‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

5,125

मासिक पाळीच्या चक्राचे चाक आणि सरकपट्टी….

मासिक पाळीबाबत आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. केवळ धार्मिक रूढी-परंपरांच्या नावाखाली हे गैरसमज लहानपणापासून मुला-मुलींवर बिंबवले जातात. शास्ञीय माहितीच्या अभावामुळे, अनुपलब्धतेमुळे, संकोचामुळे हे  गैरसमज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिले आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून मासिक पाळीची प्रक्रिया समजून घेताना एक समान सूञ सापडतं. मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीरात म्हणजे अंडाशयात (बीजकोष) आणि गर्भाशयात नक्की काय घडतं हे वैज्ञानिक दृष्टीने आणि अतिशय सोप्या रीतीने समजून घेता येईल. यासाठी तथापिने मासिक पाळीचे चक्र तयार केले आहे.

मासिक पाळीचे चक्र ८ टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. या टप्प्यांमध्ये मासिक पाळीच्या काळापासून ते अंडोत्सर्जन नंतरचीही प्रक्रियाही दाखवली आहे. अंडाशयात, गर्भाशयात होणारे बदल चित्रांच्या माध्यमातून दाखवले आहेत. आठ टप्प्यांमध्ये विभागलेलं हे चक्र स्त्रीच्या शरीरात त्या त्या टप्प्यावर अंडाशयात काय होतं, गर्भाशयात काय होतं, अंदाजे किती दिवस तो टप्पा असतो, योनीमार्गातील स्त्रावांची नोंद ठेवण्यासाठी काही खुणा यांसह माहिती दिली आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या दोन संप्रेरकांशी या प्रक्रियेचा काय संबंध आहे, हे दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. चाकाच्या मागील बाजूस त्याची वापरण्याची पध्दत लिहिलेली आहे.

या चाकासोबत मासिक पाळी चक्र ‘सरक पट्टी’ तयार करण्यात आली आहे. अंडोत्सर्जनाप्रमाणे पाळीचक्राच्या लांबीत कसा बदल होतो ते यात दाखवले आहे. प्रत्येक पाळीचक्रामध्ये एक सूक्ष्म अंडं (स्त्रीबीज) तयार होते. अंडोत्सर्जन झाल्यावर साधारणपणे २ आठवड्यानंतर (१२ ते १६ दिवस) गर्भधारणा झाली नाही तर पाळी येते. अंडोत्सर्जन झाल्यानंतर पुढील मासिक पाळी साधारण किती दिवसांनी येवू शकते याचा अंदाज बांधण्यासाठी या पट्टीचा वापर होवू शकतो. यातूनच सुरक्षित काळ ओळखण्यास मदत होईल. या पट्टीच्या मागील बाजूस तिच्या वापरासंबंधीच्या सूचना आणि पाळीचक्राची संक्षिप्त माहिती दिली आहे.

मासिक पाळीचक्राचं ’चाक’ रु. २० तर मासिक पाळी ’सरक-पट्टी’ रु. १० या किंमतीस उपलब्ध आहे. ही दोन्ही संसाधने तथापि ट्रस्टच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी :

तथापि ट्रस्ट, तिसरा मजला, रेणूप्रकाश अपार्टमेंट, ८१७, सदाशिव पेठ, पुणे-३०

संपर्क क्रमांक: ०२०-२४४३११०६/२४४३००५७

ईमेल: tathapi@gmail.com

वेबसाईट: www.tathapi.org

14 Comments
 1. sidhdartha dadaji ghutke says

  Home / आपली शरीरे / ‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती
  Pali Chakra image
  ‘मासिक पाळीचक्रात नेमकं काय घडतं?’ हे समजून घेण्यासाठी तथापिची निर्मिती

 2. shyam sutar says

  Hastmaitun karat astana viry padu n den yogy ahe ka tyache parinam kay hotat

  1. I सोच says

   या प्रश्नाचे उत्तर वेबसाईटवर दिले आहे. उत्तरा साठी आधीचे प्रश्न आणि उत्तरे यावर जा. लिंक देत आहे
   https://letstalksexuality.com/question/

   1. I सोच says

    हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे.शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. मुलींनी किंवा मुलांनी कोणीही हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. पुरुषाचा लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) हा वीर्यस्खलन असतो. हस्तमैथुनातून असा क्षण आल्यावरही वीर्य बाहेर पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काहीही धोका होत नाही. वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा

 3. shiv says

  ❤ती….तो….आणि तिची मासिक पाळी…!❤सगळ्या विश्वाची निर्मिती कुणी केली..?तर उत्तर येतं…”देवाने…!”मग पुरुष कुणी निर्माण केले..?देवाने…स्त्रीया कुणी निर्माण केल्या…?देवाने…!मग स्त्री ची मासिक पाळी कुणी निर्माण केली…?देवानेच ना…?जर देवाला मासिक पाळी आवडत नाही तर मग त्याने ती स्त्रीला दिलीच कशाला..?मासिक पाळी म्हणजे काय…? गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वचा…!गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला 5 दिवस ही क्रिया घडते की जिला आपण मासिक पाळी म्हणतो…!आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं असा एक गैरसमज आहे किंवा या काळात स्त्रिया निगेटिव एनर्जी बाहेर टाकत असतात…असा एक फालतू गैरसमज आहे…खर तर दर महिन्याला गर्भाशय तयार होतं आणि गर्भधारणा न झाल्याने ते बाहेर टाकलं जातं…मग ते अशुद्ध कसे असेल…?उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महीने 9 दिवस संगोपन होणारे त्या जागी शरीरातील चांगलच रक्त असेल ना…? की अशुद्ध असेल..?झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं…आपण झाडाची फुले देवाला घालतो…कारण देवाला फुले आवडतात…बाईला मासिक पाळी येते…आणि म्हणून गर्भधारणा होते…म्हणजे मासिक पाळी जर ‘फूल’ असेल तर गर्भधारणा हे ‘फळ’ झालं..!देवाला झाडाच फूल चालतं मग मासिक पाळी का चालत नाही..?मासिक पाळी आलेल्या बाईचा साधा स्पर्श चालत नाही..?कधी कधी ती घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलते…की जे सरळ-सरळ निसर्गाच्या विरोधात जाणं आहे…आणि याचा त्रास तिलाच होतो…मुळात प्रोब्लेम जो आहे ना तो पुरुषी मानसिकतेत आहे…तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा आहे आणि त्या पेक्षा सर्वात जास्त स्वतः स्त्रीच्या मानसिक गुलामगिरित आहे…या गोष्टींकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलच नाहिये…!मासिक पाळी ही बाईची कमजोरी नसून निसर्गाने बाईला दिलेली ही जास्तीची शक्ती आहे की जी तिला आई बनण्याचे सुख बहाल करते…आणि कोण आहेत हीे फालतू जनावरं की जी सांगतात ‘ बाईला मासिक पाळीत मंदिरात प्रवेश नाही म्हणून..?’बाईच गर्भाशय म्हणजे वाटलं काय तुम्हाला..? कोण ही जनावरं की जी सांगतात 10-10 मुलं जन्माला घाला..!अरे एका बाळंतपणात बाईची काय हालत होते ना ते आधी ‘तुमच्या आईला’ जाऊन विचारा…पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यन्त 9 महीने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा…त्याला जन्म द्यायचा..त्याचे संगोपन करायचं…आणि एवढं सगळं करुन मुलाच्या नावात आईचा साधा उल्लेखही नाही..!मुळात गडबड आहे ना ती इथल्या सडक्या मेंदूत आहे..!प्रश्न आहे तोबाईला केवळ भोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या इथल्या घाणेरड्या पुरुषी मानसिकतेचा…!आणि जास्त गडबड आहे ती “तिच्यातच” आहे, कारण तीच स्वतःला समजून घेत नाही…ती कुटुंबाच्या भल्यातच इतकी गुंगते की तिला या गोष्टींवर साधा विचार करायलाही फुरसत नाही…हे सगळं चालू आहे ते “ती” गप्प आहे…ती विद्रोह करत नाही…ती मुकाट्यांन सहन करते…म्हणून !!!गरज आहे तिला विद्रोह करण्याची….इथल्या दांभिक वास्तवाविरुद्ध…इथल्या सडक्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध…इथल्या धर्माच्या अवडंबाविरुद्ध…आणि गरज आहे त्याने..तिला समजून घेण्याची…तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची…तिच्या भावभावनांना समजून घेण्याची…आणि या विद्रोहात तितक्याच हळुवारपने ‘तिला’ मदत करण्याची…!विचार तर कराल…? . . .स्त्रीच्या स्पर्शाने विटाळणारा देव गाई च्या मुञाने कसा काय शुद्ध होतो ? ? ?
  Respect for women…??

  1. I सोच says

   धन्यवाद शिव… वेबसाईट नियमित वाचत जा. तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा…

  2. Anonymous says

   बरोबर आहे समजून घेतले पाहीजे प्रत्येकाणे

   1. I सोच says

    हो. लैंगिकतेविषयी कोणतेही प्रश्न/शंका/अनुभव असल्यास नक्की शेअर करा. तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही.

  3. kailas patil says

   kharach khupach saundar ahe tumacha lekh

   1. let's talk sexuality says

    धन्यवाद!

 4. सचिन says

  मी माझ्या प्रेयसी शि लैंगिक संबंध ठेवले होते, पण तिचे नंतर 2 महिने Period रेग्युलर आले आणि यावेळी तिचे Period येत नाहियेत, 4 दिवस झाले तरी, आणि तिची Tabiyet पण खूप सुटत आहे मला भिती वाटते आहे की ती प्रेग्नंट आहे की काय, 3 महिने झाले आम्ही संबंध नाही ठेवले, तर आसे होऊ शकते का की काही महिने pregnancy मध्ये pn period येतात आणि मग नंतर बंद होतात.

  1. I सोच says

   लैंगिक संबंधानंतर मासिक पाळी चुकणे म्हणजेच गर्भ राहणे होय. लैंगिक संबंधानंतर नियमित मासिक पाळी येत असेल तर गर्भधारणा असण्याचा प्रश्नच येत नाही. मासिक पाळी नंतर लैंगिक संबंध आले होते का? जर आले असतील व त्यातून गर्भधारणेविषयी शंका वाटत असेल तर त्वरीत प्रेग्नन्सी टेस्ट करू करा.
   तब्येत वाढत चालली म्हणजे गर्भधारणा असेलंच असे नाही. यामागे इतरही काही कारणं असू शकतात त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या..
   गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/conception/
   नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भानिरोधकांचा वापर करणे योग्य ठरेल
   गर्भनिरोधकांविषयी माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   https://letstalksexuality.com/contraception/

 5. Nilu says

  Hi hello m&s mi kelela prashn tyach utter kadhi mule Jr atta comment Kel tr

  1. lets talk sexuality says

   मित्रा,
   लेखाच्या खाली जर लेखाबाबत प्रतिक्रिया, सूचना किंवा आणखी काही असल्यास लिहावे अशी वाचकांकडून आमची अपेक्षा आहे.
   तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर https://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंक वर जाऊन प्रश्न विचारु शकता.
   तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढील 4 ते 5 दिवसांच्या आत मिळेल.

Comments are closed.