प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरूष 18 वर्ष आणि महिला 26 वर्ष असल्याने pregnancy la kahi prob ahe ka
1 उत्तर

नक्कीच नाही. पुरुषांच्या शरीरामध्ये वयात आल्यापासून वीर्यनिर्मिती सुरु होते. याच वीर्यातील शुक्राणूमुळं गर्भधारणा होत असते. वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून सुरु झालेली वीर्य निर्मिती कधीच थांबत नाही.

हे लक्षात ठेवा. ज्यावेळी स्त्री किंवा पुरुष वयात येतात तेव्हा त्यांच शरीर प्रजोत्पादनासाठी तयार झालेलं असतं. म्हणजे पुरुषांना वीर्य येणं चालू झाल्यावर आणि स्त्रीयांना मासिक पाळी येणं चालू झाल्यावर गर्भधारणेची शक्यता नेहमीच असते. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं आवश्यक असतं.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/contraception/

गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/conception/

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 11 =