वेबसाईटबद्दल तुम्हाला काय वाटते ?

869

मागच्या वर्षी तथापि संस्थेनं  लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी मनमोकळ्या संवादाची, विश्वासाची एक जागा (स्पेस) letstalksexuality.com  ही वेबसाईट खुली करून निर्माण केली. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावेत, लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं आणि प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली.

वाचकांनी वेबसाईटला भरभरून प्रतिसाद दिला. प्रसिद्धीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न न करता एका वर्षात जवळजवळ ३ लाखापेक्षा अधिक हिट्स,  २५० कमेंट्स, ६३० प्रश्न, एका महिन्यात प्रत्येक पोलसाठी जवळजवळ ३०० लोकांचा प्रतिसाद ही वाचकांनी वेबसाईटवर भरभरून दिलेल्या प्रतिसादाची पोचपावतीच आहे. वेबसाईटला असाच भरभरून प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.

आपल्यापैकी काही जणांनी वेबसाईटविषयी मत, विचार, प्रतिक्रिया आणि सूचना दिल्या आहेतच;  पण आम्हाला जास्तीत जास्त वाचक मित्रांकडून, ‘तुम्हाला वेबसाईटबद्दल काय वाटते?’ हे जाणून घ्यायला आवडेल. आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पुढीलप्रकारे पोहचवू शकता.

१. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा 9545555670 या मोबाईलवर whatsapp चा वापर करून  तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता.

२. मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून 9545555670 या मोबाईलवर whatsapp चा वापर करून आम्हाला पाठवू शकता. (कृपया यावर प्रश्न विचारू नका. प्रश्न वेबसाईटवरच विचारा. )

तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आमच्यासाठी महत्वाचे आहे.

सुरक्षित समाजासाठी चला लैंगिकतेवर बोलूया…

आपली प्रिय,

आयसोच आणि तथापि टिम…

 

Comments are closed.