प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपॉर्न पासुन सुटका कशी करुन घ्यावी?

माझे वय २१ वर्ष. सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन व्यसनात अडकलोय. सतत पोर्न बघणं ( दिवसातून ७ वेळा) आणि हस्तमैथुन करणं, एवढच आयुष्य उरल्यासारख वाटायला लागलंय.  खुप मजा यायची  सुरवातीला  पण आता मात्र हा माझ्यासाठी आजार होऊ लागलाय. पोर्न पाहून, सेक्स स्टोरी वाचून आपलीही एखादी सावत्र आई हवी, जिच्याशी मी शारिरीक संबंध ठेवावा असंं वाटतंं. पण खुप किळसही येते स्वत:ची. फेसबुक वर खुप मटेरियल पाहिल ज्यात आईबद्दल खुप घाण लिहिलेलंं असायचंं. हस्तमैथून करताना हे खुप छान आहे अस वाटतंं पण नंतर स्वत: ची किळस येते. फेसबुक वर फेक अकाउंट बनवुन मुलांशी चॅट देखील केलंं.  खुप मुलंं अशी आहेत . आईबद्दल अशा भावना असणारी दहा हजार पेक्षा जास्त अकाउंट आहेत फेसबुकवर. प्लीज मला मदत करा .यामुळे माझा अभ्यास होत नाही . करियर वर खुप वाईट परिणाम होत आहे. मला खुप गरज आहे यातुन बाहेर निघण्याची. माझी खुप इच्छाही आहे यातुन बाहेर निघण्याची. मला मदत करावी व योग्य तो सल्ला द्यावा.

1 उत्तर

मित्रा, तुझ्या प्रश्नात जे दोन मुख्य आणि वेगवेगळे मुद्दे दिसतात, त्यापासुन आपण सुरुवात करु. पॉर्न बघणे आणि हस्तमैथुन करणे, याव्यतिरिक्त आपल्याला इतर काही सुचत नाही आणि तेवढेच आपले आयुष्य उरले आहे, असं तुला वाटतंय, हा आजार आहे अस वाटतंय असं तु म्हणालास.
समुपदेशकाशी बोलण्यात काहीच वावगे नाही:
पहिली गोष्ट हा आजार अजिबात नाही आहे. आपण जे बघतो त्यबद्दल मनात विचार येण सहाजिक आहे. पण पोर्न बघण्याचं प्रमाण दिवसातुन सात वेळा बघणे एवढे झाले असेल, त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होत असेल तर एखाद्या समुपदेशकाशी (counselor) बोलण्यात काहीच वावगे नाही असे वाटते.
सवयींनी बदलणे:
आपली आपण सुरुवात करायची असं म्हणल्यास, आपल्याला घातक वाटत असलेल्या एखाद्या सवयीपासून सुट्का हवी असल्यास, ती सवय एखाद्या दुसर्या, चांगल्या सवयींनी बदलणे हा मार्ग असु शकतो. उदा. जर प्रकर्षाने सिगारेट ओढायची इच्छा झाली, तर लोक 15 मिनीटे खुल्या हवेत चालुन चालुन येतात.
शरीराचा, मनाचा संवाद:
ब-याच व्यसनांमागे आपल्याला त्यांची सातत्याने गरज का वाटते? याची काही सहसा वरवर न दिसणारी कारणे असतात. जसं घरात किंवा ऑफिसात बसुन-बसुन कंटाळा वाटु लागला, इतर कोणाला बघितले, मनात कुठलीशी बाब सलत असेल तर त्यामुळे सिगारेट ओढायची इच्छा होई. आरोग्याला अपायकारक ठरु शकतील अश्या गोष्टी स्वत:हून कोण आणि का बरे करायला जाईल? अशा वेळी आपले शरीर, आपले मनच आपल्याशी संवाद करायला बघत असतात.
आपल्याला सातत्याने पॉर्न का पहावेसे वाटते? कंटाळा आल्यावरही, शरीर दमल्यावरही? आपलं मन आपल्याशी काय बोलू पाहतय? काही खुपतय का? कसला त्रास मनाला आहे का? ज्यामुळे मन सतत पॉर्नकडे आपल्याला घेऊन जात आहे? या प्रश्नांची उत्तरे आपली आपण शोधणं जरा अवघड ठरु शकते. यासाठी समुपदेशकाची मदत घेणे, हा एक चांगला पर्याय आहे.
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे इतरांना त्रास होत नाही ना? :
दुसरा मुद्दा पाहता, हे पडताळून पाहणे गरजेचे आहे कि नक्की आपल्याला आकर्षण कशाबद्दल वाटते? सावत्र आई किंवा इन्सेस्ट संबंधांबद्दल की, त्या पॉर्न फिल्म्समध्ये दाखवलेल्या नट-नट्यांबद्दल? हस्तमैथुन करत असताना त्याबद्दल जर चांगले वाटत असेल आणि तुझ्या कृतीमुळे इतर कुणाला काही हानी पोहोचत नसेल, तर त्यात काही हरकत आहे, असं आम्हाला वाटत नाही. नंतर येणारी वाटणारी घृणेची भावना आपण जगत वाढत असलेल्या समाजाचे, सामाजिक भावनांचे द्योतक असते. स्त्री पुरुष आपापल्या मर्जीने, एकमेकांच्या संमतीने जर कोणतीही गोष्ट करत असतील आणि त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पणे त्रास इतरांना होत नसेल, तर त्यात काहीही वावगे नाही, असं आम्हाला वाटतं. तेव्हा त्या मध्ये स्वतःची लाज वाटण्याजोगे काही कारण नाही असेही आम्हाला वाटते.
सवय कि आनंद?:
पण पोर्न बघण्यात, हस्तमैथुन करण्यात मज्जा येत नसेल तर फक्त सवय म्हणुन तसं करायलाच पहिजे असंही काही नाही.
So take a break.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 13 =