हा तुमचा अंदाज तर नाही ना? ऐकीव माहितीवरून किंवा मित्रा-मित्रांमधील चर्चेवरून एखाद्याविषयी अंदाज बांधणे किंवा समोरील व्यक्ती सेक्ससाठी उपलब्ध आहे असे गृहीत धरणे योग्य आहे का?
तुम्हाला कोणाशीही लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर समोरच्या व्यक्तीची संमती असणं आवश्यक आहे. नाहीतर असे संबंध कायद्याने गुन्हा ठरू शकतो. शिवाय दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. शेवटी निर्णय तुमचा पण त्याच्या परिणामांची जबाबदारी देखील घ्या.
आणखी एक गोष्ट, झवने सारखे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतो आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. काहींना पर्यायी शब्द माहित नसतात हे आम्ही समजू शकतो. पण मुद्दामहून जर कोणी असे शब्द असेल तर मात्र पर्यायी शब्द शिकून घ्यायला पाहिजे आणि त्याची सवय करायला पाहिजे. आणखी एक गोष्ट प्रत्यक्ष संबंधांमध्ये जोडीदाराविषयी तिच्या शरीराविषयी आदरच असायला पाहिजे.