प्रश्नोत्तरेCategory: Private Questionअसाव कुणीतरी…

असाव कुणीतरी…… आपल्या हाकेला ‘ओ’ देणार….. रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार.. असाव कुणीतरी…… आपल्या सोबत चालणार.. चांदण्यात फिरताना हातात हात घेणार.. असाव कुणीतरी…… कधी वाद घालणार.. खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार.. असाव कुणीतरी…… मनमोकळ बोलणार.. काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार.. असाव कुणीतरी…… खूप काही विचारणार.. लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार.. असाव कुणीतरी……..

majh vay 20 aahe. Mala 25 tarkhela pali aaleli 3days rahili aani stop jhali aata aaj parat tasach jhal…Blooding pn jhal ….As ka i mean lagech ashi palmajh vay 20 aahe. Mala 25 tarkhela pali aaleli 3days rahili aani stop jhali aata aaj parat tasach jhal…Blooding pn jhal ….As ka i mean lagech ashi pali yete ka plz ans sir/madami yete ka plz ans sir/madam

1 उत्तर

अगं होतं असं कधीकधी. टेन्शन घेऊ नकोस. कधी कधी पाळी अनियमित होऊ शकते. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क कर.

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

तुझी कविता छान आहे बरं का. पण प्रश्न विचरण्यासाठी कवितेचा आधार घेण्याची गरज नाही. आपल्या शरीराविषयी, आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणानं बोलायला लाजायचं कशाला ? बिनधास्त प्रश्न विचार तुझी ओळख उघड होणार नाही. निर्धास्त राहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 10 =