्पर्मच्या निर्मितीत मदत करतात, त्यांचा स्तर कमी करण्यास ही कॅप्सूल किती फायदेशीर ठरते.

डॉक्टरांना आढळलं की, जे पुरूष रोज एका कॅप्सूलचं सेवन करत होते. त्यांच्या हार्मोन्सचा स्तर कमी झाला. यातून हा निष्कर्ष निघाला की, स्पर्मचं प्रमाण फार कमी झालं. मात्र या अभ्यासाचा उद्देश केवळ निरीक्षण होता. त्यामुळे पुढील चाचणी ही थोडी उशीरा होईल. ज्यातून हे समोर येईल की, स्पर्म काउंटमध्ये किती कमतरता आली आहे आणि ही कमतरता पुरेशी आहे का? अभ्यासकांच्या टीमने पुढे सांगितले की, स्पर्म म्हणजेच शुक्राणूंच्या निर्मितीला प्रभावित करण्यासाठी या औषधाला कमीत कमी ६० ते ९० दिवस लागतील.

या प्रयोगाचे मुख्य आणि यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये मेडिसीनचे प्राध्यापक स्टेफनी पेज म्हणाले की, ‘आमचा हा उद्देश आहे की, ज्याप्रकारे महिलांसाठी वेगवेगळे गर्भनिरोधक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच पुरूषांसाठीही गर्भनिरोधकाचे पर्याय उपलब्ध व्हावेत. सध्या असे फार कमी पर्याय आहेत आणि त्यामुळे आपण लोकसंख्येचा एक मोठा भाग दुर्लक्षित करत आहोत’.

या अभ्यासात सहभागी झालेल्या ४० पुरूषांपैकी १० लोकांना प्लेसबो कॅप्सूल दिली गेली होती. यात अ‍ॅक्टिव डॅग नसतं. तेच ३० पुरूषांना २०० मिलिग्रॅमचा डोज दिला गेला. तर यातीलच १६ पुरूषांना ४० मिलिग्रॅमचा डोज देण्यात आला. सर्वच सहभागी लोकांनी रोज २८ दिवसांपर्यंत हा डोज घेतला. या औषधाचे फार कमी साइड इफेक्ट बघायला मिळालेत. जसे की, थकवा, पिंपल्स आणि डोकेदुखी.

एलए बायॉमेड आणि या रिसर्चचे आणखी एक वरिष्ठ अभ्यासिका क्रिस्टीना वॅग म्हणाल्या की, ‘हा अभ्यास फार छोटा आहे आणि स्पर्मची निर्मिती रोखण्यासाठी आम्हाला आणखी तीन महिन्यांचा कालावधी हवा आहे. आतापर्यंत आम्हाला हे आढळलं की, या औषधामुळे वीर्यकोषाची प्रक्रिया कंट्रोल करणाऱ्या हार्मोन्सना बंद करण्यात येतं. अजूनही पुरूष गर्भनिरोधक गोळी बाजारात उपलब्ध व्हायला १० वर्ष लागू शकतात. पण सध्या याची फार जास्त मागणी आहे.

बातमीचा स्त्रोत : http://www.lokmat.com/health/male-birth-control-pill-passes-safety-test-humans/

(चित्र साभार  : celebzmagazine.com)

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.