प्रश्नोत्तरेबाईचे वक्षस्थळ दाबल्याने बाईचे योनी स्खलन होते का

1 उत्तर

स्त्रीला लैंगिक इच्छा निर्माण झाली, ती लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झाली की, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, शिस्निकेत, मोठ्या व छोट्या भगोष्ठात रक्तप्रवाह वाढतो. प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने विशेष लैंगिक सुख व लैंगिक उत्तेजना मिळते. तसेच योनीच्या आतील स्राव वाढतो व योनीतील ओलावा वाढतो. त्यामुळे वक्षस्थळ किंवा इतर अवयव, ज्यांना स्पर्श केल्यावर लैंगिक उत्तेजना मिळते, अशा अवयवांना स्पर्श केल्याने स्त्रीच्या योनीतील ओलावा वाढतो.

Anand Patil replied 2 years ago

वक्षस्थळ मोठे करण्यासाठी औषध आहे का?

let's talk sexuality replied 2 years ago

औषध नाही पण काही शस्त्रक्रिया केली जाते. स्तनांच्या आकाराबाबत अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा.
https://letstalksexuality.com/breast_size/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 16 =