प्रश्नोत्तरेबाळ होऊ नये म्हणून काय करावे

1 उत्तर

स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध केले असतील तर गर्भधारणेची शक्यता असते. गर्भधारणा नक्की कशी होते आणि स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळ ओळखण्यासाठी  https://letstalksexuality.com/conception/  या लिंक वरील लेख नक्की वाचा. गर्भधारणा नको असेल तर त्यासाठी कंडोम, तोंडावाटे घ्यायच्या संप्रेरक गोळ्या, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन पिल्स, संभोगाच्या आधी स्त्रीच्या योनिमार्गात सरकवून ठेवता येतील अशा शुक्राणूनाशक किंवा पुरुषबीज नाशक गोळ्या,  पुरुष नसबंदी,  स्त्री नसबंदी,  कॉपर टी, यांसारखी काही साधनं किंवा पद्धती वापरता येतात. यांना गर्भनिरोधकं असं म्हणतात. गर्भनिरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/contraception/ या लिंक वरील लेख वाचा.
 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 8 =