प्रश्नोत्तरेमाझी gfसेक्स करायला नको मनती तिला ते आडत नाही मनती काय कराव मग

1 उत्तर

उत्तर अगदी सोप्पं आहे. ती जर नाही म्हणते तर, ‘नाही म्हणजे नाही.’ सेक्ससाठी दोन्ही जोडीदारांची संमती, इच्छा अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तिला वेळ द्या. तिची मानसिक तयारी होईपर्यंत वाट बघा. तिची तयारी असेल, संमती असेल तेव्हा दोघांनाही या संबंधांतून तितकाच आनंद मिळेल. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरा. लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे. ‘नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी’ या वेबसाईटवरील लेखातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/contraception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 9 =