बाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२
बालकांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार होतात हे जीवनाचे एक कटू सत्य आहे. मुस्कान प्रकल्प २०१५ पासून, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे अंतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बालक, पालक शिक्षक, बालकांबरोबर काम करणाऱ्या व्यक्ति व संस्था ई साठी जाणीव जागृती कार्यक्रम घेतले जातात. लैंगिक अत्याचार झालेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद व वेदनादायी अनुभवातून बाहेर पडता यावे आणि आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे यासाठी समुपदेशन आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केला जातो. बाललैंगिक अत्याचारा संदर्भातील माहिती, मदत आणि आधार देण्याकरिता मुस्कान तर्फे हेल्पलाईन चालविली जाते.
मुस्कान हेल्पलाईन:- + ९१ ९६८९०६२२०२
ईमेल: muskaanpune@gmail.com
वेबसाईट : https://www.foundationforchildprotection.in/