प्रश्नोत्तरेचेहर्यावर पिंपल्स आल्यावर ते नाहीसे करण्यास उपाय सुचवा

1 उत्तर

पिंपल्स किंवा ज्याला मुरुमं म्हणतात ते त्वचेशी संंबंधित असतात. शरीरात जे वेगवेगळे हार्मोन्स, किंवा संप्रेरक तयार होतात त्यामुळे पिंपल्स येतात. चेहरा साध्या पाण्याने नियमित धुवा. तेलकट खाणं कमी करा. चेहऱ्याला कोणतेही क्रीम किंवा इतर प्रसाधनं लावू नका. काही काळाने पिंपल्सची समस्या जाऊ शकेल. खूप प्रमाणावर पिंपल्स येत असतील तर काही वेळा वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्वचेचे डॉक्टरच तुम्हाला योग्य ते क्रीम सुचवू शकतील. चिंता करत राहू नका. यात घाबरण्यासारखं काही नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 4 =