प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझ्या शेजारी एक वहिनी राहते मला तीला सेक्स करण्याची तीव्र इच्छा आहे तर मी ती कशी पूर्ण करू

1 उत्तर

कुणावर प्रेम असण्यात, तशी भावना, ओढ असण्यात, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रकर्षाने जाणवण्यात वावगे काही नाही. पण लैंगिक इच्छा आणि प्रत्यक्ष कृती यात फरक आहे. सेक्स ही एक जबादार क्रिया आहे हे विसरू नकोस. लैंगिक कृतीमध्ये समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि आदर तितकाच महत्वाचा आहे.

जरी वाहिनीची तशी इच्छा असेल आणि तिने ती व्यक्त केली तरीही खालील गोष्टींचा दोघं मिळून विचार करायला हवाय.

१. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

२. या लैंगिक संबंधांमुळे त्या स्त्रीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

३. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

(भारतीय दंड संहिता ४९७: जो कुणी पुरुष एखाद्या विवाहित स्त्री बरोबर तिच्या नवऱ्याच्या संमती शिवाय लैंगिक संबंध ठेवेल व असे संबंध जर बलात्कार नसतील तर तो पुरुष व्यभिचाराच्या गुन्ह्यात दोषी समजला जाईल व त्या गुन्ह्यासाठी त्याला ५ वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकेल.)

तेव्हा जे काही कराल ते परस्पर संमतीने आणि जबाबदारी घेऊनच करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 7 =