हस्तमैथुन: आनंददायी आणि सुरक्षित लैंगिक क्रिया
वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी ८०० च्या वर प्रश्नांवर आपण चर्चा केली. यामध्ये हस्तमैथुन, शिघ्रपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले. हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’ सेक्शनच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. या लेखात हस्तमैथुनाबद्दलची सर्व माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे.
हस्तमैथुन म्हणजे काय?
स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात.
मुली हस्तमैथुन करतात का ? जर होय, तर कशा ?
मुलीही माणूसच आहेत, त्यांनाही मुलांप्रमाणे लैंगिक भावना इच्छा असतातच. मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श करणं, ती ओढणं किंवा घासणं यातूनही उत्तेजना निर्माण होते.
हस्तमैथुन केल्याने काय धोका आहे ?
हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं, मुल होत नाही, हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.
काय खबरदारी घेऊ?
हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लैंगिक अवयवांना इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
किती वेळा हस्तमैथुन करू शकतो?
हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
सतत हस्तमैथुन करावंसं वाटतंय ?
हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा निर्माण होणे देखील योग्य नाही, आपण हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात लैंगिक क्रिया करण्याची इच्छा सतत येत राहण्याची शक्यता आहे व आपल्या भविष्यात त्याचे मानसिक दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर मनात सतत हस्तमैथुन करण्याची इच्छा होत असेल, तर आपले लक्ष दुसऱ्या क्रियाशील कामांमध्ये घालण्याचा प्रयत्न करा. वाचन करा, जर आपण विद्यार्थी असाल तर अभ्यासात लक्ष केंद्रित करा, खेळांमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करा. असं दिसून आलं आहे, की ज्या व्यक्ती एकाकी आणि दुःखी असतात त्या जास्त प्रमाणावर हस्तमैथुन करतात. तुमच्या बाबत असं काही होत आहे का, याकडे लक्ष द्या. एकाकीपणा घालवण्यासाठी बाहेर पडणं, इतरांना भेटणं, गरजेचं आहे. दुःखाचं कारण शोधायचा प्रयत्न केलात तर त्यावरही काही मार्ग काढता येतील.
आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे – https://letstalksexuality.com/question/
मनातील सगळे गैरसमज दूर झाले ना? या लेखात नमूद केलेली खबरदारी घेऊन, हस्तमैथुन करण्यात काहीही गैर नाही. आता मनातील भीती, अपराधीपणाची भावना, शंका-कुशंकांना सुट्टी द्या. मोकळेपणाने बोला, बिनधास्त बोला.
Sir kiti vela sex kela ki land motha hoto aanni lingavarchi skinkkayamchi mage kevha jate mazi skin ling uthlyavarach mage jate pn mala tras nahi pan mala ti skin ling zopet aastanasudha kayamchi mage tevnyasthi Kay karave lagel.
Sir plz reply dya
Vk552250@gmail.com ya var reply dya please sir
सेक्स केल्यानंतर लिंगाचा आकार मोठा होतो हा केवळ एक गैरसमज आहे. आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय नाही तसेच लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखात आजीबात बाधा येत नाही. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे.
हस्तमैथुन किंवा सेक्स करताना लिंगावरील त्वचा मागेपुढे होण्यास काही त्रास होत नसेल ती काढण्याची आवश्यकता नाही. कारण ती कायमस्वरूपी मागे ठेवता येत नाही. शस्रक्रिया करून काढावी लागते. यालाच सुंता असे म्हणतात.
याविषयी अधिक माहितीसाठी खलील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/male-circumcision/
अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
वीर्य गाडा कसा करायचा पातळ झालेलं आहे काही उपाय सांगा
किती वेळा हस्तमैथुन करावा दिवसातून एकदा की आठवड्यातून 1-2 , आणि रोज हस्तमैथुन केल्याने काय परिणाम होऊ शकतो, आणि त्यावर उपाय काय आहे ?
हस्तमैथुन किती वेळा करावं याचा कोणताही नियम नाही. ज्यावेळी तुम्हाला लैंगिक भावनांचा ताण जाणवत असेल त्यावेळी हस्तमैथुन करावं. मात्र तुमच्या दैनंदिन आयुष्यांमध्ये याचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
आपल्या हिंदू धर्मानुसार एखाद्या पर स्त्री किंवा विधवे बरोबर तिच्या संमतीने तिच्याशी शरीर संबंध ठेवणे पाप आहे का?
खरं तर देव, धर्म, पाप, पुण्य याबाबत आम्ही नाही सांगु शकत कारण ज्याची त्याची याबाबतची धारणा, समज ही व्यक्तिनिहाय वेगवेगळी असते.
कुणासोबत ही संबंध ठेवण्याआधी दोन्ही व्यक्तींची संमती आवश्यक आहे हेच आमचे म्हणणे आहे.जर संमती असेल तर काहीच अडचण नाही. अन जर वेळोवेळी गर्भनिरोधकांचा वापर केल्यास उत्तमच.
पण या नात्यामुळे आयुष्यात काय परिणाम होतील याचाही विचार करायला हवा.बहुतेक वेळा पुरुष जोडीदार जबाबदाऱ्या टाळताना दिसतात.म्हणुन येणाऱ्या अडचणी, धोके यांची जबाबदारी ही दोन्हीही व्यक्तींनी घ्यायला हवी.
तीचे म्हणने आहे कंडोम नसताना जास्त आनंद मिळतो. ती मॅरीड असल्यामुळे भीती वाटते.
कंडोम वापरल्याने मजा येत नाही किंवा आनंद मिळत नाही असं काही नाही.कंडोम वापरल्याने लैंगिक सुख मिळतेच, तसेच नको असणारी गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजारांची भिती राहत नाही. हे सगळं तुम्हाला समजून घेऊन तुमच्या पार्टनर ला ही सांगावे लागेल.
एकापेक्षा अधिक व्यक्तीसोबत लैंगिक संबंध असणाऱ्या व्यक्तिंनी तर कंडोमचा वापर केलाच पाहिजे. सुरक्षितता, सावधानता ही खूप महत्त्वाची आहे. तेव्हा या अशा चुकीच्या धारणा सोडून द्या व कंडोमचा वापर करालच अशी आशा आहे.
काॅल गर्ल सोबत सेक्स करताना कंडोम फाटले तर एड्स होऊ शकतो का ?
ज्या व्यक्तीसोबत सेक्स करत आहात त्यांना hiv/aids असल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो.
HIV /AIDS बाबत अजून जाणून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/hiv_aids/, https://letstalksexuality.com/hiv-aids-existence-origin-and-human-transition/ या लिंकला भेट द्या. सोबतच या लेखांच्या खालील कमेंटसही आवर्जुन वाचा.
खूप जास्त हस्तमैथुन केल्याने लग्न नंतर काही प्रोब्लेम येऊ शकतो का जसे की नंतर पुत्र प्राप्ती साठी
तुम्ही वरील लेख वाचला असालच, अन हे ही लक्षात आलं असावं की मुलं होण्याचा व हस्तमैथुन करण्याचा काहीही संबंध नाहीये. अन मुलगा होणार की मुलगी हे कुणाच्याच हातात नसतं.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा व ऐका.
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
एका वेळेस किती कंडोम वापरावे ?
एकच
सर मी ८-९ वर्षे झाले प्रोन masturbation karto mhnje Ulta झोपुन डाव्या हाताने लिंग शिथिल अवस्थेत हलवतो. मला सर्वसाधरण पद्धत माहिती नव्हती आता मी सर्वसाधरन पद्धतीने करतो मला काही अडचण येत नाही. पण आत्तापर्यंतच्या पद्धतीमुळे मला काही अडचण येईल का ? मी बऱ्याच जागी वाचल आहे की त्या पद्धतीमुळे लिंगाच्या नसा कमकुवत पडतात. Plz mala answer dya.
तुम्ही टेंशन घेऊ नका. तसं असतं तर सेक्स केल्यानेपण नसा कमकुवत झाल्या असत्याच की मग. तुम्हाला जर त्रास होत असेल वा या समस्येचा मनात ताण जाणवत असल्यास दुस-या पोझिशन चा ही विचार करु शकता.
असे खूप सारे समज गैरसमज हस्तमैथुनाबाबत समाजात असतात, आहेत !
सर मी YouTube वर हस्तमैथु नाचे व्हिडिओ पाहिले त्यांनी सागितले की बुद्धीची क्षमता कमी होते हे खरं असेल का ?
असं काहीही होत नाही. असं असतं तर मग बहुतेक पुरुष अन स्त्रिया यांची बुद्धी कमीच झाली असती. असले व्हिडिओ बनवणा-या लोकांपासून दूर रहा. अन अशा लोकांना असे लॉजीक वापरून प्रश्न विचारा. तुम्ही वरील लेख वाचला आहेच झालं तर मग… अजून काही लिंक देत आहोत त्या नक्की ऐका.
https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/