प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमला समलिंग आक्रषन आहे ते कमी करण्यासाठी उपायमी लग्न करू शकतो का मला स्त्री संभोग ची भिती वाटते

मला समलिंग आक्रषन आहे ते कमी करण्यासाठी उपायमी लग्न करू शकतो का मला स्त्री संभोग ची भिती वाटते

2 उत्तर

तुम्हाला जर समलिंगी लोकांबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही. जे आहे ते स्वीकारा. निसर्गतः जे मिळाले आहे त्याला बदलायचा प्रयत्न करणे म्हणजे ताण तणाव ओढवून घेणे आहे तसेच द्विधा मनः स्थितीमध्ये जगण्यासारखे आहे. भारतीय मानसशास्त्रज्ञ संघटना आणि जनातिक मानसशास्त्रज्ञ संघटना समलैंगिकता हा मानसिक आजार मानत नाही.

समलिंगी आकर्षण असताना आणि स्त्री संभोगाची भीती असताना तुम्ही लग्न करणं म्हणजे तुमच्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीवर देखील अन्याय होईल. शिवाय तुमच्यावरही ताण वाढेल. तुमच्या लैंगिक कलाविषयी बिंदुमाधव खिरे यांच्याशी संपर्क साधा. बिंदुमाधव खिरे हे समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या समपथिक ट्रस्ट, पुणे चे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने बोला.

हेल्पलाईन क्रमांक- 9763640480 (सोमवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळातच फोन करा. )

तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. याशिवाय आपल्या वेबसाईट वरील ‘ सगळं नॉर्मल आहे’ या सेक्शन मधील लेख वाचा. खाली लिंक दिली आहे.

https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 5 =