प्रश्नोत्तरेजात- एक जिवघेणी संकल्पना

काय आंतरजातीय विवाह करने गुन्हा आहे?

अगर नाही तर त्यास एवढां विरोध का

1 उत्तर

आंतरजातीय विवाह करणे हा कायद्याने गुन्हा नाही. विशेष विवाह कायद्यानुसार आंतरजातीय विवाह हा कायदेशीर मानला जातो. पण तरीही  आंतरजातीय विवाहाला अजूनही तितकीशी समाजमान्यता नाही हे वास्तव आहे. आंतरजातीय विवाहाला  कुटुंबीय, समाज यांच्याकडून आजही तीव्र विरोध होतो हे तुमचं म्हणणं  अगदी बरोबर आहे. या विरोधातूनच ऑनर किलिंग  सारखे प्रकार घडतात. वेगळ्या जातीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडल्याबद्दल किंवा लग्न केल्याबद्दल मुलांना आणि  मुलींना मोठ्या प्रमाणावर हिंसेचा सामना करावा लगतो.  खरंतर , स्वतंत्र भारतात आजही जात पाळली जाते हा फार मोठा अन्याय आहे.
 
 या विरोधामागे समाज, शेजारी-पाजारी, नातेवाईक असे अनेक प्रकारचे दबाव तसेच  संस्कृती, जातीच्या, घराण्याच्या इज्ज्तीच्या खोट्या कल्पना, बंधनं कारणीभूत असतात. कधीकधी पालक जात पात मानत नाहीत पण नातेवाईक व समाजाच्या दबावाला तोंड देण्याचं बळ त्यांच्यामध्ये नसतं त्यामुळे ते अशा लग्नास विरोध करतात.  संस्कृती, जातीच्या, घराण्याच्या इज्ज्तीच्या खोट्या कल्पना, बंधनं  आपल्या समाजामध्ये खोलवर रुजली आहेत. म्हणूनच जात व्यवस्था मोडून काढणं हे निश्चितच अवघड आहे. मात्र अशक्य नाही.
 
दोघांची तयारी असेल, मुख्य म्हणजे दोघं सज्ञान असतील , स्वतःच्या पायावर उभे असतील , स्वतंत्र रहायला तयार असतील  तर  विशेष विवाह कायद्याची मदत घेऊन आंतर जातीय लग्न करायला काहीच हरकत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 15 =