प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या बायकोच्या अंगावर विशेषतः पायांवर खूप दाट केस आहेत,तिच्या आई आणि मावशीला पण असेच केस आहेत असं ती म्हणते. तर मला असं विचारायचं आहे तिच्या अंगावरील हे केस अनुवंशिकतेमुळे आलेले असावेत की हरसुटीझम मुळे आलेले असावेत?तिची लैंगिक कामोत्तेजना माझ्या माहितीप्रमाणे नॉर्मल आहे, पण सेक्स मध्ये तिला जास्त इंटररेस्ट नाही फॉरेपले पुढे ती जाऊ देत नाही म्हणते खूप त्रास होतो.मी काय करावं?लोक म्हणतात केस अंगावर असलेली मुलगी खूप कामोत्तेजक असते पण येथे सगळं उलट दिसतेय आणि जर ती कामोत्तेजक असेल तर त्रास होत असल्याने ती काही करू देत नसेल का?तिच्या भावना मनातच दाबून ठेवत असेल का?
माझ्या बायकोच्या अंगावर विशेषतः पायांवर खूप दाट केस आहेत,तिच्या आई आणि मावशीला पण असेच केस आहेत असं ती म्हणते. तर मला असं विचारायचं आहे तिच्या अंगावरील हे केस अनुवंशिकतेमुळे आलेले असावेत की हरसुटीझम मुळे आलेले असावेत?तिची लैंगिक कामोत्तेजना माझ्या माहितीप्रमाणे नॉर्मल आहे, पण सेक्स मध्ये तिला जास्त इंटररेस्ट नाही फॉरेपले पुढे ती जाऊ देत नाही म्हणते खूप त्रास होतो.मी काय करावं?लोक म्हणतात केस अंगावर असलेली मुलगी खूप कामोत्तेजक असते पण येथे सगळं उलट दिसतेय आणि जर ती कामोत्तेजक असेल तर त्रास होत असल्याने ती काही करू देत नसेल का?तिच्या भावना मनातच दाबून ठेवत असेल का? asked 6 years ago

1 उत्तर
Answer for माझ्या बायकोच्या अंगावर विशेषतः पायांवर खूप दाट केस आहेत,तिच्या आई आणि मावशीला पण असेच केस आहेत असं ती म्हणते. तर मला असं विचारायचं आहे तिच्या अंगावरील हे केस अनुवंशिकतेमुळे आलेले असावेत की हरसुटीझम मुळे आलेले असावेत?तिची लैंगिक कामोत्तेजना माझ्या माहितीप्रमाणे नॉर्मल आहे, पण सेक्स मध्ये तिला जास्त इंटररेस्ट नाही फॉरेपले पुढे ती जाऊ देत नाही म्हणते खूप त्रास होतो.मी काय करावं?लोक म्हणतात केस अंगावर असलेली मुलगी खूप कामोत्तेजक असते पण येथे सगळं उलट दिसतेय आणि जर ती कामोत्तेजक असेल तर त्रास होत असल्याने ती काही करू देत नसेल का?तिच्या भावना मनातच दाबून ठेवत असेल का? answered 6 years ago

आता अंगावर केस का येतात? हे समजून घेऊयात. वयाच्या अंदाजे 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकांचा आपल्या शरीरावर परिणाम दिसायला लागतो. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतं. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. पुरुषांच्या शरीरात अँड्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या अंगावर केस जास्त येतात. काही स्त्रियांमध्ये जर अँड्रोजनचे प्रमाण वाढलं तर त्यांच्या अंगावरही केस किंवा ओठांवर थोडी लव दिसते. यात काहीही अनैसर्गिक नाही.

स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात.

अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. म्हणूनच एखाद्या स्त्रीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर तिच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लैंगिक इच्छा वाढणे आणि प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवणे यात फरक आहे, हे आपल्याला माहीतच आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 1 =