प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा माझ्या g.f बरोबर बिना कंडोम सेक्स झालाय नंतर मी अनवाँटेड गोळी लगेच 72 तासांच्या आत दिली पन तीला पाळि नाही आली अअजून तीची पाळी डेट आहे 18 तर तीला पाळि येन्याची शक्यता आहेका व ती ययेईल का व येन्यासाठी काय करु

माझा माझ्या g.f बरोबर बिना कंडोमसेक्स झालायनंतर तीला अनवाँटेड गोळी दीली 72 तासच्या आत पन तीला पाळी नाही आली तीची डेट आहे अठरा तिला पाळीयेईल का व

ति येन्यासाठी काय करु

1 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते, की अनवाँटेड ७२ सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये घ्यायच्या असतात त्यामुळे त्याचा नियमित गर्भनिरोधक वापर करणे योग्य नाही. त्यामुळे पुढच्या कंडोमचा वापर नक्की करा.

मासिक पाळीची तारीख येईपर्यत पाळीची वाट बघा. मासिक पाळीची तारीख उलटूनही पाळी आली नाही तर सगळ्यात पहिल्यांदा प्रेग्नंसी टेस्ट करा. मेडिकलच्या दुकानात प्रग्नंसी कीट मिळते त्याच्या सहाय्याने तुम्हाला प्रेग्नंसी आहे की नाही याची खात्री करून घेता येईल.

प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. गर्भापाताविषयीच्या माहितीसाठी ‘मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763’ येथे फोन करा. कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

प्रेग्नंसी नसेल तर गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

या सगळ्यात तुमच्या जोडीदाराला तुमची आवश्यकता आहे. तिच्या सोबत राहा आणि काळजी घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 2 =