प्रश्नोत्तरेबाईकोशी संबंध ठेवायचे आहेत लिंग जाण्यासाठी कसे करावे लागेल (सदर प्रश्नाची भाषा बदलली आहे)

2 उत्तर

गांड. लंड, झवने हे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. तसेच हे शब्द हिंसक आणि अतिशय अपमानकारक वाटतात. काहीजणांना पर्यायी शब्द माहित नसतात, हे मी समजू शकते पण जाणूनबुजून असे शब्द वापरले जात असतील तर ते ताबोडतोब थांबवले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याच्यामध्ये मी जाणार नाही पण समोरच्या व्यक्तीला देखील छान वाटावं, तुमच्याशी लैंगिकतेबद्दल बोलावसं वाटावं यासाठी पर्यायी शब्द वापरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा.
सगळ्यांत महत्वाचं म्हणजे असा सेक्स करण्यासाठी तुमच्या बायकोची तयारी, इच्छा, संमती आहे का? जोडीदाराच्या संमतीशिवाय सेक्स करणं हा कायद्याने गुन्हा आहे. लग्न झाले म्हणजे बायकोसोबत काहीही करण्याचे लायसन मिळाले असं समजण्याची गरज नाही आणि कृपया बायकोला गृहीत देखील धरू नका. तुमच्या जोडीदाराशी याविषयी बोला. तिची संमती असेल तरच पुढे जा. दोघांचाही आनंद तितकाच महत्वाचा आहे.
गुदमैथुनाविषयी आणखी थोडं जाऊन घेऊयात. लैंगिक संबंधांच्या अनेक प्रकारांमपैकी गुदामैथुन एक आहे. शौचाच्या(शीच्या) जागेतून म्हणजेच गुदामधून देखील संभोग करता येतो. स्त्री-पुरुष किंवा पुरुष-पुरुष या मैथुनाचा उपयोग करतात. याला गुदामैथुन असं म्हणतात. यामध्येदेखील गर्भधारणेची भिती नसते. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, योनीमार्गासारखां गुदामार्ग लवचिक नसतो. गुदामधून लिंग आत सरकवताना जखम होण्याची शक्यता असते, त्यामुळं योग्य ते वंगण वापरणं फायदेशीर राहतं. काहीजण कृत्रिम वंगण (लुब्रींकंट/जेली) चा वापर करतात. हे (लुब्रींकंट/जेली) मेडिकलच्या दुकानात उपलब्ध होऊ शकते. जोडीदाराला अशा संभोगातून काही इजा किंवा त्रास होत आहे की नाही हे विचारा. कोणत्याही मैथुनाच्यावेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 17 =