मोबाईलचा गैरवापर थांबवा

997

महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड आणि छळवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात तर छळवणूकीच्या नेहमीच्या प्रकारांबरोबरच “सायबर बुलिंग” म्हणजेच इंटरनेट किंवा फोन इत्यादींचा वापर करून केली जाणारी छळवणूक असे अनेक नवनवीन प्रकार समोर येताना दिसतात. इंटरनेट, फेसबुक आणि व्हाट्स अप वरून अश्लील/नको असलेले मेसेज, विडीओ, फोटो मेल आणि अफवा पसरवणे असे प्रकार चालतात. फेक अकाउंट काढून कोणालाही हेतुपुरस्सर दम, धमकी, त्रास दिला जातो शिवाय ब्लॅकमेल केले जाते.

याविषयी बोलणारा तथापिच्या पुढाकाराने ‘मोबाईलचा गैरवापर थांबवा’ हा व्हिडीओ अवश्य पहा.

Comments are closed.