प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रेम आणि आकर्षण

प्रेम आणि आकर्षण यात काय फरक असते …प्रेम एकाच व्यक्ती शी होऊ शकतो का …जसे जसे आपण मोठे होत जास्त असतो तस तसे प्रेमाच्या कल्पना बदलतात …मग जोडीदार निवडण्याचे योग्य असा काळ कोणता ….की ते आपल्यावर असते …माझ्या काही मित्रांना पाहिलंय ते 1 वर्षानंतर लगेच gf ला विसरतात …आणि दुसऱ्या मुलीकडे ते आकर्षित होतात ..म्हणजे जर ती मुलगी आपली जाली की तिच्या बद्दल प्रेम कमी होत का ?

1 उत्तर

येथे प्रेम हे स्त्री पुरुषांमधील प्रेम या अर्थाने घेतले आहे असे दिसते . दोघा प्रेमी व्यक्तींना एकमेकांचा सहवास सतत हवाहवासा वाटतो. ते एकमेकात शरीराने आणि मनाने गुंतले असतात. तसेच त्यापुढे जाऊन त्यांनी एकमेकांचा व्यक्ती म्हणून सर्वार्थाने स्वीकार केलेला असतो. आकर्षण हे शारीरिक जास्त असते आणि त्यामुळे ते कालांतराने विरून जाऊ शकते. एखादी व्यक्ती आवडणे म्हणजे तिचे स्वभावगुण आणि व्यक्तित्व आवडणे हे असू शकते. ही आवड पराकोटीची असली तरी ते प्रेम असेलच असे नाही. ही भावना ओढ, स्नेह किंवा मैत्री असू शकते. पण प्रेमामधील समर्पणाचा भाव त्यात आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कित्येक वेळा असे होऊ शकते की तरुण व्यक्तीला स्वतःच्या योग्यतेबद्दल शंका असते आणि कुणी आपल्या जवळ येत आहे, आपल्याला स्वीकारत आहे आणि आपण कुणाला तरी आवडत आहो ही जाणीव इतकी सुखावह असते की त्या भावनेपोटी आपण त्या व्यक्तीच्या जी आपल्याला स्वीकारते अधिकाधिक जवळ जातो. ही जवळीक म्हणजे ना प्रेम असते ना आकर्षण. ती असते आपले स्वत्व टिकविण्याची भावनिक गरज. ती गरज भागली की मग त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना बदलू शकतात. स्वतःबद्दल आपल्याला काय वाटते हे आपण पाहत राहिले पाहिजे. कारण आपल्याला आपण आवडत नसलो तर मग जगाला आपण आवडावे अशी आपली धडपड व्यर्थ ठरू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 15 =