दोन्ही जोडीदारांचे रक्तगट समान असल्याने मुल होत नाही हाच मुळात एक गैरसमज आहे. समान रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही. दोघांचे रक्तगट समान असणे ही जर समस्याच नाही त्यामुळे अर्थातच उपायांचीही आवश्यकता नाही. रक्तगटासंबंधित एकमेव प्रश्न उद्भवू शकतो तो म्हणजे जर आईचा रक्तगट आरएच निगेटिव्ह (Rh negative) असेल आणि जर तीला आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर ४८ तासांच्या आत एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईला ऍन्टीबॉडीज म्हणजेच काही विशिष्ट प्रकारच्या री-अॅक्शन येऊ शकतात. तसेच जर तीला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
पुन्हा एकदा आवर्जून नमूद करावेसे वाटते की समान रक्तगट असणाऱ्या पालकांना मुल होण्यात काहीही अडचण येत नाही.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
प्रश्न असा आहे कि जर आईचा रक्तगट AB निगेटिव व पतिचा A पाँझीटीव असेल तर बाळ कोणत्या रक्तगटात जन्माला येईल
बाळाचा रक्तगट A, B or AB या पैकी काहीही असू शकतो. Rh च्या बाबतीत बाळाचा रक्तगट पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. म्हणजेच बाळाचा रक्तगट A + ve, A – ve, B + ve, B – ve, AB + ve, AB – ve यापैकी कोणताही असू शकतो.
बाळाचा रक्तगट पॉसिटीव्ह असेल तर पहिल्या बाळंतपणात आईच्या रक्तात बाळाच्या रक्तातील काही घटक मिसळतात आणि त्यामुळे पुढील बाळंतपणात जर बाळ पुन्हा पॉसिटीव्ह असेल तर बाळाला त्रास गरोदरपणात होऊ शकतो. तो टाळण्यासाठी पहिल्या पॉसिटीव्ह बाळाच्या जन्मानंतर आईला लगेचच काही इंजेक्शन देतात. पुढील बाळांना होणारा धोका त्यामुळे टळतो.