प्रश्नोत्तरेपोर्न फिल्म मध्ये योनी भोवती काळे नसते,आकर्षक असते तशी इकडी मुलींची का नसते?

1 उत्तर

पॉर्न क्लिपमधून दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्याच असतात असे नाही. बऱ्याचदा अशा क्लिप्समधून एकप्रकारचं आभासी वलय निर्माण केलं जातं आणि वास्तविकतेपेक्षा याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. लैंगिक अवयवांची त्वचा पातळ आणि लवचिक असते. याठिकाणी आद्रता किंवा दमटपणा अधिक असल्याने निसर्गतःच सगळ्यांचेच लैंगिक अवयव (योनी आणि शिश्न) इतर अवयवांच्या तुलनेत काळे असतात. हे अगदी नैसर्गिक आणि निरोगी आहे.

मात्र बाजारात काही कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी लैंगिक अवयव गोरे करण्यासाठी काही उत्पादने तयार करत आहेत त्याला बळी पडू नका. लैंगिक अवयवांजवळ अशा क्रीम्स किंवा उत्पादने लावल्याने उलट संसर्ग होण्याचा धोका असतो. शिवाय पैशांचा अपव्यय. काळं किंवा गोरं यापेक्षा लैंगिक अवयवांची स्वच्छता आणि काळजी याकडे लक्ष दिलं तर ते अधिक योग्य राहील. आणि हो.. गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरूप या सौंदर्याच्या कल्पनेलाच छेद दिला पाहिजे. आपण निसर्गतः जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 0 =