प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा मुलगा ५ वी मध्ये शिकत आहे त्याने मला विचारले लग्नाआधी बाळ होत नाही. लग्नानंतरच कसे काय होते ? याचे उत्तर आई म्हणून मी काय द्यावे?

1 उत्तर

काही तांत्रिक कारणांमुळं तुमचा प्रश्न आम्हाला लवकर दिसला नाही त्यामुले उत्तर देण्यासाठी उशिर झाला याबद्दल क्षमस्व. सहसा पालक अशा प्रश्नांनां उत्तरं देणं टाळतात त्यामुळं प्रथम तुमचं अभिनंदन की तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी लहानांच्या शंका दूर करायच्या, त्या मोठ्या मंडळीनीच लैंगिकतेच्या संकल्पनेचा विचार खोलवर जावून केलेला नसतो. जर पालकांच्या मनात लैंगिकते विषयीच्या बांधीव कल्पना असतील, अनेक गैरसमज ही असतील तर मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देणं कठीण होवून जातं. लैंगिकतेविषयी मुलभूत शास्त्रीय माहितीही बरेचदा पालकांजवळ नसते. माहिती असली तरी संकोच आड येतो, शब्द सुचत नाहीत, कसं सांगावं ते काळत नाही, म्हणजेच निव्वळ कसं सांगायचं ही अडचण नाहीये तर काय सांगायचं, कधी सांगायचं, किती सांगायचं ही सुध्दा अडचण आहे. म्हणूनच, लैंगिकतेसंदर्भात वेगवेगळ्या टप्प्यावर मुलांना समजून घेण्यासाठी, त्यांना बोलतं करण्यासाठी आणि त्यासाठी पालकांनी प्रथम आपापसातच मोकळेपणानं, उघडपणानं या बाबतीत बोलणं तसचं आपल्या कल्पना आणि विचार तपासून घेणं आवश्यक आहे. तुमच्या मुलाला काय आणि कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. तुमच्या मुलाला माहिती असलेल्या गोष्टींची उदाहरणं घेवून त्याला समजून सांगांव लागेल.

मुलं आजूबाजूच्या अनेक गोष्टी न्याहाळत असतात, तेव्हा त्यांनी पाहिलेल्या किंवा माहित असलेल्या गोष्टींची उदाहरणं देवून नक्कीच सोप्या भाषेत समजून सांगता येईल. यासाठी पुढील वेब सीरिज नक्की पहा.

https://www.youtube.com/watch?v=M2Aa16laoE8

या व्यतिरिक्त "काय सांगू? कसं सांगू? खास आई-बाबांसाठी" हे पुस्तक नक्की वाचा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 0 =