सर माझ्या gf ची पाळी नुकतीच संपली आणि आम्ही लगेच असुरक्षित सेक्स केला आणि वीर्य योनीमध्ये गेलं.तर गर्भधारणा होऊ शकते का आणि झाली तरी कशी टाळता येईल. कृपया मार्गदर्शन करा
हे तुमच्या मैत्रिणीच्या मासिक पाळीचक्रावर अवलंबून आहे. त्या काळात जर अन्डोत्सर्जन झाले असेल तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर सुरक्षित गर्भनिरोधक वापरणे हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे.
मासिक पाळीची तारीख उलटून गेल्यानंतरही पाळी आली नाही तर प्रेग्नंसी कीट च्या सहाय्याने गर्भधारणा आहे की नाही चेक करा.
राहिले आणि मूल नको असेल तर योग्य तो वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.
गर्भपाता विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/abortion/
आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/