प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा रंग, रुप, स्वभाव इ. सर्व गोष्टी बदलत असतात. तसंच प्रत्येकाचा संभोग करण्याचा कालावधी देखील वेगवेगळा असू शकतो. यात काळजी करण्याचं कारण नाही. साधारणपणे प्रत्यक्ष संभोग ३ ते ५ मिनिटं चालतो. परंतू संभोगापूर्वी आणि नंतरचा कालावधीदेखील फार महत्वपूर्ण असतो. जसं संभोगापूर्वी जोडीदाराशी फोरप्ले करणं. जोडीदाराच्या शरीराला स्पर्श करुन त्यांना आनंद देणं. अशा गोष्टींमध्येही संभोगा इतकाच आनंद मिळत असतो. संभोगानंतर जोडीदाराच्या जवळ असणं मानसिकरित्या सुखकारक अनुभव ठरु शकतो.
दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचा सेक्स टाईम कमी आहे हे तुम्हाला कसं कळालं? कोणी सांगितलं म्हणून की पॉर्न क्लिप्समध्ये पाहून किंवा वाचून तुम्हाला असं वाटू लागलं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न क्लिप्स किंवा अशास्त्रीय पुस्तकांमध्ये अनेकदा चुकीची माहिती दिली जाते. त्यामध्ये संभोगाविषयी अनेक अतिरंजित कल्पना असतात. त्यामुळं तुमचा सेक्स टाईम कमी आहे हे तुम्हाला कुठून कळालं यावर नक्की विचार करा.
दुसरा प्रश्न देखील असाच आहे. लिंग नैसर्गिकरित्या एका बाजूला झुकलेलं असतं आणि लिंगामध्ये बाक देखील असू शकतो. या वाईट असं काही नाही. जर संभोग करण्यामध्ये लिंगाच्या वाकडेपणामुळे अडचणी येत असतील तर उपचार आणि औषधांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचं कारण नाही.